इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे हा पहिला घटक आहे. या घटकावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नावर आधारित प्रश्न या पोस्ट मधील चाचणीमध्ये देण्यात आले आहेत.
दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या संख्या चिन्हांचा वापर करतो. यामध्ये प्रामुख्याने देवनागरी संख्या चिन्हे ज्यांना आपण मराठी अंक म्हणतो, जगभरामध्ये वापरले जाणारे संख्या चिन्हे म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व रोमन संख्या चिन्हे या संख्या चिन्हांची माहिती घेणार आहोत.
संख्या चिन्हे
संख्या देवनागरी, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे रोमन संख्या मध्ये लिहिण्यासाठी खालील प्रमाणे संख्या चिन्हांचा वापर केला जातो.
देवनागरी संख्या चिन्हे | आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे | रोमन संख्या चिन्ह |
१ | 1 | l |
२ | 2 | II |
३ | 3 | III |
४ | 4 | IV |
५ | 5 | V |
६ | 6 | VI |
७ | 7 | VII |
८ | 8 | VIII |
९ | 9 | IX |
० | 0 | – |
रोमन संख्या चिन्हे
10 | X |
50 | L |
100 | C |
500 | D |
1000 | M |
आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे सराव चाचणी
आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे सराव चाचणी सोडवण्याबाबत सूचना.
- प्रश्नाचे काळजीपूर्वक वाचन करून त्याखालील योग्य पर्याय समोरील गोलामध्ये टीक करा.
- चाचणी मधील सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
- सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सबमिट या टॅब वरती क्लिक करा.
- त्यानंतर येणाऱ्या नवीन पेजवरील View Score या लिंक वरती क्लिक करून आपण आपल्याला मिळालेले गुण पाहू शकतो.
- त्यामध्ये चुकलेले प्रश्न व त्याचे योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल.
- प्रश्नपत्रिका आपण कितीही वेळा सोडवू शकतो.