Skip to content

Scholarship Exam 2025 इयत्ता पाचवी आणि आठवी होणार या तारखेला..

Scholarship exam 2025

Scholarship Exam 2025: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी (पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती) आणि आठवी (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. पाचवी आणि आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता या परीक्षेत गुणवत्तेत आल्यास प्रोत्साहन पर शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 तारीख Scholarship Exam 2025 date

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती (५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी करिता होणारी शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली जाते. यावर्षीही ही परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारी 2025 रोजी पाचवी आणि आठवी दोन्ही वर्गांची परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या सर्वासाठी प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Scholarship Exam 2025 Timetable वेळापत्रक

Scholarship Exam 2025 timetable
Scholarship Exam 2025 timetable

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी) या दोन्ही परीक्षा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी पेपर -1 11 ते 12.30 व पेपर-२ 2 ते 3.30 या कालावधीत होणार आहेत. यामध्ये पेपर १ 150 गुणांचा व पेपर २ 150 गुणांचा अशी एकूण 300 गुणांची परीक्षा होणार आहे. पात्र होण्यासाठी दोन्ही विषयात 40% गुण मिळणे आवश्यक आसते.

Scholarship Exam 2025 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत

Scholarship Exam 2025

शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्रे फक्त Online पद्धतीने भारता येणार आहेत. नियमित शुल्कासह दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरता येतील. दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 25 डिसेंबर 24 या कालावधीत विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरता येईल.

दिनांक 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये अति विलंबशुल्कासह आवेदन पत्र भरता येईल. त्यानंतर 31 डिसेंबर 2024 पर्यंत अति विशेष विलंब शुल्कासह आपणास आवेदन पत्र भरता येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही.

अशाप्रकारे आवेदन पत्र भरण्याची मुदत 31 डिसेंबर 2024 पर्यंत असली तरी आपण आपले आवेदन पत्र शक्यतो 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी भरावेत. या कालावधीमध्ये आवेदन पत्र भरल्याने आपल्याला नियमित शुल्कासह फॉर्म भरता येईल व जड विलंब शुल्कही भरावे लागणार नाही.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता

  • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थी शासन मान्य शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळेत इयत्ता पाचवी किंवा आठवी मध्ये शिकत असावा.

Scholarship Exam 2025 fee परीक्षा शुल्क

Scholarship Exam 2025 fees

Scholarship Exam 2025 परीक्षेसाठी परीक्षा शुल्क खालील प्रमाणे आहे.

बिगर मागास विद्यार्थ्यांकरिता नियमित मदतीत फॉर्म भरल्यास 200 रुपये (इयत्ता पाचवी आठवी दोन्ही वर्गा करिता) व
मागास व दिव्यांग विद्यार्थी करिता 125 रुपये (इयत्ता पाचवी आठवी करिता)

विलंब शुल्कासह एक डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये फॉर्म भरल्यास पन्नास रुपये अतिरिक्त शुल्क भरून फॉर्म भरता येईल. त्यानंतर अति विलंब शुल्क व अतिविशेष विलंब शुल्क याची रक्कम आपणास प्रतिदिन च्या दराने फॉर्म भरताना भरावी लागेल. म्हणून आपले काम 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी भरणे आवश्यक आहे.

Scholarship Exam 2025 फॉर्म कोठे भरावा?

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी) परीक्षेचे online फॉर्म www.mscepune.inhttps://www.2022.mscepuppss.in या अधिकृत संकेतस्थळावर वर भरू शकतो.

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी करिता ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा फक्त शाळांकरिता असते. विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत असेल त्या शाळेचे मुख्याध्यापक शाळेच्या लॉगिन वरून सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरू शकतात. विद्यार्थ्यांना वैयक्तिक रित्या शिष्यवृत्तीचे फॉर्म भरता येत नाहीत.

नफा तोटा सराव Online Test

2 thoughts on “Scholarship Exam 2025 इयत्ता पाचवी आणि आठवी होणार या तारखेला..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *