Skip to content

YCMOU Repeater exam form 2025 सुरू.

  • by
YCMOU Repeater exam form 2025

YCMOU Repeater exam form 2025 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत बहिस्थ विद्यार्थ्यांकरिता निरनिराळ्या अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. या अभ्यासक्रमांना बसल्यानंतर काही विद्यार्थी आपली परीक्षा देऊ शकत नाहीत. अथवा एखादा पेपर द्यावयाचा राहतो अथवा नापास झाला असेल अशा विद्यार्थ्यांकरिता पुनर परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेलाच रिपीटर परीक्षा म्हटले जाते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मे व जून 2025 मध्ये या परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत, परीक्षा फी याविषयीची माहिती आपण या पोस्ट पाहणार आहोत

Ycmou result

YCMOU Repeater exam form 2025 last date

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार खालील प्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेळापत्रक आहे.

विना विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक  12 मार्चपासून 26 मार्च पर्यंत आहे. विलंब शुल्क 100 रुपये भरून एक एप्रिल पर्यंत फॉर्म भरता येतील, तर विलन शुल्क पाचशे रुपये अधिक भरून सहा एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी शक्यतो आपले अर्ज 26 मार्च पूर्वी फॉर्म ऑनलाईन भरणे फायदेशीर आहे.

YCMOU Repeater exam form 2025 कोणी भरावेत?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या रिपीटर परीक्षेचा फॉर्म भरण्याबाबत अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, की हा फॉर्म कोणी भरावा? रिपीटर परीक्षा फॉर्म हा दोन प्रकारचे विद्यार्थी भरू शकतात.

  • जे विद्यार्थी काही कारणास्तव मागील वर्षी अथवा त्यापूर्वी परीक्षेला बसू शकले नाही असे विद्यार्थ्यांना रिपीटर फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • जे विद्यार्थी अगोदरच्या परीक्षेमध्ये नापास झाले असतील त्या विषयांसाठी ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी ज्या वर्गासाठी नियमित प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्या वर्गासाठी पुन्हा परीक्षा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे विद्यार्थी मागील वर्षी परीक्षा देऊ शकले नाहीत अथवा एखाद्या या विषयांमध्ये नापास झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना मागील इयत्तांचे राहिलेले विषय पूर्ण करण्यासाठी पुनर्परीक्षा म्हणजेच YCMOU Repeater exam चे फॉर्म भरणे गरजेचे आहे.

YCMOU Repeater exam date 2025

YCMOU Repeater exam 2025 ही परीक्षा नियमित विद्यार्थ्यांसोबतच होत असते. या परीक्षेची संभाव्य तारीख 15 मे पासून सुरू होऊ शकते.

YCMOU Repeater exam form 2025 fees

रिपीटर परीक्षेसाठी असणारी फी हे आपले किती विषय शिल्लक आहे व आपण फॉर्म कोणत्या मुदतीमध्ये भरत आहात यावर अवलंबून असते. आपण आपला फॉर्म 12 मार्च 2025 पासून दिनांक 26 मार्च 2025 या कालावधीमध्ये भरल्यास पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी आपल्याला प्रति विषय 180 रुपये फी आकारली जाईल. म्हणजेच आपला एक विषय राहिला असल्यास 180 रुपये दोन विषय राहिले असता 360 रुपये अशा प्रकारे आपली फी आकारली जाईल. त्यानंतर मार्कलिस्ट फी 100 रुपये अशाप्रकारे आपल्याला फी आकारली जाईल.

जर आपण पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमासाठीची रिपीटर परीक्षा देत असाल तर त्यासाठी दोनशे रुपये प्रति पेपर व मार्कशीट फी 100 रुपये आकारले जाईल. वरील तक्त्याप्रमाणे आपल्या अभ्यासक्रमामध्ये मौखिक परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा असल्यास त्याबाबतची वेगळी फी भरावी लागते. अधिक माहिती साठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

YCMOU Repeater exam form 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *