5th scholarship answer sheet pdf स्वरूपामध्ये कशा डाऊनलोड कराव्यात याविषयीची माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
How to download 5th scholarship answer sheet pdf
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी चा सराव करताना जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे खूप आवश्यक असते. या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे प्रश्नांचे स्वरूप प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा कालावधी समजतो.
या प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यासाठी उत्तर पत्रिका आवश्यक असतात. उत्तर पत्रिकेतील प्रश्न क्रमांक समोर गोल रंगवण्याचा सराव यामुळे करणे सोपे जाते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेत येणाऱ्या उत्तर पत्रिकेसारखी उत्तर पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. अशी उत्तर पत्रिका डाउनलोड करून घेऊन त्यावरती प्रश्न सोडवण्याचा सराव करू शकता.
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी नमुना कोरी उत्तर पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Download 5th scholarship answer sheet pdf click here
त्याचबरोबर इयत्ता पाचवीच्या नमुना उत्तरपत्रिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरून ही डाऊनलोड करता येईल.
यासाठी वरील संकेत स्थळाला भेट द्या. त्यांनतर २०२४-२५ वर्ष निवडा. त्यानंतर त्या पेज वर आपल्याला इयत्ता ५ वी व ८ वी च्या नमुना उत्तर पत्रिका डाऊनलोड करता येतील. आशा प्रकारे 5th scholarship answer sheet pdf स्वरुपात डाउनलोड करता येतील.
त्याचबरोबर मागील २०१७- १८ पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकाही डाऊनलोड करता येतील. त्यांचा सराव करता येईल.
5th scholarship form last date
शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म फक्त Online पद्धतीने भारता येणार आहेत. नियमित शुल्कासह दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरता येतील. दिनांक 25 डिसेंबर 24 पर्यंत विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरता येईल.
दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये अति विलंबशुल्कासह आवेदन पत्र भरता येईल. त्यानंतर 31 डिसेंबर 2024 पर्यंत अति विशेष विलंब शुल्कासह आपणास आवेदन पत्र भरता येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही.
अशाप्रकारे 5th scholarship form last date 31 डिसेंबर 2024 पर्यंत असली तरी आपण आपले आवेदन पत्र शक्यतो 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी भरावेत. या कालावधीमध्ये आवेदन पत्र भरल्याने आपल्याला नियमित शुल्कासह फॉर्म भरता येईल व जादा विलंब शुल्कही भरावे लागणार नाही.