कारागिरी हा पाठ डॉ. सरोजिनी बाबर यांनी लिहिलेला आहे. या पाठात लेखिकेने आपल्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणी खेडेगावात चालणारे निरनिराळे व्यवसायांची माहिती लेखिकेने या पाठात सांगितले आहेत.
लेखिका लहानपणी जेव्हा कुंभार वाड्यात जायची तेव्हा तिथे मातीची भांडी असायची. यामध्ये मोगा, डेरा, घट, गाडगे, शेगड्या, चुली, बैल, मुखवटे इत्यादी सर्व वस्तू मातीच्याच असायच्या. सर्व कामासाठी मातीची भांडी वापरली जायची. आज आपल्याला या मातीच्या भांड्यातील वस्तूंची नावे ही माहीत नाहीत.
त्याचबरोबर बुरुडाच्या घरी बनवलेल्या कांबटी च्या निरनिराळ्या वस्तू व त्यातील कारागिरी यांचे वर्णन लेखिकेने केलेले आहे. त्याचबरोबर वाका पासून बनवलेले दोर, शिंकी, कासरे, पिशव्या या वस्तू सुद्धा खूप महत्त्वाच्या होत्या.
एकंदरीत या पाठांमध्ये लेखिकेने गावामध्ये चालणारी निरनिराळे व्यवसाय, त्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या वस्तू, त्या वस्तू तयार करताना असलेली कारागिरी याचे वर्णन केलेले आहे. माणसाच्या अंगी असलेली कारागिरी ही त्याची ओळख निर्माण करते.
पूर्वीच्या काळी असलेल्या या कलाकुसरीच्या वस्तू हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. अशा वस्तूंची ओळख आताच्या विद्यार्थ्यांना व्हावी. कारागिरांच्या अंगी असलेली कारागिरी सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा पाठ खूप उपयोगी आहे.
कारागिरी
इयत्ता – पाचवी.
विषय – मराठी.
१) लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची ?
लेखिका लहानपणी कुंभारवाड्यात जायची. तेथे फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार हाताच्या चपळाईने लहानमोठी मातीची भांडी तयार करीत. याची लिखिकेला गंमत वाटायची.
२) लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची ?
लेखिकेच्या घरी मोगा, डेरा,घट, तरळ, टिंगाणी,गाडगी ही मातीची भांडी असायची. तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या. याशिवाय खेळण्यासाठी बंडूकली व पूजेचे बैल, गणपती,मातीचेच असायचे.
३) लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे ?
लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला चिखलाचा नाग तयार करीत.तसेच बैलपोळ्याला मातीचा बैल बनवत असत. अशाप्रकारे सणांसाठी आवश्यक साहित्य लेखिकेचे आजी आजोबा बनवत असत.
४) लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटायचे ?
लेखिका शेजारच्या जिगराने केलेला गुलाबी चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला चकचकत्या शेंडीचा नारळ पहताना तहानभूक विसरत असे.तसेच दारावरची लाकडी काड्यांची झगझगीत तोरणे व वरातीतल्या नक्षत्रमाला लेखिकेला तासनतास बघत राहाव्याशा वाटायच्या.
५) जिनगरांच्या मामाला लेखिकेने ‘ कसबी माणूस’ का म्हटले आहे ?
जिनगरांच्या मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघू मैना अशा तयार करायचा की त्या हुबेहूब खऱ्या वाटायच्या. तसेच खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची त्यांनी केलेली शोभा भुलवणारी असायची. म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे.
६) कांबट्यांपासून काय काय बनवता येते ?
कांबट्यांपासू रवळ्या, सुपे, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या बनवता येतात.तसेच कांबट्यांपासून पेट्या, पाळणे, चटया,खुर्च्या, टेबलही बनवता येतात.
७) चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे ?
भोंडला खेळायला लेखिका चिमाच्या घरी जायच्या, तेव्हा तिथे वाखाच्या सुंदर वस्तू केलेल्या दिसायच्या. चिमा च्या घरासमोर लांबच लांब कासरा करण्याचे प्रात्यक्षिक दिसायचे. गिरक्या घेऊन वाखाला पीळ देत चिमा हातचलाखीने सुंदर दोरखंड वळायची.
८) शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची ?
शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी भावल्या, अंगडी-टोपडी, नऊ खणांची चोळी, पाय घोळ परकर, पांघरूणे, गोधड्या तयार करायची. तसेच छोट्या बाळासाठी नक्षीदार दुपटी व कुंची शिवायची.
९) माहेरवाशिणीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा ?
लेखिकेचे आजी माहेरवाशिणीची कुंची फार सुबक व सुरेख शिवायची. ती माहेरवाशी, ती कुंची घालून सासरी गेली की त्या कुंचीचे गुणगान सकट कौतुक व्हायचे. त्यामुळे माहेरवाशिणीचा रुबाब सासरी वाढायचा.
प्र २) कारागिरी या पाठांमध्ये खालील शब्द कोणाला व का म्हटले आहे, ते लिहा.
१) निर्मितीचा धनी.
कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटले आहे; कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या गोळ्यापासून निरनिराळी लहानमोठी मातीची भांडी तो तयार करतो. मातीच्या गोळ्याला सुंदर असा आकार देण्याचे काम कुंभार करतो.
२) भुईफुले.
अंगणात काढलेल्या शिरगोळ्यांच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला भुईफुले म्हटले आहे; कारण ही जमिनीवर फुललेली फुले इतकी जिवंत वाटायची की पाहणाऱ्या गावकऱ्यांना हेवा वाटायचा.
प्र ३) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१) तहानभूक हरपणे – तल्लीन होणे.
कबड्डी खेळता खेळता सम्यकची तहानभूक हरपली.
२) वाहवा मांडणे – स्तुती करणे.
पोहण्याच्या स्पर्धेत पहिल्या आलेल्या सोनालीची शिक्षकांनी वाहवा केली.
३) तोंडावर हसू फुटणे – पटकन हसू येणे.
विदूषकाने प्रवेश करताच सर्व प्रेक्षकांच्या तोंडावर हसू फुटले.
४) ऐटी मिरवणे – रुबाब करणे.
जत्रेत नवीन कपडे घालून समिर ऐटी मिरवत होता.
५) हेवा करणे – मस्तर वाटणे.
पियूषचे सुंदर अक्षर पाहून राजूला पियुषचा हेवा वाटला.
६) तोंडात बोट घालणे – नवल वाटणे.
दुसरीतल्या राजूला संगणक शिताफीने हाताळताना पाहून पाहुण्यांनी तोंडात बोटे घातली.
प्र ४) पुढील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषण लिहा.
( टवटवीत, निळेशार, नवा, पन्नासावा, उंच )
१) हिमालय उंच पर्वत आहे.
२) बागेत टवटवीत फुले उमलली आहेत.
३) काल बाबांचा पन्नासावा वाढदिवस होता.
४) समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते.
५) ताईने बाळाला नवा सदरा घातला.
अशाप्रकारे कारागिरी या पाठातून पूर्वीच्या काळी आपल्या गावांमध्ये असणारी विविधता, निरनिराळ्या कारागिरांची ओळख करून देण्यात आली आहे. या पाठातील काही प्रश्नांची उत्तरे नमुना स्वरूपामध्ये या ठिकाणी देण्यात आली आहेत.
वरील दिलेली प्रश्नांची उत्तरे ही नमुना स्वरूपामध्ये आहेत यामध्ये आपण आवश्यकतेनुसार बदल करू शकता. या पाठातील आणखी काही प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास आपण खालील कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न लिहून आम्हाला पाठवू शकता.
पाण्याची गोष्ट या पाठावरील स्वाध्याय