Skip to content

YCMOU Repeater exam 2024 साठी फॉर्म भरणे झाले सुरू!

YCMOU Repeater exam 2024

YCMOU Repeater exam 2024 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत बहिस्थ विद्यार्थ्यांकरिता निरनिराळ्या अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे आयोजन डिसेंबर – जानेवारी व मे -जून या महिन्यांमध्ये केले जाते. काही विद्यार्थी काही कारणास्तव आपली परीक्षा देऊ शकत नाहीत अथवा एखाद्या विषयामध्ये कमी गुण मिळाल्यामुळे नापास होतात अशा विद्यार्थ्यांकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत रिपिटर परीक्षेचे आयोजन केले जाते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यापीठांमार्फत पुनर्परीक्षा YCMOU Repeater exam 2024 घेण्यात येणार आहे. पुनर परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असते.

YCMOU Result 2024 कसा पहावा?

YCMOU Repeater exam form 2024 last date

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार खालील प्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेळापत्रक आहे.

Ycmou repeater exam 2024

विना विलंब शल्कासह ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 13 सप्टेंबर 2024 पासून दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. शक्यतो सर्व विद्यार्थ्यांनी या मुदतीमध्येच आपले अर्ज सादर करावेत. म्हणजेच आपल्या फीस मध्ये बचत होईल.

या कालावधीमध्ये जे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज सादर करू शकत नाही असे विद्यार्थी 100 रुपये ज्यादा विलंब शुल्क भरून 01 ऑक्टोबर 2024 ते 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात .

आणि या कालावधीमध्येही ऑनलाईन अर्ज सादर करून न शकणारे विद्यार्थी पाचशे रुपये ज्यादा विलंब शुल्क भरून 6 ऑक्टोबर 2024 ते 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. म्हणजेच ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. असे असले तरीही आपण शक्यतो 13 सप्टेंबर 2024 पासून दिनांक 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्येच आपले अर्ज Online सादर करावेत.

YCMOU Repeater exam 2024 form कोणी भरावेत?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या रिपीटर परीक्षेचा फॉर्म भरण्याबाबत अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, की हा फॉर्म कोणी भरावा? रिपीटर परीक्षा फॉर्म हा दोन प्रकारचे विद्यार्थी भरू शकतात.

  • जे विद्यार्थी काही कारणास्तव मागील वर्षी अथवा त्यापूर्वी परीक्षेला बसू शकले नाही असे विद्यार्थ्यांना रिपीटर फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • जे विद्यार्थी अगोदरच्या परीक्षेमध्ये नापास झाले असतील त्या विषयांसाठी ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी ज्या वर्गासाठी नियमित प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्या वर्गासाठी पुन्हा परीक्षा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे विद्यार्थी मागील वर्षी परीक्षा देऊ शकले नाहीत अथवा एखाद्या या विषयांमध्ये नापास झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना मागील इयत्तांचे राहिलेले विषय पूर्ण करण्यासाठी पुनर्परीक्षा म्हणजेच YCMOU Repeater exam चे फॉर्म भरणे गरजेचे आहे.

YCMOU Repeater exam date 2024

YCMOU Repeater exam 2024 ही परीक्षा नियमित विद्यार्थ्यांसोबतच होत असते. या परीक्षेची संभाव्य तारीख डिसेंबर 2024 पासून सुरू होऊ शकते. परीक्षेबाबतचे संपूर्ण वेळापत्रक नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्राप्त होते. परीक्षेची वेळापत्रक मिळण्यासाठी नोटिफिकेशन चालू करा.

YCMOU Repeater exam fees 2024

YCMOU Repeater exam 2024

रिपीटर परीक्षेसाठी असणारी फी हे आपले किती विषय शिल्लक आहे व आपण फॉर्म कोणत्या मुदतीमध्ये भरत आहात यावर अवलंबून असते. आपण आपला फॉर्म 13 सप्टेंबर 2024 पासून दिनांक 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये भरल्यास पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी आपल्याला प्रति विषय 180 रुपये फी आकारली जाईल. म्हणजेच आपला एक विषय राहिला असल्यास 180 रुपये दोन विषय राहिले असता 360 रुपये अशा प्रकारे आपली फी आकारली जाईल. त्यानंतर मार्कलिस्ट फी 100 रुपये अशाप्रकारे आपल्याला फी आकारली जाईल.

जर आपण पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमासाठीची रिपीटर परीक्षा देत असाल तर त्यासाठी दोनशे रुपये प्रति पेपर व मार्कशीट फी 100 रुपये आकारले जाईल. वरील तक्त्याप्रमाणे आपल्या अभ्यासक्रमामध्ये मौखिक परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा असल्यास त्याबाबतची वेगळी फी भरावी लागते. अधिक माहिती साठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

How to fill ycmou repeater exam form online

आपण घरबसल्या आपल्या मोबाईल फोनवरून रिपीटर फॉर्म YCMOU Repeater exam 2024 भरू शकतो. यासाठी आपल्याकडे पी आर एन नंबर आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे.

  • सर्वात प्रथम आपल्या फोन मधील ब्राउझर ओपन करा.
  • ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचा आहे, ycmou.digitaluniversity.ac.in आणि सर्च करा.
  • सर्च केल्यानंतर आपल्यासमोर विद्यापीठाचे मुख्य पान दिसेल.
  • मुख्य पानावर उजव्या बाजूला आपल्याला online exam form submission for repeater students अशा प्रकारचा मजकूर लिहलेली एक टॅब उजव्या बाजूस दिसेल. तिच्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला दोन बॉक्स दिसतील. एका बॉक्समध्ये आपला PRN नंबर टाकून किंवा दुसऱ्या बॉक्स मध्ये युजरनेम टाकून कॅपच्या टाकून प्रोसेस वर क्लिक करायचे आहे.
  • PRN नंबर म्हणजे कायम नोंदणी क्रमांक होय. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आपला प्रवेश निश्चित झाल्यानंतर आपल्याला एक पी आर एन नंबर मिळतो तो पी आर एन नंबर खूप महत्त्वाचा आहे.
  • प्रोसेस वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले नाव अभ्यासक्रमाचे नाव इत्यादी आपली माहिती दिसून येईल. ती तपासून पुढे प्रोसेस वर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्याला जे विषय राहिले आहेत ते दिसून येतील. त्यासाठी लागणारी एकूण फी दिसेल.
  • या ठिकाणी आपल्याला परीक्षेसाठी परीक्षा केंद्र निवडावयाचे आहे.
  • सर्व माहिती तपासून पहा आणि त्यानंतर पेमेंट साठी क्लिक करा.
  • आपण आवश्यकते प्रमाणे पेमेंट डेबिट कार्ड, net banking, upi payment इत्यादी पैकी योग्य ऑप्शन निवडून करा.
  • पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेमेंटची व भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून माहितीसाठी आपल्या जवळ ठेवा.

अशाप्रकारे आपण घरबसल्या आपल्या मोबाईल वरून अथवा लॅपटॉप वरून रिपीटर परीक्षेचा फॉर्म YCMOU Repeater exam 2024 भरू शकता. फॉर्म बाबत काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

छत्रपती शिवाजी महाराज

ycmou repeater exam form बाबत सर्व सर्वसाधारण सूचना

  • सोळा अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रिपीटर परीक्षा फॉर्म भरता येईल.
  • बी ए, बी कॉम शिक्षण क्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांचा नोंदणी कालावधी पूर्ण झाला आहे त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण क्रम नियमांच्या अधिन राहून पुनर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नऊ अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून 14 वर्षे पूर्ण होऊन गेल्याने त्यांचा नोंदणी कालावधी संपलेला असल्याने परीक्षा देता येणार नाही.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल.
  • परीक्षेशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी पहावे.
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट चा आयडी म्हणजेच ABC ID तयार करणे अनिवार्य आहे. हा एबीसी id तयार करण्याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.

वरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर दिलेल्या सूचना पहाव्यात.

1 thought on “YCMOU Repeater exam 2024 साठी फॉर्म भरणे झाले सुरू!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *