Skip to content

स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय इयत्ता 4 थी

  • by

१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

अ ) पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते.

आ ) मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती.

इ ) शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली.

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले ?

” हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे ,असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.” असे रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी बोलले.

आ ) जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला ?

आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला.

इ ) शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडानखडा माहिती मिळवली ?

शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट, किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारूगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली.

ई ) शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले ?

बारा मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे, हे शिवरायांनी ओळखले. त्यामुळे या गोष्टींना आळा घालायचे असे शिवरायांनी ठरवले.

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) शिवरायांचे ध्येय कोणते होते ?

आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे ‘ हिंदवी स्वराज्य ‘ ! तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. हे शिवरायांचे ध्येय होते.

आ ) शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला ?

शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरांतील आडमार्ग शोधावे. खिंडी, घाट, चोरवाटा निरखाव्या,असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *