इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा शास्त्रीय पद्धतीने केला जाणारा अभ्यास होय. ह्या अभ्यासासाठी इतिहासाची साधने खूप महत्त्वाची असतात. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनापेक्षा वेगळी आहेत. इतिहासाची साधने यामध्ये लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने व दृकश्राव्य माध्यमातील साधने इत्यादी साधनांचा समावेश होतो.
इतिहासाची साधने स्वाध्याय
प्र. १) अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
१) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.
अ) पुणे ब) नवी दिल्ली क) हैद्राबाद ड) कोलकाता
२) दृक -श्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो.
अ) वृत्तपत्र ब) दूरदर्शन क) आकाशवाणी ड) नियतकालिके
३) भौतिक साधनांमध्ये म्हणीचा समावेश होत नाही.
अ) नाणी ब) अलंकार क) इमारत ड) म्हणी
ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
१) जाल कूपर -टपाल तिकीट अभ्यासक
२) कुसुमाग्रज- कवी
३) अण्णाभाऊ साठे- लोकशाहीर
४) अमर शेख- चित्र संग्राहक
चुकीची जोडी – अमर शेख- चित्र संग्राहक
प्र.२)इतिहासाची साधने पाठच्या आधारे टीपा लिहा.
१) लिखित साधने-
- लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे यांचा समावेश होतो.
- इतिहास लेखनामध्ये लिखित साधने हे अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात.
- लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण व राजकारण सांस्कृतिक घडामोडी समजतात.
- लिखित साधनांमधील टपाल तिकिटे, पत्र व्यवहार यांच्या साह्याने इतिहास लेखनात खूप मदत होते.
२) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
- सन 1953 नंतर भारतातील अनेक वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्त्रोत आहे.
- प्रेस ऑफ इंडियाने छायाचित्रे, बातम्या, आर्थिक विषयावरील लेख इत्यादी माहिती वर्तमानपत्रांना पुरवली आहे.
- 1990 च्या दशकात पीटीआयने (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया) टेली प्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली.
- आधुनिक भारताच्या इतिहास लेखनामध्ये पीटीआय चे म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे खूप महत्त्वाचे योगदान आहे.
संतवाणी- धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय 9 वी
प्र ३) कारणे लिहा.
१) टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.
- टपाल तिकिटे हे एक लिखित साधन आहे.
- टपाल तिकिटांचा आकार, त्यामध्ये वापरलेली रंगसंगती, तिकिटा मधील नावीन्य यामुळे बदलत्या काळाविषयाची जाणीव होते.
- टपाल खाते राजकीय नेत्यांवर, एखाद्या घटनेवर, रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक महोत्सव यासारख्या घटनांच्या वेळी निरनिराळ्या प्रकारची टपाल तिकिटे काढते.
- ऐतिहासिक घटना वर आधारित टपाल तिकिटे काढली जातात अशा प्रकारे टपाल खाते भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांचे जतन करते.
२) आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.
दृकश्राव्य माध्यमांमध्ये चित्रपट, नाटक, वृत्तपट, दूरदर्शन यासारख्या अनेक बाबींचा समावेश होतो. इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्र या क्षेत्रावर आधारित महत्त्वाच्या घटनावर वृत्तपट तयार केले आहेत. त्याचबरोबर अनेक ऐतिहासक स्थळांची माहिती देणारे डॉक्युमेंटरी आज उपलब्ध आहेत.
भारताचे आर्थिक राजकीय बदल, होणाऱ्या घडामोडी इत्यादींची माहिती या दृकश्राव्य माध्यमातून साठवून ठेवली जाते. भविष्य कळामध्ये या माहितीच्या आधारे इतिहास लेखन करणे अधिक सोयीचे व विश्वसनीय होणार आहे. दृक- श्राव्य माध्यमातील डाटा निराळ्या प्रकारे जतन केला जातो; आवश्यक त्यावेळी त्याचा वापर करता येतो.