Skip to content

20. कणभर तीळ स्वाध्याय इयत्ता दुसरी

  • by
कणभर तीळ स्वाध्याय

कणभर तीळ स्वाध्याय : कणभर तीळ ही कविता इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील आहे. या कवितेमध्ये वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा आणि तीळ यांची गंमत कवीने मांडली आहे. या ठिकाणी आपण कणभर तीळ स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपात अभ्यासणार आहोत.

कणभर तीळ स्वाध्याय

१) कोण ते लिही.

अ) तिळाला पाहून हसणारे – वाटणा, फुटाणा, शेंगदाणा

आ) तिळाच्या बरोबर जाणारे – वाटणा, फुटाणा, शेंगदाणा

इ) हलवा करणारी – ताई

२) का ते लिही.

अ) वाटणा, फुटाणा, शेंगदाणा हे तिळाला हसू लागले, कारण तीळ कोठेही न थांबता भरभर चालला होता.

आ) वाटणा, फुटाणा, शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले, कारण त्यांना तिळाची गंमत बघायची होती होती.

इ) ताई रुसून बसली, कारण हलवा करायला घरात तीळ नाव्हता.

ई) वाटणा, फुटाणा, शेंगदाणा घाबरून गेले, कारण त्यांनी रसरसून शेगडी पेटलेली बघितली.

३. असे कोण म्हणाले?

अ) तिळा, तिळा कसली रे गडबड?

असे वाटणा, फुटाणा, शेंगदाणा म्हणाले.

आ) काम आहे मोठं, मला नाही सवड.

असे तीळ म्हणाला.

४. दिलेल्या शब्दांवरून प्रश्न तयार करा.

१) सोनाली – हुशार

१) सोनाली कशी आहे?

२) हुशार कोण आहे?

२) खुर्ची – लहान

१) खुर्ची कशी आहे?

२) लहान काय आहे ?

३) दूध – गरम

१) दूध कसे आहे?

२) गरम काय आहे?

४) बर्फ – थंड

१) थंड काय आहे ?

२) बर्फ कसे आहे ?

५) शर्ट – रंगीत

२) शर्ट कसे आहे?

२) रंगीत काय आहे?

६) लोखंड – जड

१) लोखंड कसे आहे?

२) जड काय आहे?

७) कापूस – हलका

१) हलका काय आहे?

२) कापूस कसा आहे?

८) गूळ – गोड

१) गूळ कसा आहे?

२) गोड काय आहे?

९) मीठ – खारट

१) मीठ कसे आहे?

२) खारट काय आहे?

१०) फूल – सुगंधी

१) सुगंधी काय आहे?

२) फूल कसे आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *