Sthir jivan aani nagari sankruti swadhay
अ ) १) तांबे २) सोने ३) लोखंड
आ) १) ताम्रयुग २) लोहयुग ३) अश्मयुग
उत्तर –
अ ) १) सोने २) तांबे ३) लोखंड
आ) १) अश्मयुग २) ताम्रयुग ३) लोहयुग
प्र २) पुढील घटनांचे परिणाम लिहा.
१) तांबे या धातूचा शोध.
तांबे धातूच्या शोधामुळे मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले. अवजारे अधिक काळ वापरता आली. ती टिकाऊ झाली.
२) चाकाचा शोध.
चाकाचा शोध हा मानवी जीवनातील खूप महत्त्वाचा शोध होता. मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली व व्यापार वाढला. त्यात हळूहळू चाकांचा उपयोग अनेक ठिकाणी वाढू लागला.
३) लिपीचे ज्ञान.
व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली.
प्र ३) पुढील वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा.
१) दगडाची हत्यारे …….युग
२) तांब्याची हत्यारे व इतर वस्तू…….युग
३) लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू……युग.
उत्तर –
१) दगडाची हत्यारे अश्मयुग
२) तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग
३) लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोहयुग.
प्र ४) टिपा लिहा.
१) धातूचा वापर.
मानवाने हत्यारांसाठी आणि अवजारांसाठी केलेल्या धातूंच्या वापरावरून ख्रिश्चन थॉमसेन याने या कालखंडाची अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग अशी वर्गवारी केली. मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला; परंतु सोने निसर्गतः अतिनरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग नव्हता. त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला. या काळात मानवाने तांबे या धातूचा अवजारांसाठी मोठ्या प्रमाणात वापर केल्याने या कालखंडाला ‘ ताम्रयुग ‘ असे म्हणतात. त्यानंतर मानव लोखंडाचे हत्यारे वापरू लागल्याने या युगाला ‘ लोहयुग ‘ असे म्हणतात.
२) नागरी समाजव्यवस्था –
नवाश्मयुगातील कृषीसंस्कृतीवर नागरी संस्कृतीचा पाया आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा व त्यावर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना नागरी संस्कृतीत महत्त्व प्राप्त झाले. या समाजव्यवस्थेत नगरांमध्ये भव्य मंदिरे उभारली गेली. नगराच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखांच्या हाती एकवटले गेल्याने मंदिरांचे प्रमुखपद व राजपद ही एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरिक संस्कृतीची ही सुरुवात होती.