Skip to content

NMMS Exam date 2024-25

  • by
NMMS Exam date 2024-25

NMMS Exam date 2024-25 : इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता NMMS ही परीक्षा घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली जाते. या पोस्टमध्ये आपण सन 2024- 25 मध्ये होणाऱ्या परीक्षेची तारीख आणि त्या परीक्षेसाठी जुन्या प्रश्नपत्रिका कशा डाऊनलोड कराव्यात हे पाहणार आहोत

NMMS Exam date 2024-25

सन 2024- 25 मध्ये होणारी राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच NMMS परीक्षा 22 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.

NMMS परीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड कराव्यात?

कोणत्याही परीक्षेच्या तयारीसाठी त्या परीक्षेला यापूर्वी आलेल्या प्रश्नांचा सराव करणे खूप आवश्यक असते. एन एम एम एस परीक्षेसाठी सुद्धा मागील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेऊन त्यांचा सराव करणे खूप फायदेशीर आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांची ओळख होते आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा अंदाज घेऊन प्रश्नांचा सराव करता येतो. न समजलेले घटक यावर योग्य मार्गदर्शन घेता येते.

जे प्रश्न सोडवताना अधिक वेळ लागतो असे प्रश्न शोधून त्याबाबत एखाद्या युक्तीचा वापर करून ते लवकरात लवकर कसे सोडवता येतील याबाबत मार्गदर्शन घेता येईल अथवा सराव करता येईल.

एन एम एम एस परीक्षेच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत संख्या स्थळावर उपलब्ध आहेत. आपण या प्रश्नपत्रिका या संख्या स्थळावरून डाऊनलोड करून घेऊ शकता.

त्याचबरोबर मागील सर्व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *