लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. आण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ होते तर त्यांच्या आईचे नाव वालुबाई होते. आण्णाभाऊंच्या दोन पत्नी होत्या. एकीचे नाव कोंडाबाई व दुसरीचे नाव जयवंता होते. त्यांना दोन मुली शांता आणि शकुंतला व मधुकर नावाचा एक मुलगा होता.
आण्णाभाऊ साठे हे एक समाज सुधारक, लेखक, कवी, लोकशाहीर व साहित्यिक म्हणून ओळखले जातात. अण्णाभाऊंचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे साहित्य आहे. आण्णाभाऊ हे एक अशिक्षित असूनही त्यांच्या लेखनातील प्रतिभा शक्ती अतुलनीय होती. अण्णाभाऊंच्या साहित्याचे आजही अभ्यासक आहेत व या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करणारे विद्यार्थी आपणास पाहावयास मिळतात.
आण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे चालण्यासाठी जग बदल घालुनी घाव l सांगून गेले मज भीमराव. असे अण्णाभाऊ म्हणायचे. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर कार्ल मार्क्स व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा प्रभाव होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.
ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली आहे; अशी कल्पना त्यावेळी मानली जात होती. पण तिला छेद देताना भाऊ म्हणतात की ‘ ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.’ इतके अनन्यसाधारण महत्व या कष्टकऱ्यांना आणि श्रमिकांना आहे याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. समाजातील गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये असलेले दरी कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
कुटुंबातील मूल्ये स्वाध्याय इयत्ता पाचवी
घरची गरीबी, अज्ञान यामुळे आण्णाभाऊ साठे यांना शाळेत जाऊन औपचारिक शिक्षण घेता आले नाही. मात्र जीवनाच्या व अनुभवाच्या शाळेत ते खूप काही शिकले. त्यांच्यामध्ये पराकोटीची सृजनशीलता होती. त्यांनी आपल्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये 21 कथासंग्रह व 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्याचबरोबर लावणी, पोवाडे यांचेही लेखन केले. त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून सर्वसामान्यांच्या वेदना, त्यांच्या समस्या यांना वाचा फोडली.
आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्र वेगळी करण्याचा प्रयत्न चालू होता. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारण्यात आली. या चळवळीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजवण्याचे काम केले.
अशाप्रकारे अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक, प्रतिभाशाली कवी, लेखक, साहित्यिक होते. आपल्या लेखणीने समाजातील सर्व स्तरांमध्ये जनजागृतीचे काम त्यांनी केले. अशा या महान साहित्यिकाचा मृत्यू 18 जुलै 1969 साली झाला. अशा या महान मानवास कोटी कोटी प्रणाम.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयीचे लहान मुलांसाठी भाषण
अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो मी आज तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत अशी माझी नम्र विनंती आहे.
आण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म एक ऑगस्ट 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व त्यांच्या आईचे नाव वालुबाई होते.
अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते आपले गुरु मानायचे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या व्यथा त्यांनी आपल्या पोवाड्यातून मांडल्या. अण्णाभाऊ साठे यांनी विपुल प्रमाणात कथासंग्रह, लावण्या, पोवाडे व कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे खूप मोलाचे योगदान होते.
अशा या महान साहित्यिकाचा मृत्यू 19 जुलै 1969 मध्ये झाला. आज आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!