Skip to content

माळीण गाव एक घटना स्वाध्याय इयत्ता 5 वी

  • by
माळीण गाव एक घटना

माळीण गाव एक घटना हा इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील एक घटक आहे. माळीण गाव हे पुणे जिल्ह्यातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं एक गाव होते. 30 जुलै 2014 या दिवशी प्रचंड पाऊस कोसळत होता. कोसळणाऱ्या पावसामुळे माळीण गावामध्ये भूस्खलन होऊन संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

जवळपास 40 – 50 कुटुंबे या गावांमध्ये राहत होती. गावातील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आणि होत्याचे नव्हते झाले. इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकात माळीण गाव एक घटना मध्ये तेथे घडलेल्या या घटनेनंतर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या त्यांच्या शीर्षकांची कात्रणे दिली आहेत. त्यावर आधारित स्वाध्याय पाहूया.

माळीण गाव एक घटना स्वाध्याय

प्र. 1 बातम्यांची कात्रणे वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटने संबंधी आहेत?

उत्तर – 30 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण या गावी घडलेल्या घटने संबंधी ही बातमी आहे. या दिवशी प्रचंड पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बसलेले माळीन हे गाव दरड कोसळून गाडले गेले. त्या घटनेशी संबंधित बातम्यांची शीर्षके येथे दिली आहेत.

2. माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती?

उत्तर – माळीण गावात साधारणपणे 40 ते 50 कुटुंबे राहत होती.

3. कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता?

उत्तर – नासा या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता.

4. मदतीची घोषणा कोणी केली? कशा स्वरूपात?

उत्तर – महाराष्ट्र राज्य सरकारने माळीन घटनेनंतर मदतीची घोषणा केली. सदर मदत ही पैशाच्या स्वरूपात केली जाणार होती.

5. ढिगार्‍याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले?

उत्तर – माळीन येथे ढिगाऱ्याखालून आठ लोकांना जिवंत काढण्यात आले.

6. ढिगाऱ्या खालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्न यांची पराकाष्ठा केली?

उत्तर – ढिगार्‍या खालचे मृतदेह काढण्यासाठी एन. डी. आर. एफ. ने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

7. माळीण गावची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली?

उत्तर – माळीण गाव बाबतची दुर्घटना पावसाळा या ऋतूत 30 जुलै 2014 या दिवशी घडली.

8. शोध कार्यात कोण कोणत्या गोष्टीमुळे अडथळे आले?

उत्तर – शोधकार्यात मोबाईल टॉवर्स व वीज पुरवठा नसल्यामुळे अडथळे आले होते.

9. माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली?

उत्तर – माळीण गावातील लोकांना राज्य शासन, एन.डी. आर. एफ. पथक, डॉक्टरांची पथके, संपूर्ण सरकारी यंत्रणा व जागरूक नागरिक इत्यादी लोकांनी मदत केली.

विशेषण म्हणजे काय?

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. एखाद्या वाक्यामध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा एखादा शब्द किंवा अनेक शब्द असतात त्यांना विशेषण म्हणतात.

उदा- १) कारल्याची चव कडू असते.

२) वेदिका हुशार आहे.

वरील वाक्यामध्ये कारले आणि वेदिका ही दोन नाम आहेत. कारल्या बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कडू आहे तर वेदिका बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हुशार आहे. म्हणून या कडू आणि हुशार ही दोन विशेषणे आहे.

आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह इयत्ता पाचवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *