Skip to content

19. हे कोण गे आई स्वाध्याय इयत्ता चौथी

  • by
हे कोण गे आई स्वाध्याय

हे कोण गे आई स्वाध्याय : हे कोण गे आई ही कविता भा. रा. तांबे यांची इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील आहे. या कवितेमध्ये वाऱ्यामुळे होणाऱ्या निरनिराळ्या घटना कवीने मांडलेले आहेत.

या ठिकाणी आपण हे कोण गे आई स्वाध्याय प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत.

हे कोण गे आई स्वाध्याय

प्र. १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे?

उत्तर – पाखरांसारखी शीळ वारा वाजवत आहे.

२) कवी घाबरून का पळाला?

उत्तर – मुलाने हाका मारल्या तेव्हा त्याला प्रतिध्वनी ऐकू आल्यामुळे तो तिथून घाबरून पळाला.

३) कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या?

उत्तर – कवितेत घडलेल्या सर्व घटना या वाऱ्यामुळे घडल्या.

४) कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या?

उत्तर – झाडाच्या सावल्या नदीच्या पाण्यात थरथरताना कवीने हाका मारल्या; तेंव्हा कवीने वाकुल्या (प्रतिध्वनी) ऐकल्या.

प्र. २) खालील गोष्टींसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहेत?

१) वडाच्या पारंब्या – वडांच्या दाढयां.

२) दाट झाडांतून पानांतून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज – शीळ

३) वावटळ – वाळलीं सोनेरी | पानें गे चौफेरीं

मंडळ धरोनी | नाचती ऐकोनी !

प्र. ३) जोड्या जुळवा.

हे कोण गे आई स्वाध्याय

गट अगट ब
मोडके देऊळ
जांभळीअंधारी
वडाच्यादाढ्या
सोनेरीपाने
चिंचेचेशेंडे

जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय इयत्ता चौथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *