संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका : महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यात प्रथम सत्र परीक्षेचे आयोजन केले जाते.
STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी अंतर्गत संकलित चाचणी 1 चे आयोजन राज्यातील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यासाठी केले जाते. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी क्रमांक 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी क्रमांक 1 वेळापत्रक
क्र. | विषय | दिनांक |
1 | प्रथम भाषा (सर्व माध्यम) | 22/ 10/ 2024 |
2 | तृतीय भाषा इंग्रजी | 23/ 10/ 2024 |
3 | गणित | 24/ 10/ 2024 |
संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका (शाळा स्तर)
संकलित मूल्यमापन चाचणी १ या परीक्षेसाठीचे प्रथम भाषा (मराठी), गणित व इंग्रजी या विषयाचे पेपर शासनामार्फत पुरवले जातात. उर्वरित विषयांची परीक्षा शाळा स्तरावर पेपर काढून घ्यावयाची असते.
यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीचे सर्व पेपर शाळा स्तरावर घ्यावयाचे आहेत. इयत्ता तिसरी व चौथीचा परिसर अभ्यास विषयाचा पेपर शाळा स्तरावर घ्यावयाचा आहे. इयत्ता पाचवीचे हिंदी व परिसर अभ्यास विषयाचे पेपर शाळा स्तरावर घ्यावयाचे आहेत.
या ठिकाणी आपल्याला शाळा स्तरावर घ्यावयाच्या इयत्ता पहिली ते पाचवी वर्गांचे संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका सत्र 1 नमुना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे पेपर आपण पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता.
या संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका सत्र 1 चा वापर आपल्याला सरावासाठी करता येईल.
आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे सराव चाचणी
परीक्षेचे पेपर डाऊनलोड करण्यासाठी ज्या विषयाचा पेपर हवा आहे त्या विषयावर क्लिक करा. नमुना दाखल दिलेल्या संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका आपल्या फोनमध्ये डाऊनलोड होतील. त्या पेपरची सरावासाठी आपण प्रिंट काढून घेऊ शकता. तिचा अभ्यास करू शकता.
संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका प्रथम सत्र PDF
अ.क्रं. | इयत्ता | विषय |
1 | पहिली | मराठी गणित |
2 | दुसरी | मराठी गणित |
3 | तिसरी | परिसर अभ्यास |
4 | चौथी | परिसर अभ्यास |
5 | पाचवी | परि. अभ्यास हिंदी |
वरील सर्व प्रश्नपत्रिका या नमुना दाखल असून आपण यामध्ये आपल्या विद्यार्थ्या नुसार आवश्यक बदल करून वापर शकता. प्रश्नपत्रिका बाबतचा अभिप्राय कमेंट लिहून अवश्य कळवा. अशाच नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी नोटिफिकेशन ऑन करा.
Thanks