Skip to content

महात्मा ज्योतिबा फुले भाषण | म. जोतीराव फुले निबंध

महात्मा ज्योतिबा फुले भाषण

महात्मा ज्योतिबा फुले भाषण : म. जोतीराव फुले हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, विचारवंत, लेखक होते. या लेखात आपण महात्मा ज्योतिबा फुले भाषण पाहणार आहोत.

महात्मा ज्योतिबा फुले भाषण

विद्येविना मती गेली,

मतीविना नीती गेली,

नीतीविना गती गेली, 

गतीविना वित्त गेले ,

वित्ताविना शूद्र खचले,

इतके अनर्थ एका अविद्येने केले.

शिक्षणाविषयी असे अतिशय मार्मिक विचार मांडणारे थोर समाज सुधारक, विचारवंत, लेखक, शिक्षक म. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस आणि विचारांस माझे कोटी कोटी प्रणाम.

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती.

महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन

म. जोतीराव फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले होते. त्यांचा जन्म  ११ एप्रिल १८२७ रोजी कटगुण या त्यांच्या मुळ गावी झाला. यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. त्यांचे  मूळ आडनाव गोरे होते, पुढे ते त्यांच्या व्यवसायावरून फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच आडनाव पुढे रूढ झाले.

पूर्वीच्या काळात मुला मुलींचं लग्न वयाच्या लहान वयात करण्यात येत होती. पुणे- सातारा रस्त्यावरील नायगाव येथे असलेल्या खंडोजी नेवसे पाटील यांची ज्येष्ठ कन्या सावित्री यांच्याशी जोतिबा फुले यांचा विवाह १८४० मध्ये झाला. तेंव्हा म. फुले १३ वर्षाचे होते व सावित्रीबाई ९ वर्षाच्या होत्या.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. म. फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यापूर्वी मुलींसाठी शिक्षणाची सोय नव्हती. मुलीनी फक्त चूल आणि मुल सांभाळावे अशी प्रथा होती.

महात्मा ज्योतिबा फुले भाषण

पुण्यामध्ये मुलींच्या साठी पहिली शाळा सुरू झाली खरी पण शाळेत मुलींना पाठवायला कोणीही तयार नव्हतं. अनेक प्रयत्नानंतर महात्मा फुले यांनी आपल्या काही मित्रांच्या मुली शिक्षणासाठी शाळेत आणल्या. मुलींचे शिक्षण सुरू झाले त्याबरोबरच हळूहळू मुलींची संख्याही वाढू लागली.

महात्मा फुले यांना एकट्याला सांभाळणे अवघड होऊ लागल्याने त्यांना दुसऱ्या शिक्षकाची आवश्यकता भासू लागली. म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना पाठवण्यास सुरुवात केली.

ज्या काळामध्ये मुलींना शिकवणे पाप समजले जात होते त्या काळामध्ये एखाद्या स्त्रीने शिक्षिका होणे तत्कालीन समाजाला मान्य नव्हते. म्हणून जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असेल तेव्हा लोक त्यांना दगड, चिखल, शेणाचे गोळे व इतर घाण त्यांच्या अंगावर मारत असत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देत असत. शिव्या देत असत. पण अशा त्रासाला ना महात्मा फुले कंटाळले ना सावित्रीबाई फुले. त्यांनी आपले काम चालूच ठेवले.

सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या, त्यांच्या सोबतचं फतिमा शेख या पहिल्या मुस्लीम प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या. अनंत यातना सोसूनही त्यांनी आपले मुलींचे शिक्षण सुरूच ठेवले. हळूहळू महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये आणखी काही शाळा मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी सुरू केल्या.

महात्मा ज्योतिबा फुले भाषण

शिक्षणाबरोबरच महात्मा फुले यांनी कर्मकांडाना कडाडून विरोध केला. त्यांची शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी यासारखी पुस्तके तत्कालीन परिस्थितीची जाणीव करून देतात. शेतकऱ्यांच्या हालाखीचे जीवन असण्यासाठी त्यांनी सांगितलेली कारणे आणि उपाय आजही लागू होतात.

शेतकऱ्यांचे आसूड‘ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजाची रायगडावरील समाधी शोधून त्यांनी शिवजयंती सुरु केली. त्च्यायां कार्याचे वर्णन करणारा पोवाडा लिहिला. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.

२४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सत्यशोधक समाजाच्या द्वारे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. पुरोहितांचे प्राबल्य कमी करून सर्वसामन्यांची लुटीतून व अत्याचारातून मुक्तता करण्याचे कार्य म. फुलेंनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन

महात्मा ज्योतिबा फुले भाषण

क्रांती सूर्य म. फुले यांनी सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखी करण्यासाठी, मुलींना शिक्षण देण्यासाठी, समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या, अनाथांच्या, दिनदलितांची दुखे, कष्ट कमी करण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले. आशा या महान समाज सुधारकांचे निधन नोव्हेंबर २८ नोव्हेंबर १८९० रोजी पुणे येथे झाले. म्हणून २८ नोव्हेंबर हा महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन आहे.

त्यांच्या मृत्यू नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. त्यांच्यानंतर राजर्षी शाहू महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे कार्य पुढे चालू ठेवले.

आशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम! जय हिंद! जय भारत!

1 thought on “महात्मा ज्योतिबा फुले भाषण | म. जोतीराव फुले निबंध”

  1. Pingback: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर |Dr. Babasaheb Ambedkar Bhashan - अभ्यास माझा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *