Skip to content

12. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया स्वाध्याय

  • by
महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया स्वाध्याय

महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया स्वाध्याय

प्रश्न १) वैशिष्ट्ये लिहा.

अ) महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये –

  • यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर.
  • सोन्याची धरती त्यावर निवळ निळे आकाश.
  • महारतींना भूषवलेले किल्ले जिचे पोवाडे गातात.
  • अरबी समुद्र जिथे पाय धुतो.

आ) कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये –

  • धैर्यवंत शासनकर्ते वीर.
  • श्रम करणारे शेतकरी.
  • संत व शाहीर
  • धुरंधर श्री छत्रपती शिवराय.

प्रश्न २) असत्य विधान ओळखून लिहा.

१) धुरंदर शिवरायांना स्मरावे.

२) असत्यास्तव शिंग फुंकावे.

३) स्वातंत्र्याची आन घ्यावी.

४) जन्मभूमीचे उपकार फेडावे.

असत्य विधान – असत्यास्तव शिंग फुंकावे.

प्रश्न ३) कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्रबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.

उत्तर – महाराष्ट्र हे एक मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती ही सोने पिकवणारी आहे. येथील गड किल्ले महाराष्ट्र भूमीचे पोवाडे गातात. रतीमहारथींनी महाराष्ट्र भूमीला भूषविले आहे.

अरबी समुद्र जिच्या चरणांशी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधू संतांचा, शाहिरांचा, कष्टकरी लोकांचा, शेतकऱ्यांचा व धुरंदर शिवरायांचा आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला मी तयार आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता या कवितेतून व्यक्त झाली आहे.

महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया स्वाध्याय

प्रश्न ४) महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा.

उत्तर – या महाराष्ट्र रुपी मंदिरात यशाची ज्योती अखंड पाजळते आहे. महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे. हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे येथील गडकिल्ले गातात. महारथी शूर पराक्रमी योद्धांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. ही भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची, साधू संतांची, शाहिरांची व कष्टकरी यांची आहे. अरबी समुद्र महाराष्ट्र भूमीच्या चरणांशी लीन आहे. स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकुन महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या श्री छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची बलस्थाने आहे.

प्रश्न ५) काव्यसौंदर्य.

अ) ‘धर ध्वजा करे ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची’ या काव्यपंक्तीचा विचार सौंदर्य लिहा.

उत्तर – मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, तेव्हा त्याला काहीजणांनी विरोध दर्शवला. खूप साधकबाधक चर्चा झाली; परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा ध्यास घेतला होता. त्या दृष्टीने हे काम मराठी माणसे प्राणपणाने करीत होती. त्यांच्या एकजुटीमध्ये फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की; ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे. ती पूर्ण करण्यास कटिबंध होऊ द्या.

आ) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदाहरण वर्णन करा.

उत्तर – या कवितेत जागोजागी वीररसाची प्रचिती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवींनी वीर रसाचा मुक्त वापर केला आहे. कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया या पहिल्या दोन ओळीत शहिरांनी मर्द मराठी मनाला प्राण अर्पण करण्याचे व मर्दुमकीचे आवाहन केले आहे. शिवरायांच्या कर्तुत्वाची ग्वाही दिली आहे. अशाप्रकारे ही कविता वीर रसाने ओतप्रोत भरली आहे.

प्रश्न ६) अभिव्यक्ती.

अ) तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.

उत्तर – महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे. इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली. गोदावरी, नर्मदा, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नद्यांना सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे. येथे शौर्य व वैराग्य हातात हात घालून नांदतात. विद्येची उगम व प्रसार महाराष्ट्रातून झाला. भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्रने केली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली आहे. औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे माहेरघर महाराष्ट्र आहे.

महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया स्वाध्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *