सलाम नमस्ते हा इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ आहे.सदर पाठाच्या लेखिका सुधा मूर्ती आहेत. या ठिकाणी आपण सलाम नमस्ते स्वाध्याय म्हणजेच सलाम नमस्ते पाठावरील प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत. सुधा मूर्तींची ही इंग्रजी मधील मूळ गोष्ट आहे. त्याचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.
लेखिकेने या पाठात शेख महंमद आणि त्याची बहीण झुबेदा यांच्यातील प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, माणुसकी इत्यादी गुणांची जाणीव या पाठांमध्ये होते. अत्यंत गरीब परिस्थिती असूनही त्यांच्यामध्ये असणारी दातृत्व वृत्ती आणि स्वाभिमान दिसून येतो. आर्थिक उत्पन्न कमी असूनही त्यामध्ये समाधानाने जगणारे कुटुंब म्हणजे शेख मोहम्मदचे कुटुंब.
सलाम नमस्ते स्वाध्याय
प्र. १) खालील वाक्यांमधून सलाम नमस्ते पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.
अ) लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत: परोपकार, सहकार्य वृत्ती
आ) ‘माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त.’ : मायाळू, प्रेमळपणा
इ) ‘‘मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे.’’ : सहानुभूती , मनाचा मोठेपणा
ई) ‘‘मॅडम, तुम्हांला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती.’’: कृतज्ञता
उ) त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. : सहसंवेदना
प्र. २. स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
झुभेदाचा भाऊ – शेख महंमद यांची स्वभाववैशिष्ट्ये
उत्तर: १) प्रामाणिकपणा २) माणुसकी ३) कष्टाळू वृत्ती ४) कृतज्ञता ५) प्रेमळपणा
प्र. ३) शेख महंमद मार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते?
उत्तर: मिळालेल्या मदतीचा उपयोग त्याच कामासाठी करावा. तो खर्च भागवल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. मदत मिळालेल्या वस्तूचा अथवा पैशाचा वापर काटकसरीने करावा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण झुबेदाच्या कृत्यातून शिकता येईल.
या ठिकाणी सलाम नमस्ते स्वाध्याय मध्ये दिलेले हे प्रश्नाचे उत्तर हे नमुना स्वरूपामध्ये आहे या उत्तरांमध्ये आप आपल्या विचारानुसार बदल होऊ शकतो.
प्र. ४. लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत सांगा.
लेखिकेच्या मते तबस्सुमची आई वारल्यामुळे ती पोरकी झाली होती. ऑफिसमध्ये ती नवीन लोक पाहून बावरली होती. लेखिकेला तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल, याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या.
खेळूया शब्दांशी.
खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.
१) ऑफिस- कार्यालय
२) चेक- धनादेश
३) हॉस्पिटल- दवाखाना, रुग्णालय
४) ॲडव्हान्स- आगाऊ रक्कम
५) ऑपरेशन- शस्त्रक्रिया
६) कॅन्सर- कर्करोग
प्र.५) खालील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यये लिहा.
(अ) ………….. काय सुंदर आहे ताजमहाल!
उत्तर: अहाहा! काय सुंदर आहे ताजमहाल
(आ) ………. किती जोरात ठेच लागली!
उत्तर: आई ग ! किती जोरात ठेच लागली!
(इ) ………….. किती उंच आहे ही इमारत!
उत्तर: अबब ! किती उंच आहे ही इमारत!
सलाम नमस्ते स्वाध्याय सोडवण्यात आला आहे. या पाठावर अजून काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स मध्ये लिहा.