बंडूची इजार पाठाचा सारांश
बंडूची इजार ही इयत्ता पाचवीच्या पुस्तकातील एक चित्रकथा आहे. बंडू हा एक सर्वसामान्य शेतकरी आपल्यासाठी एक इजार शिवतो. बंडूची धोंडू मामानी शिवलेली इजार बंडूच्या उंचीपेक्षा खूप जास्त उंच होते. त्यामुळे बंडूला ती इजार कमी करायची असल्याने तो धोंडू मामाकडे न जाता आपल्या घरातील बायको, बहिण आणि आईला क्रमांकाने इजार चार बोटे कमी करणे साठी सांगतो. मात्र त्याचे हे काम करण्यास सर्वजण नकार देतात.
कंटाळून बंडू आपल्या कामासाठी शेतात निघून जातो. जेव्हा बंडूच्या बायकोला आपण बंडूचे काम करायला पाहिजे असे वाटते तेव्हा ती त्याची इजार चार बोटे कापून टाके घालते. त्याच प्रकारे त्याची बहीण, त्याची आई आणि स्वतः बंडू सुद्धा तीच इजार चार बोटे कापून टाके घालतो. अशाप्रकारे सर्वांनी इजार कापल्यामुळे ती खूप अखूड होते. अशाप्रकारेची विनोदी चित्रकथा म्हणजे बंडूची इजार होय.
बंडूची इजार स्वाध्याय
प्रश्न 1) चर्चा करून उत्तरे लिहा.
अ) बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती, तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा.
बंडूची इजार आखूड झाली असती तर पॅन्टची खालील भागातील दुमडलेली कापडाच्या पट्टीची शिलाई काढून उंची वाढवता येईल. त्याचबरोबर त्याच रंगाचे कापड जोडून थोडीशी लांब करता येईल.
आ) इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची?
बंडूची इजार सर्वांनी चार बोटे कापल्यामुळे तिची चड्डी तयार झाली. एकमेकाला न विचारता इजार कापल्यामुळे यात सर्वांचीच चूक आहे. प्रत्येकाने इजार कापण्यापूर्वी एकमेकांशी बोलायला हवे होते. विशेष करून बंडूने हे काम सर्वांना सांगितले असल्याने त्याची चुकी जास्त वाटते.
इ) बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना आपणच असेच बोलतो इजारी सारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात त्याची नावे सांगा
जसे शर्टाचे हात, पेनची जीभ, पॅन्टची कंबर, कपाचा कान, बाटलीचे तोंड, टेबलाची पाठ, नारळाचा डोळा, टेबलाचा पाय, नदीचे पोट इत्यादी.
प्रश्न २) खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दांपकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्या वाक्याचा अर्थ लिहा.
(कान, नाक, पाय , हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड)
अ) चुलीवरच्या तव्याची पाठ कळीभोर झाली होती.
अर्थ- चुलीवरच्या तव्याची खालील बाजू म्हणजेच चुलीकडील बाजू काळी झाली होती.
२) कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला.
अर्थ- कपाचा कान म्हणजे कप धरण्याची कडी तुटली होती.
३) हा नारळ नासका निघणार नारळाचा डोळा बघून धनव्वा म्हणाली.
अर्थ-नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबण
४) मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते.
अर्थ- नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र.
५) कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना.
अर्थ- कितीही जोर लावला तरी बाटलीचे झाकण उघडेना.
६) चरवीतले दूध गंधात ओतले, तर ते गांजाच्या गळ्यापर्यंत आले.
अर्थ- चरबीतले दूध गंजात ओतले तर ते गांजाच्या काठापर्यंत आले.
७) सुईच्या नाकात दोरा होऊन धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली.
अर्थ-सुईच्या नेढ्यात दोरा ओवून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली.
८) आंब्याच्या कोई चे केस पांढरे होईपर्यंत गणू कोई चोखत राहिला.
अर्थ- आंब्याच्या कोई वरील तंतू पांढरे होईपर्यंत गणू कोई चोखत राहिला.
९) आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते.
अर्थ – आपल्या फांद्या पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते.
१०) खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता, म्हणून मी जमिनीवर बसलो.
आर्थ – खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते ते लाकूड.