छोटे आजार घरगुती उपचार हा घटक इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील आहे. यामध्ये छोट्या छोट्या आजारामध्ये केले जाणारे घरगुती उपचार यांची ओळख करून देण्यात आली आहे. घरगुती उपचार ठराविक पातळीपर्यंत करता येतात याचीही जाणीव मुलांना करून दिली आहे. पोटात जाणारे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेण्यात येऊ नये.
छोटे आजार घरगुती उपचार स्वाध्याय
१. काय करावे बरे?
अ) मुंबईच्या एका शाळेत हेलन इयत्ता चौथीत शिकते. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली. तिची शुद्ध हरपली. पायाला जबरदस्त दुखापत झाली.
अशा वेळी सर्वात प्रथम मिळेल त्या गाडीने तिला जवळच्या दवाखान्यात पोहोचवणे आवश्यक आहे. दवाखान्यात नेताना जखम झालेल्या पायाची काळजी घ्यावी. त्वरित तिच्या पालकांना याबाबतची कल्पना द्यावी.
२. जरा डोके चालवा.
१. अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो?
उत्तर: अडुळशाच्या पानांचा अर्क खोकल्यासाठी उपयोगी पडतो.
२. सर्दीची लक्षणे कोणती
उत्तर: नाकातून सतत शेंबूड येणे, सतत शिंका येणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही सर्दीची लक्षणे आहेत.
३. बाम कशासाठी वापरतात
उत्तर: डोकेदुखी, पाय मुरगळल्यास आशा जागी वेदना कमी करण्यासाठी बाम वापरतात.
४. ताप उतरल्याची खूण कोणती
उत्तर: घाम येणे ही ताप उतरल्याची खूण आहे.
३. कोष्टक पूर्ण करा.
पुढे काही आजारांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोणते आजार लवकर बरे होणारे आहेत. व कोणते आजार लवकर बरे न होणारे आहेत ते ठरवा आणि खालील गोष्ट पूर्ण करा.
(सर्दी, चिकनगुनिया, हिवताप, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, विषमज्वर, गरम तव्याचा बोटांना चटका बसला, पाय मुरगळणे)
लवकर बरे होणारे आजार | लवकर बरे न होणारे आजार |
सर्दी, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे, पाय मुरगळणे | चिकनगुनिया, हिवताप, विषमज्वर |
३. थोडक्यात उत्तरे लिहा.
१. सखूचा घसा का दुखू लागला?
उत्तर : सखूने थंडगार आईस्क्रीम खाल्ल्याने सखूचा घसा दुखू लागला.
२. कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले?
उत्तर: कावीळ झाल्यामुळे ताईला तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.
३. सर्दी वर घरगुती उपचार कोणता?
उत्तर: सर्दी झाल्यास गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात.
४. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का?
उत्तर: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घेऊ नयेत.
४. गाळलेल्या जागा भरा.
१. सखूच्या ताईचे डोळे पिवळे दिसत होते.
२. साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला.
३. धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे.