YCMOU Admission 2024-25 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत बहिस्थ विद्यार्थ्यांकरिता निरनिराळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. जे विद्यार्थी नोकरी करत शिक्षण घेऊ इच्छितात किंवा ज्या विद्यार्थ्यांना नियमितपणे कॉलेजला उपस्थित राहता येत नाही अशा विद्यार्थ्यांकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुढील शिक्षणाची एक सुवर्णसंधी देते.
दरवर्षीप्रमाणे सन 2024 -25 करिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात YCMOU Admission 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू झाले असून आपणही आपले शिक्षण पूर्ण करू इच्छित असाल तर या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकता. या लेखात प्रवेश घेण्याची अंतिम तारीख कोणती (YCMOU Admission 2024-25 last date)? प्रवेशापूर्वी ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या अभ्यासक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करावी? याची माहिती पाहणार आहोत.
YCMOU Admission 2024-25 last date
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांमध्ये दिनांक 1 जून 2024 पासून ते 31 जुलै 2024 पर्यंत प्रवेश साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत होती, मात्र विद्यापीठाच्या नवीन सूचनेनुसार सदर मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. नवीन सूचनेनुसार 15 सप्टेंबर 2024 पर्यंत विना विलंब शुल्क प्रवेश अर्ज करता येतील. म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 15/09/ 2024 आहे.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या अभ्यासक्रमाचे शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरून आपला अर्ज सादर करता येईल. विद्यार्थ्यांनी एक जून 2024 ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत च्या मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेशासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर प्रवेश घेणे आवश्यक आहे.
YCMOU Result 2024 मोबाईलमध्ये पहा फक्त 2 मिनिटात.
YCMOU Admission 2024-25 Prospectus
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम यांना प्रवेश घेता येतो. ज्या अभ्यासक्रमाला आपण प्रवेश घेऊ इच्छिता त्या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तक डाऊनलोड करून त्या अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. यामध्ये अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमाची फी, अभ्यासक्रमासाठी असलेले विषय, परीक्षेचे स्वरूप इत्यादी माहिती आपल्याला या माहिती पुस्तिकेतून मिळू शकते. यासाठी प्रवेश घेण्यापूर्वी YCMOU च्या मुखपृष्ठावर ऍडमिशन नावाची जी टॅब दिसते त्या टॅब मध्ये जाऊन आपण सदर अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका डाऊनलोड करून घेऊ शकतो.
अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
- सर्वात प्रथम आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा.
- ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्स मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संकेतस्थळ टाइप करा. https://ycmou.digitaluniversity.ac/ आणि सर्च करा.
- सर्च केल्यानंतर आपल्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुखपृष्ठ दिसेल. त्यामध्ये वरील आडव्या मेनू बार मध्ये आपल्याला Admission नावाची टॅब दिसेल त्या टॅब वरती क्लिक करा.
- त्यावरती क्लिक केलं तर आपल्यासमोर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या prospectus 2024-25 ची एक लिंक दिसेल त्या लिंक वरती क्लिक करा.
- त्यानंतर आपल्यासमोर सर्व अभ्यासक्रमांची यादी दिसेल. ज्या अभ्यासक्रमाचे माहिती पुस्तिका डाऊनलोड करावयाचे आहे त्यासमोरील click here ह्या tab वरती क्लिक करा.
- त्यानंतर आपल्या फोनमध्ये अथवा लॅपटॉप मध्ये सदर अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका डाऊनलोड होईल. तिचे वाचन केल्यानंतर आपण त्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेऊ शकता.आशाप्रकारे कोणत्याही अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका डाउनलोड करून घेऊ शकता.
ऍडमिशन बाबत काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता.