इयत्ता पाचवीच्या वर्गातील कापणी या कवितेच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 मध्ये जळगाव जिल्ह्यातील असोदा या गावी झाला. बहिणाबाईंचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी नथुजी यांच्याशी झाला. त्यांना ओंकार, सोपानदेव असे दोन मुलगे होते आणि काशी नावाची मुलगी होती.
बहिणाबाई या एक निरक्षर कवयित्री होत्या. त्या कधीही शाळेत गेल्या नव्हत्या अथवा त्यांनी कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतले नाही. त्यांनी काम करताना, घरी अथवा अन्य ठिकाणी ज्या कविता गायल्या त्या कविता इतरांनी लिहून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा कविता लिहावयाच्या राहून गेल्या.
बहिणाबाई या जरी अशिक्षित असल्या तरी त्यांची प्रतिभा अलौकिक होती. बहिणाबाईंच्या कविता या अहिराणी भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत. जीवनातील वास्तविकता आपल्या बोली भाषेत त्या मांडतात.
कवितेचा सारांश
बहिणाबाई चौधरी यांची ही कविता शेतीतील पिकाच्या कापणीचे आणि त्यावेळी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनस्थितीचे वर्णन करते. कवयित्री म्हणते की आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि कापणीची वेळ आली आहे. आणि त्यामुळे माझ्या डोळ्याची पापणी खाली वर होत आहे.
कापणीच्या वेळेस पावसाने पूर्ण विश्रांती घेतलेली असते. शेतातील पाणी पूर्णपणे आटून गेलेले असते. त्यामुळे जमिनीला तडे गेले आहेत. कापणीनंतर जे धान्य पिकणार आहे त्या धान्याचे ढीग कवयित्रीच्या समोर उभे राहत आहेत. त्यांना दिसत आहेत.
शेतातील धान्य पिकल्यामुळे शेत पिवळे धम्मक दिसत आहे. शेतातील धान्य पिकनिक अगोदर ते हिरव्या रंगाचे दिसते मात्र ते पिकल्यानंतर पिवळे होते. म्हणजेच शेतातील पीक कापायला आलेले आहे याची जाणीव शेतकऱ्यांना होते.
शेतीच्या कपणीसाठी सर्वांना खूप कष्ट करावे लागते. त्यासाठी शेतात राब राब राबवे लागते. हे कष्ट करण्यासाठी सर्वांनी हिम्मत धरा आणि कापणीसाठी आपले विळे पाजवून ठेवा. म्हणजेच त्यांना धार लावून घ्या. कारण शेतातील पिके कापण्यासाठी आवश्यक ती धार नसल्यास पिके कापताना त्रास होतो. म्हणजे कापणीसाठी आवश्यक साहित्याची तयारी करून ठेवा.
कवयित्री आपल्या विळ्याला म्हणतात की काप काप माझ्या विळ्या, आली कापनी कापनी. कापणीच्या नंतर पिकाची रगडणी करायची आहे. म्हणजे त्याची झोडणी करायची आहे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून खळे तयार करा. आणि त्या खळ्यावर झोडणी करूया.
अशाप्रकारे शेती मधील पीक तयार झाल्यानंतर कापणीसाठी होणारी शेतकऱ्यांची तळमळीचे वर्णन कवयित्री करतात.
कापणी स्वाध्याय
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते ?
कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते.
२) पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते ?
पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते.
३) पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते ?
पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते.
४) कवयित्रीने ‘ हिंमत धरा ‘ असे का म्हटले आहे ?
कापणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात; म्हणून कवयित्रीने ‘ हिंमत धरा ‘ असे म्हटले आहे.
५) कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे ?
कापणीच्या वेळी उगवलेले धाटे पटकन व लवकर कापता यावेत; म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे.
प्र २) पुढील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा.
१) आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा.
शेत पिवये धम्मक ,
आली कापनी कापनी.
आता धरा रे हिंमत ,
इय्ये ठेवा पाजवुनी.
२) हातातली गोफण खाली ठेवा व हातात विळे घ्या.
हातामधी धरा इय्ये ,
खाले ठेवा रे गोफनी.
३) कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे.
आली कापनी कापनी
थाप लागली पिकाची.
४) कापणी झाल्यावर रगडणी येते.
आली पुढे रगडनी ,
आता कापनी कापनी.
अति तिथे माती स्वाध्याय इयत्ता पाचवी
प्र ३) ‘ इया ‘ म्हणजे विळा. बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत ‘ व ‘ ऐवजी ‘ इ ‘ आणि ‘ ळ ‘ ऐवजी ‘ य ‘ चा उपयोग करतात. कवितेत आलेले असे शब्द लिहा.
१) ‘ व ‘ ऐवजी ‘ इ ‘ – इय्ये , इय्या.
२) ‘ ळ ‘ ऐवजी ‘ य ‘ – डोयाची, डोयापुढे, पिवये, डोयाले, खये.
प्र ४) कंसातील सूचनानुसार वाक्ये बदलून पुन्हा लिहा.
१) आकाशात ढग येताच मोर नाचू लागला.
( ‘ मोर ‘ ऐवजी ‘ मुले ‘ हा शब्द घ्या.)
आकाशात ढग येताच मुले नाचू लागली.
२) साप दिसताच तो घाबरला.
( ‘ तो ‘ ऐवजी ‘ त्या ‘ हा शब्द घ्या.)
साप दिसताच त्या घाबरल्या.
३) अभयने दप्तर जागेवर ठेवले.
( ‘ अभय ‘ ऐवजी ‘ शारदा ‘ हा शब्द घ्या.)
शारदाने दप्तर जागेवर ठेवले.
४) पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
( ‘ पृथ्वी ‘ ऐवजी ‘ चंद्र ‘ हा शब्द घ्या.)
चंद्र सूर्याभोवती फिरतो.
प्र ५) कंसांत काही क्रियापदे दिली आहेत. त्यांची योग्य रूपे तयार करून पुढील वाक्यांतील रिकाम्या जागी लिहा.
उदा., राधाने टाळ्या …… ( वाजवणे )
राधाने टाळ्या वाजवल्या.
१) शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन ……. ( करणे )
शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले.
२) चंदूने झाडांना पाणी ……. ( घालणे )
चंदूने झाडांना पाणी घातले.
३) आईने नीताला प्रश्न …….. ( विचारणे )
आईने नीताला प्रश्न विचारला.
४) मंदा गाणी छान …… ( म्हणणे )
मंदा गाणी छान म्हणते.
प्र. ६) पुढील वाक्ये वाचा. त्यांतील समानार्थी शब्द शोधा व लिहा.
उदा., शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना.
संतोष = आनंद.
१) पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते.
पंकज = सरोज = कमळ.
२) सौदामिनी ने आकाशात वीज कडाडताना पाहिले.
सौदामिनी = वीज.
३) रजनी, यामिनी या निशा च्या घरी रात्री गेल्या.
रजनी = यामिनी = निशा = रात्र.
४) संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते.
संग्राम = समर = युद्ध.
५) सुमन, कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतल्या कार्यक्रमासाठी फुले गोळा केली.
सुमन = कुमुद = कुसुम = फुल.
६) रवी, भास्कर, आदित्य, सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात.
रवी = भास्कर = आदित्य = सविता = भानू = मित्र = सूर्य.
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा.