Skip to content

सर्वांसाठी अन्न स्वाध्याय इयत्ता 5 वी | sarvansathi ann swadhyay

  • by
सर्वांसाठी अन्न

सर्वांसाठी अन्न स्वाध्याय पाचवीच्या परिसर अभ्यास एक पाठ्यपुस्तकातील एक घटक आहे. यामध्ये आधुनिक शेती पद्धतीमुळे झालेले फायदे, रासायनिक खते व सेंद्रिय खत यांचा वापर याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

सर्वांसाठी अन्न स्वाध्याय

प्र १. काय करावे बरे ?

कुंडीतील रोप वाढत नाही.

कुंडीतील रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल त्या ठिकाणी ठेवावे. तसेच योग्य प्रमाणात पाणी घालावे. योग्य प्रमाणात खत द्यावे. त्यामुळे कुंडीतील रोप वाढत जाईल.

प्र २. जरा डोके चालवा.

घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो ?

काही पिके योग्य त्या हंगामात येतात. त्यामुळे घरामध्ये अन्नधान्य साठवतात. रोज रोज बाजारात जाऊन अन्नधान्य आणू शकत नाही त्यामुळे अन्नधान्य साठवले जाते. नैसर्गिक आपत्तीमुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून पुरेसे अन्न साठवले जाते.

प्र ३. चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

१) शेती करण्याची एकच पद्धत आहे.

चूक – शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत.

२) आपला भारत देश शेतीप्रधान आहे.

बरोबर

३) सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही.

चूक – सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढते

प्र ४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात ?

सुधारित बियाणांच्या वापरामुळे खालील फायदे होतात.

  1. सुधारित बियाणे अधिक पीक देतात.
  2. ती किडीला बळी पडत नाहीत.
  3. पिकांची वाढ झपाट्याने होते.
  4. काही बियाणे कमी पाण्यातही भरघोस पिक देतात.

आ ) सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या ? त्यांचे फायदे कोणते ?

ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत.

सुधारत सिंचनाच्या पद्धतींचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

  1. सुधारित सिंचन पद्धतीमुळे पाण्याची बचत होते.
  2. पिकाच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते.
  3. कमी पाण्यामध्ये अधिक शेती करता येते.
  4. पाणी वाया जात नाही.

इ ) ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा.

ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात. त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी त्यातून ठिबकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो. पाणी वाया जात नाही.

ई ) कोण कोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते ?

वाढत्या पिकांचे नुकसान खालील कारणामुळे होते.

  1. किडीमुळे किंवा रोग पडून पिकांचे नुकसान होते.
  2. वादळ, अतिवृष्टी व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते.
  3. काही वेळेस कमी प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळेही पिकाचे नुकसान होते.

उ ) पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात ?

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खालील प्रमाणे उपाय योजले जातात.

  1. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात.
  2. बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधे चोळतात.
  3. योग्य प्रमाणात रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर केला जातो.
  4. पुरेशा प्रमाणात पाणी दिले जाते.

ऊ) जमिनीचा कस कशामुळे कमी होतो ?

जमिनीचा कस खालील कारणामुळे कमी होतो.

  1. जमिनीमध्ये तीच तीच पिके घेतली गेल्यास जमिनीचा कस कमी होतो.
  2. रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो.
  3. शेतीसाठी पाण्याच्या अतिवापर केल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो.

ए) आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत ?

  1. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुधारित बियाणांचा शोध लागला. सुधारित बियाणांच्या वापरामुळे पिकांची वाढ उत्तम होऊन भरघोस पिके येऊ लागली.
  2. शेतीच्या मशागतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीची मशागत उत्तम प्रकारे होऊ लागली.
  3. तुषार सिंचन ठिबक सिंचन यासारख्या आधुनिक पद्धतीने मुळे पाण्याची बचत होऊन कमी पाण्यामध्ये अधिक शेती करता येऊ लागली.
  4. कीड व रोगामुळे शेतीचे होणारे नुकसान आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी झाले.

ऐ) कोण कोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते?

धान्य टिकवण्याच्या पुढील प्रमाणे पद्धती आहेत.

  1. धान्य चांगल्या प्रकारे वाळवून टिकवता येते.
  2. धान्य टिकवण्यासाठी धान्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकला जातो.
  3. धान्याला कीड लागू नये म्हणून काही धान्य संरक्षक औषधे वापरली जातात.
  4. धान्य साठवण्याची जागा कोरडी हवेशीर ठेवली जाते.
  5. धान्य साठवण्यासाठी योग्य साधनांचा वापर केला जातो.

ओ) शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते?

भारतामध्ये बरीचशी शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त शेतीसाठी नदी, तलाव, विहिरी व बोरवेल यासारख्या स्त्रोतांचा वापर केला जातो. नद्यावर धरणे बांधून त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. कालवे, नैसर्गिक झरे यांचाही वापर शेतीसाठी केला जातो.

प्र 5. योग्य जोड्या जुळवा.

गट अगट ब
1. दमट हवेतील अन्नसाठाबुरशी लागणे
2. कोरड्या हवेतील अन्नसाठाअण्णाला बुरशी न लागणे.
3. अन्नसाठ्यात औषधे ठेवणे.कीड मुंगी न लागणे.
सर्वांसाठी अन्न स्वाध्याय

आपणच सोडवू आपले प्रश्न स्वाध्याय इयत्ता 5 वी

Thanks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *