MDM App Download : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमितपणे मध्यान्ह भोजन दिले जाते. या दिलेल्या मध्यान्ह भोजनची नोंद ऑनलाईन पद्धतीने MDM पोर्टलवर केली जाते. त्यासाठी MDM App Download करून त्यावरून ही नोंदणी करता येते. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या MDM Portal वर सुद्धा ही माहिती भरता येते.
या पोस्टमध्ये आपण मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत MDM APP Download कसे करायचे? MDM APP Download केल्यानंतर OTP failed अशा प्रकारचा संदेश येत असल्यास काय करावे? व ॲप वापरा विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
MDM App Download process 2024 in Marathi
सन 2024-25 चे शैक्षणिक वर्ष 15 जून 2024 रोजी सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आपल्याला शालेय पोषण आहाराची ( प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना) माहिती भरण्यासाठी MDM App ची आवश्यकता असते. MDM App हे गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध नसल्याने ते डाऊनलोड करताना अनेक समस्या येतात. त्यामध्ये बऱ्याच वेळा चुकीचे ॲप डाऊनलोड केले जाण्याची शक्यता असते.
MDM App डाऊनलोड करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे करू शकता.
- सर्वात प्रथम आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा.
- ब्राउजर ओपन केलं तर सर्च बॉक्स मध्ये https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk टाईप करा व सर्च करा. किंवा या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर app डाउनलोड वर क्लिक करून आपल्या फोन मध्ये हे ॲप डाऊनलोड करून घ्या.
- ॲप डाऊनलोड करताना हे ॲप प्ले स्टोअर व्यतिरिक्त mdm पोर्टल वरून डाऊनलोड केल्याने ॲप इन्स्टॉल करण्यासाठी आवश्यक संमती द्या.
अशाप्रकारे आपण हे MDM App Download करून आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करू शकतो.
MDM App OTP failed होत असल्यास काय करावे?
MDM App Download केल्यानतर बऱ्याचदा लॉगीन करताना आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP sending failed असा मेसेज येतो. आणि आपले लॉगीन होत नाही; त्यामुळे आपणास MDM माहिती भरता येत नाही. किंवा सदर माहिती वेबसाईट वरून माहिती भरावी लागते.
ही समस्या अपणास येण्याची करणे पुढील असू शकतात. १) आपण आपला मोबाईल हँडसेट बदलला असू शकतो किंवा २) आपल्या शाळेतील इतर दोन शिक्षकांच्या मोबाईलवर हे ॲप इन्स्टॉल व रजिस्टर असेल तर अशा प्रकारचा संदेश आपल्याला स्क्रीनवर दिसून येईल. कारण APP मध्ये फक्त दोन नंबर रजिस्टर करता येतात. MDM App OTP failed असा मेसेज दिसणाऱ्या शाळांनी ॲप चालू करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करा.
- MDM APP Install केल्यानंतर दैनदिंन माहिती भरण्यासाठी ज्या शाळांचा OTP FAIL येतो त्यांनी आपले mdm portal open करून लॉगीन पेज वर शाळेचा Udise नंबर व mdm पोर्टलचा Password टाकून त्याखाली कॅप्चा कोड टाका व LOGIN करा.
- लॉगिन केल्यानंतर होम पेजवर वरील आडव्या मेनू बारमध्ये आपल्याला ५ नंबरला App Setting Tab दिसेल.
- त्या tab वर क्लिक करा. त्याखाली जे पर्याय दिसतील त्यामध्ये जाऊन Change Device from MDM App वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला येथे रजिस्टर मोबाईल नंबर दिसेल त्याच्या पुढे असलेल्या Change Device वर Click करा. त्यानंतर तिथे रजिस्टर असलेला मोबाईल नंबर तेथुन निघुन जाईल.
- परत आपले MDM App मोबाईलवर Open करून त्यात UDISE नंबर, MOBILE NO टाका आणि send OTP वर क्लिक करा. आता आपल्या मोबाईलवर OTP येईल.
- तो ओटीपी आपल्या फोनमध्ये otp साठी असलेल्या बॉक्स मध्ये टाकून सबमिट करा.
- आता आपले लॉगीन पूर्ण होईल, लॉगीन नंतर आपल्या शाळेचे नाव दिसेल. व आपल्याला MDM data भारता येईल.
MDM App चालू न झाल्यास दैनंदिन माहिती कशी भरावी?
दैनंदिन माहिती भरण्यासाठी MDM App हा एकच पर्याय नाही. MDM App ज्या शाळांचे open, install होत नाही, OTP येत नाही किंवा अन्य काही Problem आहे त्या शाळांनी MDM ची दररोजची माहिती MDM Portal वर Udise नंबर व Password वापरून भरावी.
- ही माहिती भरण्यासाठी आपल्या फोनमधील सर्च बॉक्स मध्ये https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/ टाईप करून सर्च करा.
- शाळेचा Udise नंबर व mdm पोर्टलचा Password टाकून त्याखाली कॅप्चा कोड टाका व LOGIN करा.
- लॉगिन केल्यानंतर होम पेजवर वरील आडव्या मेनू बारमध्ये आपल्याला MDM Daily Attendance tab दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर वर्गवार आपली उपस्थिती भरा. योग्य मेनू निवडा.
- त्यानंतर सेव करा.
आशा प्रकारे आपण MDM पोर्टल वरही दैनंदिन पोषण आहार माहिती भरता येते.