आपली हवेची गरज हा तिसरीच्या परिसर अभ्यास पुस्तकातील घटक आहे. मानवाला श्वसनासाठी हवेची गरज असते. त्याचप्रमाणे सर्व सजीवांना श्वसनासाठी हवेची गरज असते. आपली हवेची गरज या पाठावरील स्वाध्याय पाहूया.
आपली हवेची गरज पाठातील महत्वाची माहिती
- हवा सर्वत्र आढळते.
- हवा डोळ्यांना दिसत नाही मात्र ती जाणवते.
- हवेला रंग, वास अथवा चव नसते.
- सजीवांना श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते.
- पाण्यात राहणारे मासेही पाण्यात विरघळलेल्या हवेचा उपयोग श्वसनासाठी करतात.
आपली हवेची गरज स्वाध्याय
प्र. १) काय करावे बरे?
अ) गर्दीच्या ठिकाणी श्वास घुसमटायला लागला आहे.
उत्तर : गर्दीच्या ठिकाणी सर्वजण हवेतील ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर सोडतात. त्यामुळे तेथे ऑक्सिजनची कमतरता भासू लागते. अशा ठिकाणी आपल्याला गुदमरायला लागते. अशावेळी त्या गर्दीच्या ठिकाणी न थांबता आपण गर्दीच्या ठिकाणाहून बाहेर येऊन मोकळ्या हवेमध्ये उभे राहावे. म्हणजेच कमी गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊन थांबावे.
प्र.२) गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द भरा.
( गरज, हवा, श्वासोच्छवास )
१. श्वासोच्छवास चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते.
२. हवा आपल्या अवतीभवती पसरली आहे.
३. माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही हवेची गरज असते.
प्र. ३) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. फुगा फुगविताना फुग्यात तुम्ही काय भरता?
उत्तर : फुगा फुगवताना आपण त्यामध्ये हवा भरतो.
२. आपल्याला हवेची गरज का असते?
उत्तर : श्वासोच्छवासासाठी आपल्याला हवेची गरज असते.
३. कुत्रा श्वसन करतो हे तुम्हाला कसे कळते?
उत्तर : कुत्र्याच्या छातीवर हात ठेवल्यावर त्याची छाती वर खाली होताना दिसते यावरून आपल्याला कुत्रा श्वसन करतो हे समजते.
४. मांजराला हवेची गरज कशासाठी असते?
उत्तर : श्वासोच्छवासासाठी मांजराला हवेची गरज असते.
प्र. ४) चूक की बरोबर लिहा.
१. हवा आपल्याला दिसते. = चूक
२. मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात. = बरोबर
३. हवेला वास असतो
४. हवेला चव नसते बरोबर