Skip to content

शब्दसमूहाबद्दल एक शब्द | shabd samuhabaddal ek shabd

  • by
शब्द समूहाबद्दल एक शब्द

शब्दसमूहाबद्दल एक शब्द : म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द व शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. मराठी मध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरले जाणारे अनेक शब्द आहेत. त्यांची माहिती पाहूया.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

  • आधी जन्मलेला – अग्रज
  • अग्नीची पूजा करणारा – अग्निपूजक
  • ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
  • ज्याला कोणीही जिंकू शकत नाही – अजिंक्य
  • विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैर कृत्य – अतिक्रमण
  • तिथी दिवस न ठरवता अचानक आलेला पाहुणा – अतिथी
  • ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
  • ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
  • धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण – अन्नछत्र, सदावर्त
  • अन्नदान करणारा – अन्नदाता
  • मागून जन्मलेला – अनुज
  • ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे – अनुपम, निरूपम
  • न टाळता येणारे – अटळ
  • पूर्वी कधीही घडले नाही असे – अपूर्व
  • कधीही मरण नसणारे – अमर
  • थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट
  • वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
  • कधीही नाश न पावणारे – अविनाशी
  • ज्याचा विसर पडणार नाही असा – अस्मरणीय
  • एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
  • जे साध्य होणार नाही असे – असाध्य
  • शरीराला कष्ट न देता काम करणारा – अंगचोर
  • लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे – अंगाई गीत
  • आकाशातील तार्‍यांचा पट्टा – आकाशगंगा
  • स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र – आत्मचरित्र, आत्मवृत्त
  • अगदी पूर्वीपासूनचे राहणारे – आदिवासी
  • पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
  • ज्याच्यावर उपकार झाले आहे असा – उपकृत
  • शिल्लक राहिलेले – उर्वरित
  • श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
  • कानांना गोड वाटणारा ( आवाज ) – कर्णमधुर
  • कर्तव्याकडे पाठ फिरवणारा – कर्तव्यपराडमुख
  • कर्तव्यात तत्पर असणारा – कर्तव्यपरायण, कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष
  • दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत – आसेतुहिमाचल
  • राष्ट्राराष्ट्रांतील संबंध असणारे – आंतरराष्ट्रीय
  • हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्रांती
  • उदयाला येत असलेला – उदयोन्मुख
  • वाटेल तसा पैसा खर्च करणे – उधळपट्टी
  • दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
  • कमळाप्रमाणे डोळे असणारी – कमलाक्षी, कमलनयना
  • हाताने केलेली खाणाखुणांची भाषा – करपल्लवी
  • इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष – कल्पवृक्ष
  • कलेची आवड असणारा – कला प्रेमी, कलासक्त
  • कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल – क्रांती
  • कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार , कामचोर
  • लहानपणापासून म्हाताऱ्यापर्यंत – आबालवृद्ध
  • जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे – आभास
  • देव आहे असे मानणारा – आस्तिक

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

  • उपकाराची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती – कृतघ्नता
  • केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञता
  • काळोख्या रात्रीचा पंधरवडा – कृष्णपक्ष , वद्यपक्ष
  • आकाशात गमन करणारा – खग, खेचर
  • आकाशाचा भेद करणारे – गगनभेदी
  • जन्मापासून श्रीमंत – गर्भश्रीमंत
  • जेथे मूर्ती असते तो देवळाचा आतील भाग – गाभारा
  • सापाचा खेळ करणारा – गारुडी
  • सैन्याची केलेली कोड्यासारखी रचना – चक्रव्यूह
  • चार पाय असलेला – चतुष्पाद
  • गावाच्या न्यायनिवाड्याची जागा – चावडी
  • इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी – चिंतामणी
  • चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक, चव्हाटा
  • जगाचा स्वामी – जगन्नाथ
  • जिथे जन्म झाला आहे तो देश – जन्मभूमी
  • पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
  • इच्छित वस्तू देणारी काल्पनिक गाय – कामधेनू
  • कार्यात तत्पर असणारा – कार्यतत्पर
  • कार्यात गढून गेलेला – कार्यमग्न , कार्यरत
  • केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा – कृतघ्न
  • जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू
  • नारळाच्या झाडाची पाने – झावळ्या
  • नाणी पाडण्याचा कारखाना – टाकसाळ
  • किल्ल्या भोवतालची भिंत – तट
  • तप करण्याची जागा – तपोभूमी
  • भरपूर आयुष्य असणारा – दीर्घायुषी
  • सतत उद्योग करणारा – दीर्घोद्योगी
  • हट्टीपणा करणारा – दुराग्रही
  • दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
  • देवावर हवाला ठेवून राहणारा – दैववादी
  • दोन नद्यांमधील प्रदेश – दोआब / दुआब
  • एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे – धर्मांतर
  • वाटसरुंना राहण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत – धर्मशाळा
  • धर्माची स्थापना करणारा – धर्मसंस्थापक
  • विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ठ
  • नवीन मतांचा पुरस्कार करणारा – नवमतवादी
  • देवापुढे सतत तेवत असणारा दिवा – नंदादीप
  • न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा – न्यायनिष्ठुर
  • देवाचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक
  • ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
  • कोणाचाही आधार नसलेला – निराधार
  • कशाचीही इच्छा नसणारा – निरिच्छ
  • घोडे बांधण्याची जागा – तबेला
  • तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख – ताम्रलेख
  • तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा
  • तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
  • दारावरील पहारेकरी – द्वारपाल
  • दोनदा जन्मलेला – द्वीज
  • तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश – द्वीपकल्प
  • अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
  • ( समाजाकडून ) उपेक्षिलेले व पिडले गेलेले – दलित
  • तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट – दंतकथा
  • खूप दानधर्म करणारा – दानशूर
  • संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम – दिनक्रम
  • निसर्गतः सुंदर असणारे – निसर्गसुंदर
  • स्वतःच्या फायद्याचा विचार न करता कार्य करणारा – नि:स्वार्थी
  • एकमेकांवर अवलंबून असणारे – परस्परावलंबी
  • दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
  • आजारी लोकांची शुश्रुषा करणारी – परिचारिका
  • पंधरा दिवसाचा काळ – पक्ष, पंधरवडा
  • तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक – पंच
  • तिथी ,वार ,नक्षत्र, योग व करण वगैरे दिन वैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका – पंचांग
  • जगाचा नाश होण्याची वेळ – प्रलयकाळ
  • फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंदवाट – पाऊलवाट
  • किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा – पागा
  • फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय – पाणपोई
  • पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी
  • गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा – पाणवठा
  • समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील लहान वाट – पाणंद, पाणद,
  • ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशी – पारदर्शक
  • युरोप, अमेरिका या पश्चिमेकडे देशांतील लोक – पाश्चिमात्य, पाश्चात्य
  • दगडासारखे कठोर हृदय असणारा – पाषाणहृदयी
  • पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक – पाक्षिक
  • म्हाताऱ्या व लंगड्यालुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण – पांजरपोळ
  • लोकांचे पुढारीपण करणारा – पुढारी, नेता
  • जुन्या मतांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी , सनातनी
  • आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा – पुरोगामी
  • पुरांमुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त
  • पूर्वेकडे तोंड करून असलेला – पूर्वाभिमुख
  • पिण्यास योग्य असलेला द्रव्य पदार्थ – पेय
  • आई वडील नसलेला – पोरका
  • पूर्वेकडील देशांतील लोक – पौर्वात्य
  • शत्रूला सामील झालेला – फितूर
  • बर्फाने अच्छादलेला – बर्फाच्छादित
  • ज्याला खूप माहिती आहे असा – बहुश्रुत
  • बाराजणांचा कारभार – बारभाई
  • बारा खिडक्या असलेला महाल – बारमाडी
  • कोणालाही कळून न देता – बिनबोभाट
  • चार बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश – बेट
  • डोंगर पोखरून आरपार नेलेला रस्ता – बोगदा
  • निरर्थक गोष्टी – भाकडकथा
  • राजाची स्तुती करणारा – भाट
  • भांडण उकरून काढणारा / काढणारी – भांडकुदळ
  • शिकारी साठी किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माळा – मचाण
  • माकडाचा खेळ करणारा – मदारी
  • दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा
  • विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणारा – महत्त्वाकांक्षी
  • काहीही काम न करता आळसात काळ घालवणारा – निरुद्योगी
  • लाज नसलेला – निर्लज्ज
  • कसलेही व्यसन नसणारा – निर्व्यसनी
  • घरादाराला व देशाला पारखा झालेला – निर्वासित
  • कसलाही डाग नसलेला – निष्कलंक
  • कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती
  • म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार – म्हातारचळ
  • पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव – माचा

5th Scholarship App

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *