Skip to content

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय इयत्ता 9 वी

  • by
भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय इयत्ता 9 वी

इयत्ता नववीच्या राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकांमध्ये भारताची सुरक्षा व्यवस्था हा घटक आहे. या घटकांमध्ये भारतामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुरक्षा व्यवस्थांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये या सुरक्षा व्यवस्थांचे महत्व स्पष्ट केले आहे.

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

प्रश्न १) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१) भारताचे ………. हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.

अ ) प्रधानमंत्री ब) राष्ट्रपती क) संरक्षण मंत्री ड) राज्यपाल

उत्तर – भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.

२) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल –

अ ) भूदल ब)तटरक्षक दल क) सीमा सुरक्षा दल ड ) जलद कृती दल

उत्तर – भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल तटरक्षक दल.

३) विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी …….. ची स्थापना करण्यात आली.

अ) बी.एस.एफ ब ) सी. आर. पी. एफ क) एन.सी.सी ड) आर. ए. एफ

उत्तर – विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी एन.सी.सी ची स्थापना करण्यात आली.

प्र. २) पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

१) मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.

बरोबर

कारण – मानवी सुरक्षेला सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद. दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.

२) प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

बरोबर

कारण – परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात हे आपल्याला समजले. त्यासाठी प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर स्वतःसाठी एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

३) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत.

चूक

कारण – भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. उदा. काश्मीरची समस्या, पाणीवाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद, इत्यादी.

एक होती समई स्वाध्याय इयत्ता 9 वी

प्रश्न ३) पुढील संकल्पना स्पष्ट करा.

१) जलद कृती दलाचे कार्य

बॉबस्फोट , दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते.

२) मानवी सुरक्षा

राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांची ही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते. म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय.

३) गृहरक्षक दल

स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल ही संघटना स्थापन करण्यात आली. गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास सहाय्यभूत ठरू शकतात. वीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री – पुरुष नागरिकास या दलात भरती होता येते. पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध , पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात.

प्रश्न ४) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१) राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो.

१. आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्रांची बनलेली आहे. ही सार्वभौम राष्ट्रे जरी एकमेकांना सहकार्य करत असली तरी त्यांच्यात काही वेळेस संघर्ष ही होतात.

२.राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात, तर काही वेळेस पाणीवाटपावरून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय कराराचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे , शेजारी देशांतून निर्वासितांची लोंढे येणे ही संघर्षाची काही अन्य कारणे असू शकतात.

३) राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकारण तडजोडी , चर्चा आणि यांच्या आधारे केले जाते; परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात. तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे यांमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होते.

सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहा.

१) भूदल ,नौदल आणि वायुदल या संरक्षण करणाऱ्या तीन दलांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश आहे.

२) भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते, तर नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते.

३) भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते. या तिन्ही दलांवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते .

४) भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील सातव्या क्रमांकाचे मानले जाते.

५) सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे, सीमेवर गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते.

मानवी सुरक्षा म्हणजे काय ?

१) राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीत युद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांची ही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे.

२) कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते. म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय.

३) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे.

४) निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा ,मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षण ही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *