जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 2025 ही इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता घेतली जाते. या परीक्षेमध्ये पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जातो. जवाहर नवोदय विद्यालये ही केंद्र शासनामार्फत चालवली जातात.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवोदय विद्यालय परीक्षा 2025 प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची मुदत, आवश्यक कागदपत्रे, मुख्याध्यापक प्रमाणपत्र डाऊनलोड करणे, फॉर्म भरण्याची प्रक्रिया, परीक्षेचे वेळापत्रक इत्यादी विषयाची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म भरण्याची मुदत Navodaya form last date
नवोदय विद्यालय परीक्षा 2025 प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो. या परीक्षेला बसण्यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म स्वीकारले जातात. जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर फॉर्म भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख Navodaya vidyalaya exam form last date 23 सप्टेंबर 2024 आहे. 23 सप्टेंबर पर्यंत पात्र विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या संकेत स्थळावर आपला अर्ज सादर करू शकतात.
फॉर्म भरण्याची मुदत 23 सप्टेंबर पर्यंत असली तरी शेवटच्या टप्प्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाल्याने साइटवर लोड येऊन वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने शक्यतो नवोदय विद्यालय परीक्षा 2025 चे फॉर्म लवकरात लवकर भरून घेणे आवश्यक असते.
नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी किंवा आपण फॉर्म भरायला जाण्यापूर्वी सदर कागदपत्रे आपण आपल्याजवळ घ्यावेत. फॉर्म भरताना लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
- विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीचा विद्यार्थ्यांच्या मागील तीन वर्षे शिकत असलेल्या शाळांचा तपशील व विद्यार्थ्यांची माहिती असलेला फॉर्म योग्य फॉरमॅटमध्ये घेणे आवश्यक आहे. सदर फॉर्म चा फॉरमॅट डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
- फॉर्म भरतेवेळी 10 ते 100 KB साईज असलेली विद्यार्थ्यांची सही अपलोड करणे आवश्यक असते.
- सर्व कागदपत्रे जेपीजी JPG फॉरमॅटमध्ये स्कॅन केलेली असावीत.
- विद्यार्थ्यांच्या सही बरोबर पालकांची सही सुद्धा 10 ते 100 KB पर्यंतच्या साईज मध्ये असावी.
- विद्यार्थ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना आधार लिंक मोबाइल नंबर वर ओटीपी येऊन विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आधार मार्फत घेतली जाते. त्यामुळे आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- जर आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म भरत असलेल्या जिल्ह्याचे रहिवास असल्याबाबतचा योग्य दाखला अपलोड करणे आवश्यक असते. यामध्ये आपण तहसीलदारांमार्फत दिला जाणारा रहिवाशी दाखला अपलोड करू शकता.
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो 10 ते 100 KB च्या दरम्यानचा असावा.
वरील सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये आणि जेपीजी JPG फॉर्मेट मध्ये असणे आवश्यक आहे.
Previous Scholarship Exam Paper for class 5 | शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर
Navodaya Exam Date 2025 नवोदय विद्यालय परीक्षा 2025 ची तारीख
जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 2025 ची तारीख Navodaya Exam Date 2025 रविवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी आहे. महाराष्ट्र मध्ये नवोदय विद्यालयची 2024- 25 ची परीक्षा रविवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी 11.30 वाजता होणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म कसा भरावा? Navodaya From fill up process
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 करिता आपण फॉर्म खालील टप्प्यांच्या आधारे भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी लॅपटॉप अथवा आपल्या मोबाईलचा ही वापर करता येतो. फॉर्म भरण्यासाठी वर दिलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून घेणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे स्कॅनर उपलब्ध नसेल तर आपण आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून स्कॅन करू शकता; मात्र त्यासाठी दिलेल्या साईजमध्ये ऑनलाईन सदर फोटो योग्य साईज मध्ये करणे आवश्यक आहे.
- सर्वात प्रथम आपल्या फोनमधील अथवा संगणकामधील ब्राउझर ओपन करा.
- ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये नवोदय विद्यालय समिती टाईप करा. किंवा इथे क्लिक करा.
- त्यानंतर आपल्या समोर येणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे एक नवीन पेज ओपन होईल.
- ओपन झालेल्या या पेजवर आपल्याला click here for submit online application form for class 6 Jawahar navoday vidyalay selection test 2025 असा मजकूर असलेली एक लिंक दिसेल त्या लिंक वरती क्लिक करा.
- लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेज वरती एक नंबर वर आपल्याला Click here for registration for class 6 JNVST 2025-26 अशी एक लिंक करशील त्या लिंक वरती क्लिक करा.
- त्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर आवश्यक ती माहिती भरा. यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये सदर विद्यार्थी पाचवी पास आहे का? असा प्रश्न दिसेल या ठिकाणी आपल्याला No सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नांमध्ये मागील वर्षांमध्ये त्यांना नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली होती का? असा प्रश्न आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला No सिलेक्ट करायचे आहे.
- त्यानंतर माहिती पुस्तिका वाचली आहे का? असा प्रश्न आहे या ठिकाणी आपण Yes सिलेक्ट करायचा आहे. जर माहिती पुस्तिका पाहिली नसेल तर तिथे लिंक वर क्लिक करून आपण ती डाऊनलोड करून घेऊन वाचन करू शकता.
- त्यानंतर सदर विद्यार्थी रहिवाशी असलेल्या जिल्ह्यातच शिक्षण घेत आहे का? असा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला Yes सिलेक्ट करायचे आहे.
- त्यानंतर मुख्याध्यापकांनी दिलेले प्रमाणपत्र आहे का? असा प्रश्न आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला Yes सिलेक्ट करायचे आहे.
- त्यानंतर सदर विद्यार्थी 31 जुलै 2024 पूर्वी चौथी तून पाचवीच्या वर्गामध्ये गेलेला आहे का? असा प्रश्न आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला होय निवडायचे आहे.
- त्यानंतर सर्वात शेवटचा बॉक्स मध्ये आपल्याकडे आधार कार्ड आहे का? असा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला Yes सिलेक्ट करायचा आहे. त्याखाली आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. तो ओटीपी भरल्यानंतर आपली संपूर्ण माहिती फॉर्ममध्ये ऑटोमॅटिक भरली जाईल.
- जर आपला मोबाईल नंबर आधार ला लिंक नसेल तर आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
- ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर आपल्यासमोर नवीन फॉर्म ओपन होईल जर आपण आधार लिंक असेल तर त्यामध्ये बरीचशी माहिती ऑटोमॅटिक भरली जाईल व काही आवश्यक माहिती भरून स्कॅन केलेल्या फोटो व सह्या योग्य ठिकाणी अपलोड करून आपण आपला फॉर्म सबमिट करू शकता.
- जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 2025 फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
DOWNLOAD JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA SELECTION TEST-2025 HEAD MASTER CERTIFICATE
विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीचे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.