Skip to content

सावरपाडा एक्स्प्रेस :कविता राऊत

कविता राऊत

सावरपाडा एक्सप्रेस नावाचा पाठ इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये कविता राऊत या धावपटू विषयी माहिती सांगतो. कविता राऊत ही आदिवासी पाड्यावर राहणारी एक गरीब कुटुंबातील मुलगी होती. डोंगर कपारीत राहणारी ही मुलगी निरनिराळ्या कामांसाठी अनवाणी पायाने फिरायची. त्यामुळे कविता राऊत चे पाय अतिशय दणकट व कणखर बनले होते.

कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले. अतिशय ग्रामीण भागातून बिकट परिस्थितीवर मात करून कविता राऊत ने हे यश प्राप्त केले होते. कविता राऊत या गावाचे नाव सावरपाडा होते. पाडा याचा अर्थ आदिवासी भागातील छोटी वाडी किंवा वस्ती म्हणता येईल. सावरपाडा सारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली त्यामुळे तिला सावरपाडा एक्स्प्रेस म्हणतात.

शालेय जीवनामध्ये कविता राऊत ने शालेय स्तरावर अनेक बक्षीस मिळवली.कविता राऊत ने जेव्हा जिल्हास्तरावर धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिले क्रमांक मिळवला तेव्हा तिचे शिक्षक विजेंद्र सिंग यांनी कविता मधील धावण्याच्या कलागुणांची जाणीव झाली.

घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याकारणाने तिच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. तिला आपल्या गावापासून शहरापर्यंत शिक्षणासाठी ये ना पुन्हा धावण्याच्या सरावासाठी वेळ देणार यामध्ये तिची खूप ओढाताण होऊ लागली. म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला आपल्या घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विजेंद्र सिंग यांच्या घरी राहून तिने आपले पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव चालू ठेवला.

आता प्रयत्नानंतर तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे जिंकली. कविता राऊत ने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये यश संपादन केल्यानंतर ती तिच्या आईसोबत त्या कार्यक्रमांमध्ये गेली असता तिच्या आईचा अभिमानाने ऊर भरून आला. त्यावेळी कविताच्या आईला आपली मुलगी कोणीतरी मोठी व्यक्ती झाल्याची जाणीव झाली होती.

विद्यार्थ्यांनी आपल्या मनात आणले तर कोणत्याही बिकट परिस्थितीतून त्याला यश मिळू शकते. त्यासाठी त्याच्यामध्ये कष्ट करण्याची जिद्द, परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस, आणि अटक प्रयत्नांची गरज असते अशा प्रकारचा संदेश देणारा हा पाठ विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतो.

सावरपाडा एक्स्प्रेस : कविता राऊत स्वाध्याय 

प्र १) पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) कविता राऊत ने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला ?

कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताचा दबदबा निर्माण केला.

२) कविताचे पाय कशामुळे कणखर बनले ?

कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले.

३) कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले ?

 कविता राऊत ने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले.

४) कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते ?

कविता राऊत पी. टी. उषा या धावपटूला आदर्श मानते.

५) कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही?

आपल्या आईला उगीच वाईट वाटेल, म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही.

६) कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते ? 

कोणत्याही खेळातील खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते.

प्र २) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) कविता राऊतला ‘ सावरपाडा एक्स्प्रेस ‘ का म्हणतात?

कविता राऊत राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आले त्यामुळे तिला सावरपाडा एक्स्प्रेस म्हणतात.

२) कविताला कशामुळे दिलासा मिळाला ?

चीनमधील गुआंगजऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली. त्यावेळी दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्णपदक एका सेकंदांने हुकले होते. त्यामुळे निराश झालेल्या कविताच्या आईने समजूत काढली. यामुळे कविताला दिलासा मिळाला.

३) कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली ?

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हरसूल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणे ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला. पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली.

४) हरसूल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो ?

आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू कविता राऊत ही हरसूल- सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे. तिच्या यशामुळे हरसूल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून हरसूल- सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो.

५) आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईंना का वाटते ?

नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली. विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती. हजारोजण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांच्या गराडा हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईंना वाटते.

६) कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंह यांना का देतात ?

नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायांमधील दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली होती. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनी खूप प्रयत्न केले. म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील विजेंद्र सिंग यांनाच देतात.

प्र ३) कविता राऊत कडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल ?

आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कमालीची जिद्द आणि कष्ट असावे लागते, आपल्या परिस्थितीचे भांडवल करून आपले कर्तव्य कधीही टाळू नये, समोर आलेल्या बिकट परिस्थितीवर मात करून आपल्या ध्येयाप्रत पोहोचणे ही प्रेरणा आम्ही कविता करून घेऊ.

पायथागोरस सिद्धांत स्वाध्याय

प्र ४) पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्द समूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दांत सांगा.

१) तुमचे गल्ली / गाव कशात वेढलेले आहे ?

 अर्थ –  गावाच्या भोवती काय आहे ?

२) आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत.

अर्थ – शहरात (धुराचे) प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे.

३) अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेले आहेत.

अर्थ – सिमेंटच्या इमारतींनी वेढलेले.

४) कार्यालयात अनिता मॅडम नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात.

 अर्थ – अनिता मॅडमच्या अवतीभवती नेहमी खूप फायली असतात.

प्र ५) समान अर्थाचे शब्द लिहा.

१) माय = आई  २) गहिरे = खोल ३) लेक = मुलगी

४) क्रीडा = खेळ ५) बळ = शक्ती ६) वडील = बाप

प्र ६) पुढील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा.

उदा. पण – वेगळेपण, लहानपण

१) दार – चमकदार, बहारदार

२) पणा – कमीपणा, शहाणपणा, मोठेपणा

३) पणी – लहानपणी, जागेपणी

४) इक – आर्थिक, व्यवहारिक

५) इत – अखंडित, सदोदित

प्र ७) पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.

 १)  दिलासा मिळणे – 

दीपाचे घर भूकंपाने कोसळले; पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे तिला दिलासा मिळाला.

बरेच दिवस पावसाने दांडी मारली होती, आज पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला.

२) गराडा पडणे – 

आमदार गावात येताच त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडला.

मुलांचे आवडते गुरुजी शाळेत येतात सर्व मुलांनी त्यांच्याभोवती गराडा केला.

३) कणखर बनणे – 

नियमित व्यायाम केल्यामुळे पियुषचे शरीर कणखर बनले.

आपले शरीर कणखर बनवण्यासाठी व्यायामाची, कष्टाची गरज असते.

४) ओढाताण होणे – 

शेतातले काम व नोकरी यांमध्ये राजूची फार ओढाताण होते.

मॉल मजुरी करणाऱ्या लोकांची आपले पोट भरणे आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी खूपच ओढाताण होत असते.

५) नात्यातली वीण गहिरी असणे – 

नीता आणि मयुरी यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे.

६) वणवण सहन करणे – 

कष्टकऱ्यांना स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावी लागत होती.

डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांना आपले पोट भरण्यासाठी नेहमी वणवण सहन करावी लागते.



4 thoughts on “सावरपाडा एक्स्प्रेस :कविता राऊत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *