शैक्षणिक वर्ष 2024 25 या वर्षांमध्ये प्रवेश घेण्यासाठी RTE 25 school registration सर्व पात्र शाळांनी ऑनलाइन करायचे यामध्ये खासगी शाळा सह सर्व शासकीय शाळांनी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. यासाठी प्रत्येक पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ पणे संकेतस्थळावर अद्यावत करावयाचे आहे. सदर माहिती संकेतस्थळावर कशाप्रकारे अद्यावत करायची याविषयीची माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
RTE 25 school registration process
RTE 25 school registration खालील टप्प्यानुसार करायचे आहे.
- सर्वप्रथम आपल्या फोन मधील अथवा लॅपटॉप मधील ब्राउझर ओपन करा.
- त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये आपल्याला www.education.maharashtra.gov.in टाईप करून सर्च करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे अधिकृत पेज ओपन होईल.
- त्यामध्ये आपल्याला निरनिराळी पोर्टल दिसतील त्यातील RTE 25 % ऍडमिशन याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
- या टॅब वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर RTE 25 % Admission Portal चे नवीन पेज ओपन होईल.
- यामध्ये वरील भागामध्ये आपल्याला निरनिराळे लॉगिन ऑप्शन दिसतात.
- त्यातील Admin/ School Login याच्यावर क्लिक करा.
- आपल्या समोर लॉगिन होण्यासाठी पेज ओपन होईल.
- लॉगिन होण्या अगोदर वरील भागामध्ये निरनिराळ्या व्यक्तींसाठी लॉगिन च्या टॅब आहेत. त्यातील हेडमास्टर या टॅबला क्लिक करा.
- त्यानंतर लॉगिन साठी आवश्यक युजर आयडी म्हणजेच आपल्या शाळेचा यु-डायस नंबर टाका व शिक्षण विभागाने दिलेला डिफॉल्ट पासवर्ड टाका. हा सर्व शाळांसाठी सारखाच असतो.
- त्यानंतर वरील बॉक्समध्ये दिसणारा कॅपच्या टाकून लॉगिन करा.
- पहिल्यांदा लॉगिन करताना आपल्याला आपल्या शाळेचा नवीन पासवर्ड तयार करावा लागतो. नवीन टॅब मध्ये जुना पासवर्ड डिफॉल्ट येतो व त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड तयार करायचा आहे.
- तयार केलेला पासवर्ड दोन टॅब मध्ये टाकून पासवर्ड तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
- त्यानंतर पुन्हा नवीन लॉगिन पेजवर येऊन आपल्याला यु डायस नंबर, नवीन तयार केलेला पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन करताच आपल्याला खालील प्रमाणे नवीन पेज दिसून येईल.
- या पेजवर आपल्याला शाळेचा यु डायस नंबर, शाळेचे नाव, केंद्राचे नाव, बोर्ड, मॅनेजमेंट प्रकार आणि शाळेचा प्रकार दिसून तो तपासा व त्यानंतर या पेज मध्ये आपल्याला मुख्याध्यापकांची माहिती अपडेट करायची आहे. या पेजवर आपल्याला जुन्या मुख्याध्यापकाची माहिती दिसत असेल तर त्या ठिकाणी सध्याचे मुख्याध्यापकांचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, शाळेचा ई-मेल आयडी, मुख्याध्यापकांची जन्मतारीख व शाळेचा संपर्क क्रमांक इत्यादी माहिती नोंदवून Save & Proceed करावे.
- त्यानंतर ऍड्रेस ची टॅब ओपन होईल. जर ओपन नाही झाली तर वरील भागामध्ये ऍड्रेस ची टॅब दिसेल त्यावर क्लिक करा. या ठिकाणी आपल्या येथे स्कूल ऍड्रेस दिसून येईल तो बरोबर असल्यास yes टॅब वर क्लिक करा नसल्यास त्या खालल बॉक्समध्ये अचूक ऍड्रेस टाका. आपल्या शाळेचे अक्षांश आणि रेखांश अचूक असल्याची खात्री करा. त्यानंतर आपल्या शाळेच्या परिसरात एक किलोमीटर अंतरापेक्षा जास्त अंतरावर पूर्व प्राथमिक वर्ग आहेत का या ऑप्शनचे योग्य उत्तरावर क्लिक करा.
- त्यानंतर त्याखालील Save & Proceed या टॅब वर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्यासमोर आर टी डिटेल्स ची नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये RTE 25 टक्के साठी शाळा पात्र आहे की नाही या पर्यायांमध्ये योग्य पर्याय निवडा. त्यानंतर आपल्यासमोर शाळेचा प्रकार एन्ट्री लेवल म्हणजे सर्वात खालचा वर्ग आणि सर्वात वरचा वर्ग ही माहिती दिसून येईल. यामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला गटशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क करावा लागेल. त्याखाली आपल्याला पहिलीचे कमीत कमी वय व जास्तीत जास्त वय याची सविस्तर माहिती दिसेल यामध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही. सर्व माहिती बरोबर आहे का ते तपासा व असल्यास आपल्यालाSave & Proceed या वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर पुढील टॅब वेकेन्सी नावाची ओपन होईल. यामध्ये आपल्याला आपल्या शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये मागील तीन वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सरासरी काढून एव्हरेज सरासरी ही पात्र संख्येमध्ये दिसून येईल. इथेही आपल्याला बदल करता येत नाही बदल करावयाचा झाल्यास आपण गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. सदर माहिती तपासून फॉरवर्ड टू BEO वर क्लिक करा.
- त्यानंतर या टॅबवर आपल्याला आपल्या शाळेचे संपूर्ण माहिती दिसून येईल. ती माहिती काळजीपूर्वक तपासा. संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला फॉरवर्ड फी सबमिट आणि फॉरवर्ड या टॅब वरती क्लिक करायचं आहे. या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती बदल करता येणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पाहून फॉरवर्ड करा.
- फॉरवर्ड केल्यानंतर आपल्या शाळेच्या डिटेल्स मध्ये स्टेटस या टॅब मध्ये आपल्याला फॉरवर्ड टू BEO हा मेसेज दिसेल. या ठिकाणी आपल्या शाळेचे नोंदणी पूर्ण झालेली आहे.
- जि प शाळांना सध्या नोंदणी करताना बँक डिटेल्स भरण्याची आवश्यकता नाही.
अशाप्रकारे घरबसल्या आपल्या मोबाईलवरून अथवा लॅपटॉप वर आपण RTE 25 % यासाठी आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करू शकतो.
Pingback: MDM App Download in Maharashtra कसे करावे?