भांड्यांच्या दुनियेत: भांडी हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भांड्यांच्या दुनियेत या पाठांमध्ये दैनंदिन वापरामध्ये येणाऱ्या सर्व भांड्यांबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण निरनिराळ्या कामांसाठी या भांड्यांच्या दुनियेत वावरत असतो. आपल्या सर्व कामासाठी भांड्यांचा खूप उपयोग होतो.
भांड्यांचा उपयोग आपण अन्न साठवणे, अन्न शिजवणे, अन्नाचे सेवन करणे, पाणी पिणे, पाण्याची साठवणूक करणे इत्यादी दैनंदिन कामासाठी करतो. भांड्यांचा हा वापर फार पूर्वीपासून चालत आलेला आहे.
भांड्यांच्या प्रकारामध्ये निरनिराळे बदल झाले काळानुरूप निरनिराळ्या धातूपासून तयार होणारी भांडी तयार झाली मात्र भांड्यांचे उपयोग प्रत्येक टप्प्यावर करावाच लागला.
भांड्यांच्या दुनियेत या पाठांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी जाते. शहरातून गावी आल्यानंतर गावांमधील निरनिराळ्या वस्तू भांडी यांची माहिती या मुलांना नसते. त्या वस्तू आणि मुले यांच्या संवाद रूपाने या पाठांमध्ये या भांड्यांची माहिती दिली आहे.
आज-काल बऱ्याच प्रमाणात शहरीकरण वाढल्यामुळे गावाकडील अनेक वस्तू शहरातील मुलांना माहीत नसतात. त्याचबरोबर ग्रामीण भागातूनही बऱ्याच साऱ्या वस्तू, भांडी लोप पावत चालली आहेत.
या पाठाच्या रूपाने फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या निरनिराळ्या भांड्यांची माहिती सर्वच वातावरणातील मुलांना करून देण्याचा प्रयत्न या पाठात केलेला आहे.
या पाठात आलेले जाते, दगडी पाटा, सुरई, पत्रावळी, द्रोण, लोण्याचा वाडगा , दुधासाठीची चरवी, ताकासाठीचा कावळा, खलबत्ता, उखळ , कपबशी, चहाची किटली, पाण्याचा बंब यासारख्या अनेक भांड्यांचा उल्लेख व माहिती या पाठांमध्ये आलेली आहे.
५. भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय
इयत्ता सातवी, विषय मराठी
प्र.१) कारण सांगा.
अ) माणसाला भांड्यांची गरज पडली.
उत्तर- शेती व्यवसाय स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांडण्याची गरज पडली.
आ) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
उत्तर-पूर्वीच्या काळी ताटांची संख्या मर्यादित होती, त्याचबरोबर पंगतीमध्ये वाढलेले ताटे धुवायला वेळ लागत होता म्हणून केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत पूर्वी मोठ्या प्रमाणात होती.
इ) आज घरोघरी मिक्सर वापरतात.
उत्तर- पूर्वीच्या काळी मसाला वाटण्यासाठी घरोघरी पाटा वरवंटा होता.पाटा – वरवंटा खलबत्ता याने वाटण्यासाठी जास्त वेळ व जास्त मेहनत लागते. आज धावपळीच्या काळामध्ये इतकी मेहनत व वेळ देण्यासाठी कोणी तयार नसते म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात. ज्याच्यावर कमी वेळामध्ये खूप कमी कस्टमर मध्ये मसाल्याची वाटप करता येते.
ई) मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
उत्तर- माती पासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे. मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ ताजे राहतात, मातीच्या भांड्यातील अन्न खराब होण्याचे प्रमाण कमी असते म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या पाणी थंड करण्यासाठी मातीच्या मडक्याचा खूप उपयोग होतो.
प्र.२. खालील कृती पूर्ण करा.
१) मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक.
लाकूड
चामडे
लोखंड
तांबे
प्र.३. ‘भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर- भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे, ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला भांड्यांची गरज निर्माण झाली. म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.
पायथागोरस सिद्धांत स्वाध्याय 49
प्र.४. तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा.
उत्तर- आमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे शक्य असल्यास आम्ही पुनर्वापर करू. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवू. निरोपयोगी वस्तू टाकून न देता त्या दुर्मिळ असल्यास त्याचा संग्रह करता येईल.
प्र.५. दोन दोन उदाहरणे लिहा.
१) मातीची भांडी – मडकी, रांजण
२) चामड्या पासून बनलेली भांडी – चामडीबुधले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनलेले तुंबे
३) लाकडी भांडी – काठवट, उखळी
४) तांब्याची भांडी – हंडा, घागर
५) चिनी माती भांडी – किटली, बरणी
६) नॉनस्टिकची भांडी – तवा, कढई
७) काचेची भांडी – ग्लास, कप
प्र.६. यांना का म्हणतात?
अ) जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट. – पत्रावळी, केळीचे पान
आ) जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायला भांडे.- तस्त
इ) दुधासाठीचे भांडे. – चरवी
ई) ताकासाठीचे भांडे. – कावळा
उ) पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे. – घंगाळ
प्र. ७. कंसातील शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकामी जागा भरा.
(अविभाज्य अंग , नित्योपयोगी, विराजमान होणे, सगेसोयरे.)
अ) संत तुकारामांनी वृक्षांना सगेसोयरे संबोधून त्यांचा गौरव केला.
आ) नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.
इ) आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले.
ई) कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे.
या ठिकाणी भांड्यांच्या दुनियेत पाठाखालील स्वाध्याय व त्यांची उत्तरे देण्यात आली आहे. याशिवाय आपल्या मनामध्ये या पाठाशी निगडित कोणताही प्रश्न असल्यास आपण तो कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल.
Nice 👍
Hii