अरण्यलिपी
अरण्यलिपी या पाठाचे लेखक आहेत सुरेशचंद्र वारघडे. लेखकाने या पाठांमध्ये जंगली प्राण्यांच्या बाबतीत मजेशीर आणि उद्बोधक माहिती विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे. जंगलामध्ये फिरत असताना जंगली प्राण्यांच्या पायाच्या ठशावर त्यांच्याविषयीची माहिती मिळवू शकतो. जंगली प्राण्यांच्या पावलांच्या ठशावरून ते प्राणी कोणते आहेत, इतकेच नाही तर त्या प्राण्यांमध्ये ठाशावरून तो प्राणी नर आहे की मादी आहे असा भेद ही ओळखता येतो.
लेखकाने या पाठांमध्ये अतिशय मनोरंजक पद्धतीने प्राण्यांविषयी ची माहिती सांगितली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती कायमस्वरूपी स्मरणात राहण्यास मदत होईल. पाठाचे वाचन करत असताना जंगल विषयक निरनिराळ्या नवीन शब्दांची ओळख या पाठांमध्ये होते. निरनिराळ्या प्रकारचे प्राणी त्यांची नावे समजतात.
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) ‘अरण्यलिपी ‘ म्हणजे काय ?
जंगलात सगळीकडे विरखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाणाखुणांना ‘अरण्यलिपी ‘ म्हणतात.
२) वाघांची गणती कशावरून केली जाते ?
वाघांच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गणती केली जाते.
३) जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात ?
जंगलात हरीण, सांबर, काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात.
४) कोणत्या प्राण्याचा ठसा सुबक दिसतो?
जंगलात वावरणाऱ्या जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो.
प्र २) पुढील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.
१) ‘ वाघाचे क्षेत्र ‘ कशावरून ओळखता येते ?
आपल्या पावलांचा आवाज होऊ नये, म्हणून वाघ पालापाचोळ्यातून चालत नाही. तो पाऊलवाटेवरून किंवा नदीनाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो. अशा पाऊलवाटा किंवा नदी नाल्यातली ओली वाळू तपासावी. त्या मातीत वाघाचे पाऊलठसे आढळतात. त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते.
२) वाघ – वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो?
वाघ – वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात. पण त्यांच्या मागच्या पंजांत फरक असतो. वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात, तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात.
३) शिकार झालेला प्राणी कोणता होता, हे कशावरून ओळखता येते?
काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांची न पचलेले भाग जसे केस, नखे व हाडे आढळतात. या न पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेला प्राणी कोणता होता, हे ओळखता येते.
प्र ३) मूळ शब्द ठसा. या शब्दाचे सामान्य रूप होताना ‘स ‘ चा ‘ श ‘ होतो. उदा., ठशावरून, ठशात, ठशांचा इत्यादी. त्याप्रमाणे पैसा, म्हैस या शब्दांची सामान्य रूपे लिहा.
१) पैसा – पैशाने, पैशाचा, पैशात, पैशांवरून.
२) म्हैस – म्हशीने, म्हशीला, म्हशीचा, म्हशींवरून, म्हशीत.
प्र ४) अरण्यलिपी या पाठात पालापाचोळा, झाडेझुडपे, नदीनाले हे जोडशब्द आले आहेत. यासारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा.
१) कामधंदा २) झाडलोट ३) केरकचरा ४) पाटपाणी
प्र ५) ‘ मजा ‘ या शब्दाला ‘ शीर ‘ हा शब्द लावून ‘मजेशीर ‘ हा शब्द तयार झाला आहे. यासारखे शब्द शोधा.
१) गमतीशीर २) हवेशीर ३) आटोपशीर ४) कायदेशीर
प्र ६) पुढील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा.
१) ते बाजारात गेले.
२) तुला त्यांनी हाका मारल्या.
३) आम्ही जेवत होतो.
४) त्याचा आवाज गोड आहे.
५) मी स्वतः झाडून घेतले.
६) आपण प्रकल्प पूर्ण करूया.
मुंग्यांच्या जगात स्वाध्याय
प्र ७) पुढे काही वाक्य दिले आहेत. त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा.
१) हसीना खूप हुशार आहे. ती रोज शाळेत जाते.
२) पक्षी उडत उडत लांब गेले. ते दिसेनासे झाले.
३) बाई मुलांना खाऊ वाटत होत्या. त्या मुलांशी गप्पा मारत होत्या.
४) भाऊ घरात गेला. त्याला काही सुचेना.
प्र ८) सर्वनाम म्हणजे काय? या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा.
नामाबद्दल आलेल्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. अरण्यलिपी पाठांमध्ये खालील सर्वनामे आलेली आहे.
आपण, आपल्याला, त्यांच्या, त्या, त्यात, तुम्हांस, आपला, तो ,ते ,हे ,त्याचा, यांच्या, ती, ही अशी सर्वनामे या पाठात आलेली आहेत.
अरण्यलिपी पाठावर आधारित आणखी काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.Read More »अरण्यलिपी स्वाध्याय इयत्ता 5 वी | Aranya lipi swadyay