Skip to content

शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय इयत्ता 4 थी | Shivarayanche Shikshan swadhyay

शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय इयत्ता 4 थी

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांचे शिक्षण या पाठामध्ये बालपणापासून शिवरायांवर झालेले संस्कार, माता जिजाऊनी त्याच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, कष्ट याविषयीची माहिती मिळते.

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ ) शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते.

( संस्कृतचे, कन्नडचे, तमीळचे )

आ ) मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात.

( शेतकरी, सैनिक, मावळे )

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली ?

शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजीराजांनी बंगळूरच्या दरबारात केली.

आ ) शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ?

शिक्षकांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला.

इ ) दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सुट का दिली ?

शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी, म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) पुण्याचे रूप कसे पालटले ?

जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या, हे आसपासच्या गावातील लोकांना समजले, तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ – संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. अशाप्रकारे पुण्याचे रूप पालटले

आ ) शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या ?

उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे, गनिमी काव्याचा वापर कसा करावा? इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या.

इ ) जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता ?

जिजाबाईंनी असा निश्चय केला होता, की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *