Skip to content

शायिस्ताखानाची फजिती स्वाध्याय इयत्ता 4 थी

  • by
शायिस्ताखानाची फजिती स्वाध्याय

शायिस्ताखानाची फजिती स्वाध्याय हा इयत्ता चौथीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील शाहिस्तेखानाची फजिती या पाठावरील आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करण्यासाठी शायिस्ताखान पुण्यामध्ये आला. त्यापूर्वी त्याच्या बलाढ्य सैन्याने चाकणचा किल्ला घेतला होता. त्यानंतर त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला.

पुण्यात आल्यावर शाहिस्तेखानाने तेथील जनतेवर जुलुम जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. शाहिस्तेखानाने पुण्यातील लाल महालामध्ये मुक्काम ठोकला.

छत्रपती शिवाजी महाराज धाडसाने मध्यरात्री आपल्या मोजक्या सैन्यासह लाल महालात घुसले. लाल महालात घुसून त्यांनी शायिस्तेखानावर हल्ला केला. शाहिस्तेखान घाबरून पळायला लागला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला असता शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली गेली. मात्र स्वतःचा जीव वाचवून शाहिस्तेखान कसाबसा पळाला.

अशाप्रकारे शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची फजिती केली. या ठिकाणी शायिस्ताखानाची फजिती स्वाध्याय पाहणार आहोत.

शायिस्ताखानाची फजिती स्वाध्याय

प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

१) शायिस्ताखानाने ………. किल्ल्याला वेढा दिला. ( पुरंदर ,पन्हाळा, शिवनेरी )

उत्तर – शायिस्ताखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला.

२) शायिस्ताखानाने पुण्यात ………….. मुक्काम ठोकला. (शनिवारवाड्यात, लाल महालात, पर्वतीवर )

उत्तर- शायिस्ताखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला.

३) औरंगजेब बादशाहाने शायिस्ताखानाची रवानगी ……….मध्ये केली. ( आसाममध्ये, कर्नाटकमध्ये, बंगालमध्ये )

उत्तर- औरंगजेब बादशाहाने शायिस्ताखानाची रवानगी बंगालमध्ये केली.

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) शायिस्ताखान कोणती गावे घेत पुण्याला आला?

उत्तर – शिरवळ, शिवापुर, सासवड आणि चाकण अशी गावे घेत शायिस्ताखान पुण्याला आला.

२) शायिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले ?

उत्तर – मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले.

३) शायिस्ताखानाला कोणती भीती वाटू लागली ?

‘आज बोटे तुटली, उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल,’ अशी भीती शायिस्ताखानाला वाटू लागली.

प्र ३) कारणे लिहा.

) औरंगजेब बादशाहा शिवरायांवर चिडला.

आदिलशाहीशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब शिवरायांवर चिडला.

२) शायिस्ताखान खिडकीवाटे पळू लागला.

युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी तलवार उपसलेली पाहून,शायिस्ताखान घाबरला व ओरडत खिडकीवाटे पळू लागला.

प्र ४) शायिस्ताखानाची फजिती स्वाध्याय घटना कलानुक्रमे लावा.

१) शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली.

२) शायिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला.

३) शायिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला.

४) शिवरायांनी शायिस्ताखानाची खोड मोडली.

उत्तर – घटना कालानुक्रमे पुढील प्रमाणे आहेत.

  1. शायिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला.
  2. शायिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला.
  3. शिवरायांनी शायिस्ताखानाची खोड मोडली.
  4. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली.

छोटे आजार घरगुती उपचार स्वाध्याय चौथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *