Skip to content

Maha TET Exam 2024 Timetable

  • by
Maha TET Exam 2024

Maha TET Exam 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच Maha TET Exam 2024 चे आयोजन केले जाते. सन 2024 मध्ये होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेबाबत प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिक्षण शास्त्र पदविका ( D.Ed )आणि शिक्षण शास्त्र पदवी ( B.ed) धारण केलेल्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन केले जाते. यावर्षी बऱ्याच वर्षानंतर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्यांनी शिक्षण शास्त्र पदविका म्हणजेच D.ed अथवा बी एड पूर्ण केले आहे. त्यांना शिक्षक म्हणून नोकरी करावयाची आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा Maha TET Exam 2024 पास असणे अनिवार्य आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच अशा उमेदवारांना जिल्हा परिषद अथवा खाजगी संस्था मधील शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करता येणार आहे. म्हणून या परीक्षेला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रदीर्घ अशा प्रतीक्षेनंतर सदर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये आपण या परीक्षे बाबतची माहिती पाहणार आहोत.

शिक्षक पात्रता परीक्षा Maha TET Exam 2024 पेपर 1 व पेपर 2 या स्वरूपात घेतली जाते. जे उमेदवार पहिली ते पाचवी या वर्गांसाठी शिकवू इच्छितात अशा उमेदवारांना पेपर 1 साठी फॉर्म भरावा लागेल व जे उमेदवार सहावी ते आठवी या वर्गांसाठी शिकवू इच्छितात त्यांनी पेपर 2 साठी फॉर्म भरावा. ज्यांना दोन्ही पेपर द्यावयाचे आहेत ते दोन्ही पेपर साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रक | Maha TET Exam 2024 timetable

Maha TET Exam 2024

शिक्षक पात्रता परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता 9 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे आपण आपला फॉर्म लवकरात लवकर भरावा. शेवटच्या टप्प्यांमध्ये फॉर्म भरत असताना सर्वर प्रॉब्लेम येण्याची जास्त शक्यता असते. तेव्हा शक्य तितक्या लवकर आपण आपला फॉर्म ऑनलाईन भरावा. फॉर्म भरल्यानंतर आपल्या फॉर्मची प्रिंट काढून घ्या.

फॉर्म भरल्यानंतर परीक्षेपूर्वी आपल्याला परीक्षा प्रवेश पत्र वेबसाईट वरून डाऊनलोड करून घेऊन त्यांची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये आपण आपल्या प्रवेश पत्राची (Hall ticket) प्रिंट ऑनलाईन काढून घेता येईल.

Maha TET Exam Date 2024

शिक्षक पात्रता परीक्षा Maha TET Exam 2024 10 नोव्हेंबर 2024 रोजी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही परीक्षा होणार आहेत. यामध्ये पेपर 1 हा सकाळी 10: 30 ते 1:00 वाजेपर्यंत होणार आहे व पेपर 2 2: 00 ते 4 :30 या वेळेमध्ये होणार आहे. दोन्ही पेपर प्रत्येकी दीड तासांचे आहेत.

Maha TET Exam 2024 fees

शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा फी अनुसूचित जाती- जमाती व दिव्यांग उमेदवारासाठी 700 रुपये व इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये परीक्षा फी आहे. सदर परीक्षा फी पेपर एक व पेपर दोन साठी सारखीच आहे. मात्र ज्या उमेदवारांना दोन्ही परीक्षा द्यावयाचे असतील त्यांना अनुसूचित जाती जमाती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये व इतर उमेदवारांकरिता 1200 रुपये फी भरावी लागते. त्यामुळे दोन्ही परीक्षेसाठी अर्ज भरणे फायदेशीर ठरू शकते.

शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म कसा भरावा?

शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म हा फक्त ऑनलाईन भरता येणार आहे. या परीक्षेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ https://mahatet.in/ हे आहे. संकेतस्थळावर जाऊन सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी आवश्यक दहावी, बारावी, डीएड, बी एड प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, इत्यादी आवश्यक प्रमाणपत्र आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराचा फोटो आणि सही आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला जो लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल त्याच्या साहाय्याने सदर संकेतस्थळावर लॉगिन होऊन आपला अर्ज सादर करता येईल. अर्जातील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचून सदरची माहिती भरावी.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. शुल्क भरताना आपण डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग तसेच यूपी आय व वॉलेट चा वापर करू शकता. फी भरल्यानंतर आपली फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर आपण आपल्या फॉर्मचे आणि फी भरलेले पावती डाऊनलोड करून त्याची प्रिंट आपल्याजवळ ठेवा.

शिक्षक पात्रता परीक्षा Maha TET Exam 2024 गणित विषयाशी संबंधित ऑनलाईन चाचणी आपल्याला या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये मागील परीक्षेमध्ये आलेल्या गणितांचा सराव त्याचबरोबर तशाच इतर उदाहरणांचा सराव होण्यासाठी ऑनलाइन चाचणी उपलब्ध असेल.

शेकडेवारी घटकावर आधारित ऑनलाइन चाचणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *