Skip to content

Scholarship Answer key 2024 | अंतरिम उत्तर सूची जाहीर

  • by
Scholarship Answer key

Scholarship Answer key 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवी करिता शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ही परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षेची अंतरिम म्हणजेच तात्पुरती उत्तर सूची संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये आपण अंतरिम उत्तर सूची म्हणजे काय? अंतरिम उत्तर सूची Scholarship Answer key कशी डाऊनलोड करावी? अंतरिम उत्तर सूची बाबत आक्षेप कसे नोंदवावेत याबाबतची माहिती पाहणार आहोत.

अंतरिम उत्तर सूची म्हणजे काय?

शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवी करिता दरवर्षी परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतली जाते. या परीक्षेची अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यापूर्वी अंतरिम उत्तर सूची Scholarship Answer key प्रसिद्ध केली जाते. अंतरिम उत्तर सूची म्हणजे तात्पुरत्या स्वरूपातील उत्तर सूची होय.

आता प्रसिद्ध झालेल्या उत्तर सूची बाबत शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्याकडून काही अक्षेप असल्यास त्रुटी असल्यास ते नोंदविले जातात. म्हणजेच एखाद्या प्रश्नाबाबत अथवा त्याच्या दिलेल्या उत्तराबाबत आपल्याला साशंकता असेल, दिलेले उत्तर चुकीचे वाटत असेल, प्रश्न चुकीचा वाटत असेल तर त्याबाबत स्पष्टीकरणासह आपल्याला आपला आक्षेप नोंदवता येतो.

दिलेल्या वेळेमध्ये नोंदवलेल्या आक्षेपांचा, सूचनांचा परीक्षा परिषदेतील तज्ञ व्यक्तींकडून विचार केला जातो. त्यातील योग्य सूचना नुसार उत्तरपत्रिके मध्ये बदल करून नवीन अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध केली जाते. एकदा अंतिम सूची प्रसिद्ध केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही.

सध्या प्रसिद्ध झालेल्या अंतरिम उत्तर सूची मधील काही प्रश्न बाबत शंका असेल अशा प्रश्नांच्या उत्तरांमध्येच बदल केला जातो अन्यथा उर्वरित सर्व प्रश्नांची उत्तरे हे अंतिम उत्तर सूचित कायम राहतात. शक्यतो एकूण प्रश्नपत्रिकेत जास्तीत जास्त पाच ते सहा प्रश्नांच्या उत्तरांमध्येच बदल होण्याची शक्यता असते.

अंतिम उत्तर सूची Scholarship Answer key प्रसिद्धी नंतर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीचा निकाल जाहीर केला जातो.

Scholarship Answer key

अंतरिम उत्तर सूची कशी डाऊनलोड करावी? How to download Scholarship Answer key?

Scholarship Answer key डाऊनलोड करून त्याप्रमाणे आपल्याकडे असलेल्या उत्तर पत्रिकेच्या कार्बन कॉपी तील प्रश्न उत्तरांची तपासणी आपण करू शकतो. Scholarship Answer key 2024 डाऊनलोड करण्यासाठी खालील टप्प्याप्रमाणे कृती करा.

  • सर्वात प्रथम आपल्या फोन मधील ब्राउझर ओपन करा.
  • ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे अधिकृत संकेतस्थळ टाकायचे आहे.
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे अधिकृत संकेत स्थळ आहे mscepune.in
  • त्यानंतर आपल्यासमोर परीक्षा परिषद पुणे यांचं मुख्य पेज ओपन होईल.
  • या पेजवर डाव्या बाजूला इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नावाची एक टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन दिसतील शिष्यवृत्ती परीक्षा 2022, शिष्यवृत्ती परीक्षा 2023 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2024 यातील शिष्यवृत्ती परीक्षा 2024 या टॅब वरती क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर शिष्यवृत्ती परीक्षेचे नवीन पेज ओपन होईल.
  • या पेजवर आपल्याला अंतरिम उत्तर सूची 2024 नावाची एक नवीन टॅब दिसून येईल.
अंतरिम उत्तर सूची Scholarship Answer key
  • या टॅब वर क्लिक करा.
  • यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन येतील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी यातील ज्या वर्गाची व ज्या विषयाची अंतरिम उत्तर सूची डाउनलोड करावयाची आहे त्या विषयावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्या फोनमध्ये अथवा लॅपटॉप मध्ये ती फाईल डाऊनलोड होईल. त्या पीडीएफ ची प्रिंट काढून घेऊन त्याप्रमाणे आपण उत्तर तपासू शकतो.

अशाप्रकारे आपण Scholarship Answer key 2024 डाऊनलोड करून घेऊन त्याप्रमाणे आपली उत्तर पत्रिका तपासू शकतो. अथवा त्यातील काही उत्तराबद्दल आक्षेप असल्यास तेही ऑनलाईन नोंदवता येतील.

अंतरिम उत्तर सूची डाऊनलोड पेज वर जाणेसाठी इथे क्लिक करा.

अंतरिम उत्तर सूची बाबत आक्षेप कसे नोंदवावेत?

Scholarship Answer key 2024 ची अंतिम उत्तर सूची डाऊनलोड केल्यानंतर ती तपासून घ्या. त्याबाबत कोणताही आक्षेप असल्यास त्याचे निवेदन ऑनलाईन पद्धतीने परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देता येईल.

सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर objection on question paper and interim answer key या हेडिंग खाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा परिषदेच्या संकेत स्थळावर जाण्यासाठी अंतरिम उत्तर सूची डाऊनलोड करणे साठी कृती केली त्याप्रमाणेच कृती करून आपण या संकेतस्थळावर जावयाचे आहे. संकेतस्थळावर ऑब्जेक्शन साठी नवीन टॅब उपलब्ध करून दिलेली आहे.

शाळांकरिता आक्षेप नोंदवण्यासाठी शाळेच्या लॉगिन मध्ये सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रश्नपत्रिका बाबत अथवा उत्तर पत्रिकेबाबत त्रुटी अथवा अक्षेप नोंदवण्याचे ऑनलाइन निवेदन भरण्याकरिता दिनांक 06 मार्च 2024 ते 13 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीमध्येच आपल्याला आक्षेप नोंदवता येतील. विहित पद्धतीने आक्षेप नोंदवल्यानंतर आपल्या आक्षेपांचा विचार करून काही कालावधीनंतर अंतिम उत्तर सूची सकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येते.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, आईचे नाव, लिंग इत्यादी मध्ये काही दुरुस्ती करावयाचे असल्यास आपण ती शाळेच्या लॉगिन मधून करू शकतो. त्याचबरोबर शाळा माहितीपत्रात काही दुरुस्ती असल्यास तेही दुरुस्ती या लॉगिन मधून करू शकतो.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदन पत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपात्रात दुरुस्ती करण्यासाठी दिनांक 6 मार्च 2024 ते 13 मार्च 2024 या कालावधीमध्ये शाळा लॉगिन मध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत..

सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या सूचना परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आले आहेत.

वाक्प्रचार अर्थ आणि वाक्यात उपयोग

इयत्ता पाचवी आणि आठवी या वर्गांकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. ही परीक्षा यावर्षी 18 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी घेण्यात आली होती. विद्यार्थी व शिक्षक वर्षभर या परीक्षेच्या तयारीसाठी लागलेले असतात. या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून काही रक्कम दिली जाते.

विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्या साठी प्रसिद्ध झालेली Scholarship Answer key 2024 खूप उपयुक्त ठरणार आहे. दिलेल्या उत्तर सूची प्रमाणे आपण आपली उत्तर पत्रिका तपासून आपल्या निकाल पाहू शकतो. त्याबाबत काही शंका असल्यास त्याबाबतची तक्रार आपण शाळेमार्फत अथवा स्वतः संकेतस्थळावर नोंदवू शकतो.

शिष्यवृत्ती परीक्षे बाबत कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहू शकता. आपल्या कमेंट वर लवकरात लवकर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *