Skip to content

Sanyukt Rashtre Swadhyay 9 vi | संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय इयत्ता नववी

  • by
Sanyukt Rashtre Swadhyay

Sanyukt Rashtre Swadhyay: दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. या युद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्याने ती हानी अधिकच वाढली. अशा प्रकारची विनाशकारी युद्ध थांबली पाहिजेत, ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे; असा विचार सर्वच राष्ट्रे करू लागली. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघासारखी एक यंत्रणा निर्माण झाली पाहिजे. या विचारातून दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्रे संघटनेची स्थापना करण्यात आली.

या ठिकाणी आपण संयुक्त राष्ट्रे या घटकावरील Sanyukt Rashtre Swadhyay अभ्यासणार आहोत.

Sanyukt Rashtre Swadhyay संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

प्रश्न १) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१) पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ?

अ) अमेरिका

ब) रशिया

क) जर्मनी

ड) चीन

उत्तर – क) जर्मनी

२) भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था.

अ) युनिसेफ

ब) युनेस्को

क) विश्वस्त मंडळ

ड) रेडक्रॉस

उत्तर – ब) यूनिसेफ

३) संयुक्त राष्ट्रे Sanyukt Rashtre Swadhyay संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या –

अ) १९०

ब) १९३

क) १९८

ड) १९९

उत्तर – ब) १९३

प्रश्न २) पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

१) आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्यात व्यासपीठ आहे.

उत्तर -बरोबर

कारण जगातील सर्व देश आम सभेचे सभासद असतात, हे सर्व प्रतिनिधी अधिवेशनात पर्यावरण, शस्त्रीकरण अशा महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करतात व निर्णय बहुमताने घेतला जातो. सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या जागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी आमसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

२) संयुक्त राष्ट्र मधील सर्व सदस्य राष्ट्रांच्या दर्जा समान नसतो.

उत्तर – चूक

जगातील सर्व सार्वभौम राष्ट्रीय संयुक्त राष्ट्रांचे सभासद आहेत. ही राष्ट्रे आमसभेची सभासद असतात, देश श्रीमंत असो की गरीब छोटा असो की मोठा, सर्व सभासद राष्ट्रांचे स्थान व दर्जा समान असतो. सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते म्हणून संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो.

३) चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संयम होऊ शकतो.

उत्तर – चूक

कारण चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र आहे. सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य असणाऱ्या पाच राष्ट्रांना नकाराधिकार आहे. नकाराधिकार असणाऱ्या एका राष्ट्राने जरी हा अधिकार वापरला तरी तो ठराव मंजूर होऊ शकत नाही म्हणून चिनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संवाद होऊ शकणार नाही.

४) संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. Sanyukt Rashtre Swadhyay

उत्तर -बरोबर

कारण संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेविषयीच्या ज्या परिषदा झाल्या त्यात भारत सहभागी होता. भारताने निर्वसाहतीकरण, नि: शस्त्रीकरण, वंशभेद असे विविध प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उपस्थित केले. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारताने आपले सैन्य पाठवले आहे. अशा रीतीने भारताने सुरुवातीपासूनच राष्ट्रांच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

Sanyukt Rashtre Swadhyay संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

प्रश्न ३) पुढील संकल्पना स्पष्ट करा.

१) नकाराधिकार

उत्तर -एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाऱ्याला नकाराधिकार असे म्हणतात. सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य व किमान चार इतर काही सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते. परंतु कायम सदस्यांपैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले तरी तो निर्णय अमान्य होतो.

२) यूनिसेफ

उत्तर -आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बालकांच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी यूनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक सलग्न शाखा 1946 साली स्थापन करण्यात आली. लहान मुलांना सकस आहार व आरोग्यसेवा पुरवण्याचे काम युनिसेफ करते. बाल कुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात? याबाबत यूनिसेफ अविकसित देशात कार्यशाळा ही आयोजित करते. न्यूयॉर्क येथे मुख्य कार्यालय आहे.

Sanyukt Rashtre Swadhyay संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

प्रश्न ४) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१) संयुक्त राष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा. Sanyukt Rashtre Swadhyay

उत्तर -दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. या युद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्याने ती हानी अधिकच वाढली. अशा प्रकारची विनाशकारी युद्ध थांबली पाहिजेत, ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे; असा विचार सर्वच राष्ट्रे करू लागली. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघासारखी एक यंत्रणा निर्माण झाली पाहिजे. या विचारातून दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली.

२) संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणत्या भूमिका बजावते.

उत्तर – संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना पुढील भूमिका बजावते –

१) संघर्ष ग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते.

२) शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते.

३) शांतता रक्षणासाठी विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करते.

४) सुरक्षेबरोबरच राजकीय आणि सामाजिक शांतता बांधण्यासाठी सहाय्य करते.

३) संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा.

उत्तर -संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेची पुढील उद्दिष्टे आहेत-

१) जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे.

२) राष्ट्रराष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आर्थिक सहकार्य वाढवणे.

३) आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.

४) मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.

Sanyukt Rashtre Swadhyay संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

प्रश्न ५) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

१) संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारी पुढील तक्ता पूर्ण करा.

क्रशाखासदस्य संख्याकार्य
१.आमसभाप्रत्येक सदस्य राष्ट्राचे पाच प्रतिनिधी (193 देश सदस्य आहेत)१) पर्यावरण,वंश द इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नांवर आमसभेत चर्चा करून ठराव संयत करणे.
२) रक्षा समितीवर अस्थायी सदस्यांची निवड करणे.
३) संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे.
३) संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे.
२.सुरक्षा समिती५ स्थायी व १० अस्थायी असे एकूण १५ सदस्य१) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे.
२) शास्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे.
३) आम सभेचे बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व संयुक्त राष्ट्रांचे महासचिव यांची निवड करते.
३.आंतरराष्ट्रीय न्यायालय१५ न्यायाधीश१)
सदस्य स्टेशन मधील तट्टे सोडवणे.
२)
आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे.
३)
संयुक्त राष्ट्राच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायद्यांची संबंधित प्रश्नांवर सल्ला देणे.
४. आर्थिक व सामाजिक परिषद५४ सदस्य१) दारिद्र्य, बेरोजगारी,आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे.
२) स्त्रियांचे प्रश्न महिला सक्षमीकरण मानवी हक्क मूलभूत स्वातंत्र्य जागतिक व्यापार आरोग्य विषयक समस्या अशा प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे.
३)
आंतरराष्ट्रीय स्वरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य निर्माण करणे.
४)
संयुक्त राष्ट्रांच्या संलग्न संघटनांच्या कामात सूत्रता व समन्वय राखणे.

२) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेची कार्यक्रम पुढील कालरेषेवर लिहा.

१९४१ – अटलांटिक करार

१९४४ – आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यावर चर्चा

१९४५ – संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना

Sanyukt Rashtre Swadhyay संयुक्त राष्ट्रे स्वाध्यायाशी संबधित आणखी काही प्रश असल्यास कमेंट मध्ये लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *