गचकअंधारी या पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर. अशोक मानकर हे ग्रामीण विनोदी कथा लेखक आहेत. गचकअंधारी हा पाठ त्यांच्या गचकअंधारी या कथा संग्रहातून घेतलेला आहे.
पावसाच्या तडाख्या पासून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व बाजारात निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या घटनां लेखकाने विनोदी व मार्मिक शैलीतून मांडलेल्या आहेत.
इयत्ता सातवीच्या बालभारती पुस्तकांमध्ये गचकअंधारी हा आठव्या क्रमांकाचा पाठ आहे. एका गावात सदा नावाचा एक गाडगी मडकी विकण्याचा व्यवसाय करणारा व्यापारी राहत होता. त्याच्या बायकोचे नाव सखू होते. त्या दोघांना गजानन नावाचा एक मुलगा होता.
सदा पंचक्रोशीतील गावांमधील बाजारात जाऊन गाडगी मडकी विकायच्या. गाढवाच्या पाठीवर गाडगी मडके बांधून तो गावोगाव फिरायचा.
एके दिवशी त्याचा मुलगा गजानन सदा बरोबर बाजारात जाण्यासाठी हट्ट करू लागला. त्याची समजूत काढण्यासाठी व त्याला घाबरवण्यासाठी सदाने त्याला अंधाराची, लांडग्याची, वाघाची भीती दाखवण्याचा खूप प्रयत्न केला.
कोणालाही घाबरून गजानन हट्ट सोडण्यास तयार नव्हता. तेव्हा सदाने त्याला गचकअंधारी नावाच्या काल्पनिक जनावराची भीती दाखवली. सदाची गचकअंधारी ची युक्ती सफल झाली आणि गजानन त्याला घाबरून बाजारात जाण्याचा आपला हट्ट सोडून देतो.
सदा त्यानंतर बाजारात जाण्यासाठी आपली गाढव शोधण्यासाठी बाहेर पडतो. तू गावभर इकडे तिकडे गाढव शोधतो व शेवटी आपल्या घराच्या मागे गाढव शोधण्यासाठी येतो. तेथे आल्यानंतर त्याला त्या अंधारात उभा असलेला वाघ गाढवच वाटतो.
सदा बाजारात जाताना आपल्या गाढवा ऐवजी वाघालाच आपले गाढव समजतो आणि त्यावर बसून जायला निघतो. त्यानंतर सदानंद ची होणारी फजिती अतिशय विनोदी पद्धतीने या धड्यात आपणास पहावयास मिळते.
सदा वाघावर बसून जात असताना त्याला आपले गाढव आज एवढ्या गतीने कसे चालत आहे अशी शंका येते. आणि काही वेळातच त्याच्या लक्षात येतं की आपण गाढव समजून वाघावर बसलो आहोत. ही परिस्थिती पाहून त्याला कडाक्याच्या थंडीतही त्याला दर दरून घाम फुटतो.
वाघाने ही घराबाहेर उभे राहून गचकअंधारी ची कथा ऐकलेली असते. त्यामुळे वाघाला आपल्या पाठीवर गचकअंधारी बसली आहे असे वाटते. आणि आपला जीव वाचवण्यासाठी तो घाबरून धावत असतो. या प्रसंगातून होणारी विनोद निर्मिती वाचकांना खिळवून ठेवते. मुलांच्या मनामध्ये वाचनाविषयी आवड निर्माण करण्यासाठी उपयोगी गोष्ट आहे.
गचकअंधारी या पाठाचा थोडक्यात सारांश समजून घेतल्या नंतर या पाठातील काही प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे प्रश्न उत्तरे फक्त नमुन्यासाठी दिलेली आहे. याचे उत्तर मध्ये आपण आपल्या मांडणीनुसार बदल करू शकता.
गचकअंधारी स्वाध्याय
इयत्ता – सातवी , विषय – मराठी
प्र.१ )खालील वाक्ये वाचा. तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा.
अ) सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
उत्तर- सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लावू लागून ती विकायला शेजारच्या गावी जात असे. सदाची जी मडके विकून शिल्लक राहत होती, तो ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत होता. त्यामुळे येताना गाढवाची पाठ रिकामी असे, म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत होता.
आ) गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
उत्तर- गजा सदा बरोबर बाजारात जाण्यासाठी हट्ट करू तेव्हा त्याला निरनिराळ्या प्राण्यांची भीती दाखवण्याचा सदाने प्रयत्न केला. पण गजा घाबरला नाही. शेवटी सदाने वाघा सिंहाला खाणाऱ्या काल्पनिक गचकअंधारी ची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
इ) वाघ सदाच्या दुप्पट हालू लागला.
उत्तर- सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचकअंधारी बसली आहे व सदाला कळाले की आपण गाढवाच्या पाठीवर नाही तर वाघाच्या पाठीवर बसलो आहे तेव्हा सदाला कापरे भरले. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.
ई) सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
उत्तर- वाघाच्या पाठीवर आपण बसलोय हे जेव्हा सदाला कळाले, तेव्हा तो खूप घाबरला. यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भागू लागला.
शिष्यवृत्ती परीक्षा 2024 विषयी सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
प्र.२. खालील मुद्द्यांवर दोन-तीन वाक्यात माहिती लिहा. गचकअंधारी स्वाध्याय प्रश्न २
१) सदाचा व्यवसाय
उत्तर- सदा गाडगी मडकी बनवायचा व शेजारील गावात जाऊन ती विकण्याचा व्यवसाय करायचा. गाडगे मडक्यांची वाहतूक करण्यासाठी तो गाढवाचा उपयोग करायचा.
२) सदाचा मुलगा गजानन
उत्तर- सदाच्या मुलग्याचे नाव गजानन होते. त्याला कळू लागल्यावर तो बाबांना बाजारात नेण्यासाठी हट्ट करू लागला. बाबांच्या मागे लागू लागला. एकदा तर गजानन जाण्यासाठी हट्ट करून बसला. सदनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो हट्ट सोडत नव्हता.
३) सदाची झालेली फजिती.
उत्तर- सदा काळोखात आपल्या गाढवाला शोधत होता. गाढवाला शोधत शोधत त्याच्या घरा मागच्या खिंडारात आला. अंधारात गाढव समजून तो तिथे असलेल्या वाघावर बसला. सदाला जेव्हा आपण वाघाच्या पाठीवर बसलो, हे कळाले तेव्हा तो खूप घाबरला.
१) सदाने स्वतःची केलेली सोडवणूक.
उत्तर- गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला होता. हे लक्षात आल्यावर सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो, का पाहू लागला दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. वडाच्या झाडाखालून जाताना वडाच्या लोंबनाऱ्या पारंब्या पकडल्या. अशाप्रकारे सदाने स्वतःची सोडवणूक करून घेतली.
गचकअंधारी स्वाध्याय प्रश्न ३
प्र.३. कोण, कोणास व का म्हणाले?
अ) “कै भेव नोका दाखु मले वाघाफाघाचा.”
उत्तर- गजानन आपल्या वडिलांना म्हणाला. कारण सदा त्याला वाघाची भीती दाखवून बाजारात येत नव्हता.
आ) ‘ या वक्ती जंगलात कदी ना ते गचतअंधरी भेटली त म्हणू नोको मले.’
उत्तर- सदा गजानन ला म्हणाला. कारण गजानन सदाचा मागे लागला होता त्याचा हट्ट तो सोडत नव्हता, त्याला घाबरवण्यासाठी सदा त्याला म्हणाला.
इ)’ गचक अंधारी झटके देऊन राहिली.’
उत्तर- वाघ आपल्या मनाशी म्हणाला. कारण सदा भीतीने कापरे भरले तो थाड थाड उडू लागला या छेडछाडीने लागला वाघ सदाचा दुप्पट हळू लागला वाघाला गचक अंधारी झटके देत आहे असे वाटले.
उत्तर- वाघ आपल्या मनाशीच म्हणाला. कारण सदा पारंब्याला लोंबकळला. सदा असा वेगळा होताच वाघाच्या जिवात जीव आला.गचक अंधारी च्या तावडीतून सुटला असे त्याला वाटले वाटले.
शिक्षणविषयक नवीन अपडेट साठी इथे क्लिक करा.
प्र.४)खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
१) ज्यास कोणी शत्रू नाही, असा – अजात शत्रू
२) मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई
३) धान्य साठवण्याची जागा – कोठार
४) दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा – मनकवडा
५) डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता – भोकदा
प्र.५. कंसात दिलेले वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा.
(मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, घाबरगुंडी उडणे, शंकेची पाल चुकचुकणे.)
अ) पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला.
आ) उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
इ) लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला.
ई) पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी उडाली.
गचकअंधारी या पाठावर आधारित प्रश्नांची उत्तरे यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, पाठात आलेल्या काही वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग केला आहे. पाठावर आधारित तुमचे आणखी काही प्रश्न असल्यास आपण सदर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल.
पाठाव्यतिरिक्त आणखीन वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. या ठिकाणी आपणास निरनिराळ्या प्रकारचे वाक्प्रचार पाहावयास मिळतील.