महात्मा गांधी जयंती भाषण मराठी : महात्मा गांधीजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान व्यक्ती आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. अशा या महान नेत्याबद्दल महात्मा गांधी जयंती भाषण आपण पाहणार आहोत.
महात्मा गांधी जयंती भाषण मराठी
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, उपस्थित प्रमुख मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या जमलेल्या बालमित्रांना मी आज तुम्हाला महात्मा गांधी यांच्या बद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी नम्र विनंती आहे.
महात्मा गांधीजी यांचा जन्म आणि बालपण
महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळाबाई होते. लहानपणी कौटुंबिक वातावरण अत्यंत धार्मिक असल्यामुळे त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर दिसून येतो. विशेषता शाकाहार, सहिष्णुता, अहिंसा या तत्वांचे गुण लहानपणीच त्यांच्यामध्ये रुजले होते.
महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर मधील शाळेत झाले व माध्यमिक शिक्षण राजकोट मधील शाळेत झाले. शिक्षणामध्ये ते एक सर्वसाधरण विद्यार्थी होते. मॅट्रिकची परीक्षा त्यांनी भावनगर मधील श्यामलदास कॉलेजमधून दिली व ते पास झाले.
तत्कालीन प्रथेप्रमाणे इसवी सन 1883 मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधी यांचा विवाह कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर झाला.
महाविद्यालयीन शिक्षण
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1888 मध्ये ते इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले. इंग्लंडमधील लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये त्यांनी वकिलीच्या शिक्षणास प्रवेश घेतला. बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्याय शास्त्राचा त्यांनी अभ्यास केला.
बॅरिस्टर पदवी घेऊन ते भारतात आले. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. त्यांनतर ते आफ्रिकेला गेले.
आफ्रिकेतील कार्य
महात्मा गांधी यानि 1893 मध्य अफ्रीकेतील एका लॉ फार्म मध्ये नोकरी स्वीकारली. नोकरी करत असताना तेथे चालत असलेला काळा- गोरा भेदभाव त्यांच्या लक्षात आला. काळा आणि गोरा अशा प्रकारचा भेदभाव दक्षिण आफ्रिकेमध्ये केला जात होता.
महात्मा गांधी एकदा रेल्वेने प्रवास करत होते, त्यांच्याकडे प्रथम वर्गाचे रेल्वेचे तिकीट होते. मात्र ते भारतीय असल्याने त्यांना त्या डब्यातून उतरून तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजींनी या गोष्टीस नकार दिला तेव्हा त्यांना त्या डब्याच्या बाहेर ढकलून देण्यात आले. अशा प्रकारचा अन्याय आफ्रिकेमध्ये काळ्या लोकांवर होत होता. भारतीय व इतर लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी सत्याग्रह करण्याचे ठरवले. या आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. त्यानंतर आफ्रिकेत चालणाऱ्या या भेदभाव विरुद्धच्या आंदोलनांमध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1915 मध्ये गांधीजी आफ्रिका सोडून भारतात परत आले.
भारतीय स्वातंत्र्य लढा
इसवी सन 1915 मध्ये गांधीजी भारतात परत आले. भारतात आल्यानंतर भारतीय परिस्थितीचा व राजकारणाचा त्यांनी अभ्यास केला. यामध्ये त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी खूप सहकार्य केले. 1818 मध्ये चंपारण आणि खेडा येथे सत्याग्रह करून तो यशस्वी केला. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.
1920 मध्ये त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्याच्या मागणीबरोबरच गरिबीचे निर्मूलन, स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण या बाबीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.
महात्मा गांधीजी यांनी अहिंसा, असहकार व स्वदेशी या त्रिसूत्रीला नेहमी प्राधान्य दिले. इसवी सन 1930 मध्ये इंग्रज सरकारने मिठावर कर लादल्याने त्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढली. चारशे किलोमीटरचा प्रवास करून यात्रा अहमदाबाद पासून दांडीला पोहोचली. आणि दांडी येते गांधीजींनी मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला.
इ.स. १९३२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीनुसार ब्रिटिश सरकारने दलितांना वेगळे मतदारसंघ देण्याचा निर्णय घेतला. याविरोधात गांधीजींनी सहा दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्यात जो करार झाला त्याला पुणे करार म्हणतात.
1939 मध्ये जगात दुसरे महायुद्ध सुरू झाले. जगातील युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून इंग्रजांना कोंडीत पकडले. भारतात गांधीजींनी भारत छोडो आंदोलन (चले जाव चळवळ ) सुरू केले. भारत छोडो चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वात प्रभावी चळवळ ठरली. या चळवळीत सर्व भारतीय सहभागी झाले. भारतातील सर्व प्रदेशातून उठाव झाला. त्यावेळी भारतीयांना लाखोच्या संख्येने अटक झाल्या. मात्र कोणीही न डगमगता हे आंदोलन पुढे चालू ठेवल्याने इंग्रजांना हा भारत सोडून जाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. हे आंदोलन महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झाल्याने या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांचे योगदान मोलाची मानले जाते.
आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वतंत्र झाला. इंग्रज आपला देश सोडून निघून गेले. स्वातंत्र्या नंतर अवघ्या 6 महिन्यांनी महात्मा गांधी यांची हत्या 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे याने गोळ्या मारून केली.