Skip to content

कुटुंबातील मूल्ये स्वाध्याय इयत्ता 5 वी

  • by
कुटुंबातील मूल्ये स्वाध्याय

कुटुंबातील मूल्ये स्वाध्याय: समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. लहानपणी मुलावरती होणारे संस्कार हे कुटुंबामध्येच होतात. लहान मुलाची सर्वात प्रथम गुरू ही त्याची आई असते. कारण सुरुवातीला सर्वात जास्त संपर्क त्याचा आईशी येतो व त्यानंतर त्याच्या कुटुंबाशी येतो. त्यामुळे कुटुंबातील वातावरण हे मैत्रीपूर्ण व सर्वांना सहभागी करून घेणारे असावे. यामध्ये सहिष्णुवृत्ती, स्त्री पुरुष समानता, प्रामाणिकपणा, निर्णय प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेणे खूप आवश्यक असते.

कुटुंबातील मूल्ये स्वाध्याय

प्रश्न १) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

अ) प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते.

आ) सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते.

इ ) आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे.

ई) समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते.

प्रश्न २) पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) परिसरातील बदलाविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात?

परिसरातील बदला विषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घ्यावयाचे असतात.

आ) सहिष्णुता म्हणजे काय?

आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे व ते ऐकून घेणे म्हणजे सहिष्णुता होय.

इ) स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

मुलगा- मुलगी, स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समानतेने वागवणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता होय.

ई) स्त्री- पुरुषांच्या समान गरजा कोणत्या?

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या स्त्री- पुरुषांच्या समान गरजा आहेत.

नवोदय विद्यालय परीक्षा 2025 संपूर्ण माहिती

प्र.३) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो?

कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडी- निवडी वेगवेगळ्या असतात. विचार आणि मते ही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले, तरी अनेक बाबीतील आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व अपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरताना परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो.

आ) सहिष्णूतेची भावना कशी निर्माण होते?

आपणा सर्वांमध्ये काही गुण दोष असतात. पालकांच्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने आपल्याला ते दोष दूर करता येतात. एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतीलच असे नाही. त्यावेळी मित्र- मैत्रिणीमध्ये कधी कधी मतभेद होतात. अशा वेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचे म्हणणे ही समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्याचे ऐकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासण्या करता येते.

३) निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होते?

  • आपल्याला काय वाटते, हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते.
  • एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन त्या विषयाशी संबंधित सर्व बाजू समजतात.
  • सर्व बाजूने विचार केल्यामुळे निर्णय चुकण्याची शक्यता कमी होते.
  • घरात आपल्या मताला महत्व दिले जात आहे, हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते.
  • कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होतो.

5th Scholarship App

,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *