शब्द साखळी : शब्द साखळी अथवा शब्द गाडी हा इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढावी, खेळाच्या माध्यमातून वाचन- लेखन व्हावे यासाठी उपयुक्त असा हा उपक्रम आहे.
शब्द गाडी कशी तयार करावी?
शब्द गाडी तयार करताना सुरुवातीला विद्यार्थ्यांना एक शब्द दिला जातो. त्या शब्दाच्या शेवटचे अक्षर असेल त्या अक्षरेच्या चौदाखडी ने सुरू होणारा कोणताही शब्द विद्यार्थ्याने लिहावयाचा असतो. त्याच्यानंतर त्याच्यापुढे दुसऱ्या शब्दातील शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द लिहायचा. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना निरनिराळ्या अक्षरांचे शब्द वाचन व लेखन करण्याचा सराव होईल.
शब्द साखळीची लांबी ही विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार निरनिराळे असू शकते. यामध्ये साधारणपणे किमान पाच शब्दांची साखळी अपेक्षित असते.
या ठिकाणी आपण नमुना दाखल काही शब्द साखळ्या पाहणार आहोत. ज्याप्रमाणे साखळ्यांच्या कड्या एकमेकांमध्ये अडकलेल्या असतात; त्याचप्रमाणे शब्दातील शेवटचे अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील सुरुवातीचे अक्षर सारखेच असते.
शब्द साखळी
१) वाघ – घर – रस – सरबत – तबकडी – डमरू- रुपया- यात्रा – त्रिकोण
२) फुल – लहान – नरम – मासा – ससा – साप – पर्वत – तलवार – रहाट – टरबूज – जहाज – जंगल – लसूण
३) मुलगा – गवा – वानर – रस्ता – तूर – रिंग – गरुड – डिश – शनिवार – रथ – थडगे – गेम – मगर – रण
४) पंखा – खराटा – टाक – कमी – मीठ – ठसा – सुंदर – रथ – थडगे – गाव – वाढ – ढळक – काळ
५) गाय – यज्ञ – ज्ञान – नाग – गवत – तराजू – जून – नारळ
६) कपाट – टिकटिक – कणखर – रवंथ – थांब- बदक – कौलारू – रेडकू – कुसळ
७) पारवा – वाकडा – डॉक्टर – रीत – ताकद – दप्तर – रसवंती गृह – हौद – दारात- तराजू – जून – नळी
८) काकडी- डमरू – रूप – पेरू – रुद्रा – द्राक्ष – क्षमाशील – लांडोर – रीत – तरुण
९) खांब – बाजार – रथ – थडगे – गजर – रुसवा – विस्तार- रंग- गरुड- डफली – लीला – लाडू- डुक्कर
१०) पोशाख – खारट – टोपली – लस – सहल – लपाछपी – पिशवी – विळा