जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय : जननायक बिरसा मुंडा हा इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. इंग्रजांनी वन कायदा केल्यानंतर बिरसा मुंडा आणि इतर आदिवासींनी मिळून इंग्रजा विरुद्ध लढा उभारला.
या ठिकाणी आपण जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत.
जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला?
उत्तर – बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी उलिहातू येथे झाला.
२) बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले?
उत्तर – बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले.
३) बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता?
उत्तर – बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्यातही विशेष रस होता.
४) तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला?
उत्तर -तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला.
५) बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला?
उत्तर -बिरसा मुंडा यांना लोकांनी ‘जननायक‘ हा किताब बहाल केला.
प्र. २) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.
१) संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते.
२) १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
३) बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले.
प्र ३) वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
१) रस असणे – रुची असणे, आवड असणे.
२) असंतोष निर्माण होणे – चीड निर्माण होणे.
३) कारावास ठोठावणे – तुरुंगवासाला पाठवणे.
४) संकल्प करणे – एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे.
५) टिकाव लागणे – टिकणे.
६) वीरगती प्राप्त होणे – देशासाठी लढताना मरण येणे.
प्र ४) ‘जननायक’ हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला, तसे खालील किताब कोणाला मिळाले?
- महात्मा – मोहनदास गांधी, ज्योतिबा फुले
- लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक
- स्वातंत्र्यवीर – वि. दा. सावरकर
- नेताजी – सुभाष चंद्र बोस
- क्रांतिसिंह – नाना पाटील
- लोकनायक – जयप्रकाश नारायण
झुळूक मी व्हावे स्वाध्याय इयत्ता चौथी
प्र ५) पाठात आलेल्या सनांची व घटनांची यादी करा.
१)१५ नोव्हेंबर १८७५ – बिरसा मुंडा यांचा जन्म.
२) सन १८९४ – बिहारमध्ये भीषण दुष्काळ.
३) सन १८९५ – बिरसा मुंडा यांना दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा.
४) सन १८९७ – इंग्रज व आदिवासींमध्ये लढाया सुरू.
५) सन १८९८ – इंग्रज व आदिवासी यांच्यातील लढाईत सुमारे ४०० आदिवासी शहीद.
६)सन १९०० – बिरसा मुंडा यांच्या सभेवर इंग्रजांचा हल्ला.
७) ९ जून १९०० – बिरसा मुंडा यांना तुरुंगात वीरगती प्राप्त झाली