उदाहरण संग्रह 35 हा इयत्ता पाचवीच्या गणित पाठ्यपुस्तकातील सहमूळ संख्या ही संकल्पना दृढ करणारा आहे. यामध्ये सहमूळ संख्यांची जोडी आहे की नाही हे ओळखायचे आहे.
सहमूळ संख्या म्हणजे काय?
ज्या दोन संख्यांचे सामायिक अवयव फक्त 1 हा अंक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच सहमूळ संख्यांना फक्त एक या अंकानेच भाग जातो इतर कोणत्याही संख्येच्या पाढ्यामध्ये त्या दोन संख्या नसतात.
- सहमूळ संख्या या मूळ संख्या असतीलच असे नाही.
- सहमूळ संख्या या मूळ संख्या असतीलच असे नाही ही जोडी संयुक्त संख्यांची जोडी सुद्धा असते.
- दोन मूळ संख्या या सहमूळ संख्याच असतात.
आता आपण सहमूळ संख्येच्या जोड्या ओळखण्यासाठी पाठ्यपुस्तकातील उदाहरण संग्रह 35 सोडवूया.
उदाहरण संग्रह 35
खालील जोड्यामधील संख्या सहमूळ संख्या आहेत कि नाही ते ठरवा.
1) 22, 24
22 चे विभाजक- 1, 2, 11, 22
24 चे विभाजक = 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24
22 व 24 मधील सामाईक विभाजक= 1, 2
या जोडी मध्ये 1, 2 हे 2 सामाईक विभाजक आहेत. त्यामुळे या सहमूळ संख्या नाहीत. सहमूळ संख्या होण्यासाठी फक्त एकच विभाजक असावा लागतो.
2) 14, 21
14 चे विभाजक- 1, 2, 7, 14
21 चे विभाजक = 1, 3, 7, 21
14 व 21 मधील सामाईक विभाजक= 1, 7
या जोडी मध्ये 1, 7 हे 2 सामाईक विभाजक आहेत. त्यामुळे या सहमूळ संख्या नाहीत.
3) 10, 33
10 चे विभाजक- 1, 2, 5, 10
33 चे विभाजक = 1, 3, 11, 33
10 व 33 मधील सामाईक विभाजक= 1
या जोडी मध्ये 1 हा एकच सामाईक विभाजक आहेत. त्यामुळे या सहमूळ संख्या आहेत.
4) 11, 30
11 चे विभाजक- 1, 11
30 चे विभाजक = 1,2, 3, 5, 6, 10, 15, 30
11 व 30 मधील सामाईक विभाजक= 1
या जोडी मध्ये 1 हा एकच सामाईक विभाजक आहेत. त्यामुळे या सहमूळ संख्या आहेत.
5) 5, 7
5 चे विभाजक- 1, 5
7 चे विभाजक =1,7
5 व 7 मधील सामाईक विभाजक= 1
या जोडी मध्ये 1 हा एकच सामाईक विभाजक आहेत. त्यामुळे या सहमूळ संख्या आहेत. या दोन्ही मूळ संख्या आहेत.
6) 15, 16
15 चे विभाजक- 1, 3, 5, 15
16 चे विभाजक = 1,2, 4, 8, 16
15 व 16 मधील सामाईक विभाजक= 1
या जोडी मध्ये 1 हा एकच सामाईक विभाजक आहेत. त्यामुळे या सहमूळ संख्या आहेत.
7) 50, 52
50 चे विभाजक- 1, 2, 5, 10, 25, 50
52 चे विभाजक = 1,2, 4, 13, 26, 52
50 व 52 मधील सामाईक विभाजक= 1, 2
या जोडी मध्ये 1व 2 सामाईक विभाजक आहेत. त्यामुळे या सहमूळ संख्या नाहीत.
8) 17, 18
17 चे विभाजक- 1, 17
18 चे विभाजक = 1, 2, 3, 6, 9, 18
17 व 18 मधील सामाईक विभाजक= 1
या जोडी मध्ये 1 हा एकच सामाईक विभाजक आहेत. त्यामुळे या सहमूळ संख्या आहेत.
उदाहरण संग्रह 35 मधील उदाहरणे सोडवली आहेत. व्हिडिओ पहा.