गणितातील संयुक्त संख्या ( Sanyukt Sankhya ) आणि मूळ संख्या या दोन संकल्पना समजून घेणे खूप आवश्यक आहे. या दोन्ही संकल्पना परस्परावलंबी आहेत. म्हणजेच मूळ संख्या समजल्यानंतर उर्वरित संख्या या संयुक्त संख्या असतात. या ठिकाणी आपण संयुक्त संख्या म्हणजे काय?, एक ते शंभर मधील संयुक्त संख्या, संयुक्त संख्यांची वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत.
संयुक्त संख्या ( Sanyukt Sankhya ) म्हणजे काय?
ज्या संख्येला तीन किंवा तीन पेक्षा जास्त अवयव असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजेच संयुक्त संख्या तीन किंवा तीन पेक्षा जास्त संख्येच्या पाढ्यांत असतात. संयुक्त संख्या तीन पेक्षा जास्त संख्यांनी विभाज्य असतात.
उदा.-12 या संख्येचे विभाजक- 1, 2, 3, 4, 6, 12 आहेत. म्हणजेच बारा या संख्येला एकूण सहा विभाजक आहेत. म्हणून बारा ही संख्या संयुक्त संख्या आहे. मूळ संख्यांना फक्त दोनच विभाजक असतात.
Sanyukt Sankhya 1 to 100 | एक ते शंभर मधील संयुक्त संख्या
एक ते शंभर मध्ये 25 मूळ संख्या व 74 संयुक्त संख्या आहेत. एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही. तीन किंवा तीन पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या म्हणजेच संयुक्त संख्या खालील प्रमाणे आहेत.
संख्यांचा गट | संयुक्त संख्या | एकूण संयुक्त संख्या |
1 ते 10 मधील संयुक्त संख्या | 4, 6, 8, 9, 10 | 5 |
11 ते 20 मधील संयुक्त संख्या | 12, 14, 15, 16, 18, 20 | 6 |
21 ते 30 मधील संयुक्त संख्या | 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 30 | 8 |
31 ते 40 मधील संयुक्त संख्या | 32, 33, 34, 35, 36, 38, 39, 40 | 8 |
41 ते 50 मधील संयुक्त संख्या | 42, 44, 45, 46, 48, 49, 50 | 7 |
51 ते 60 मधील संयुक्त संख्या | 51, 52, 54, 55, 56, 57, 58, 60 | 8 |
61 ते 70 मधील संयुक्त संख्या | 62, 63, 64, 65, 66, 68, 69, 70 | 8 |
71 ते 80 मधील संयुक्त संख्या | 72, 74, 75, 76, 77, 78, 80 | 7 |
81 ते 90 मधील संयुक्त संख्या | 81, 82, 84, 85, 86, 87, 88, 90 | 8 |
91 ते 100 मधील संयुक्त संख्या | 91, 92, 93, 94, 95, 96, 98, 99,100 | 9 |
संयुक्त संख्येची (Sanyukt Sankhya) वैशिष्ट्ये
- एक ते शंभर मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत.
- संयुक्त संख्यांना तीन किंवा तीन पेक्षा जास्त विभाजक असतात.
- सर्वात कमी 5 संयुक्त संख्या एक ते दहा च्या गटात आहेत तर सर्वात जास्त 9 सख्या 91 ते 100 च्या गटांमध्ये आहे.
- एक ते शंभर मधील संयुक्त संख्या मध्ये 25 विषम संख्या व 49 समसंख्या आहे.
- एक अंकी पाच संयुक्त संख्या आहेत. तर दोन अंकी 69 संख्या आहेत.
- सर्वात लहान संयुक्त संख्या चार आहे.
- दोन अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या 99 आहे.
- सर्वात लहान दोन अंकी संयुक्त संख्या 10 आहे.
संयुक्त संख्येवर आधारित अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेत विचारले जातात. उदा-गटात न बसणारी संख्या, क्रमाने पुढे येणारी संख्या, एकूण संयुक्त संख्या इ.