Skip to content

संतवाणी- धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय 9 वी

धरिला पंढरीचा चोर

धरिला पंढरीचा चोर हा संत जनाबाई यांनी लिहिलेला अभंग आहे. संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील कवयित्री आहेत. धरिला पंढरीचा चोर अभंगात कवयित्री पंढरीच्या विठ्ठलाला चोराची उपमा देतात. कवयित्री विठ्ठलाला आपल्या हृदयाचा बंदिखाना करून कोंडून ठेवला आहे.

शब्दांची जुळवाजुळव करून बेडी तयार केली व ती विठ्ठलाच्या पायात घातली.

संतवाणी- धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय 9 वी

प्र.१. खाली दिलेल्या शब्दासाठी धरिला पंढरीचा चोर अभंगात आलेल्या उपमा लिहा.

अ) विठ्ठल = पंढरीचा चोर

आ) हृदय = बंदिखाना

प्र. २. जोड्या लावा.

अ गट ब गट

गट अ गट ब
१)विठ्ठलाला धरलेअ)भक्तीच्या दोराने
२)विठ्ठल काकुळती आलाआ)तू म्हणजे मीच या शब्दाने
३)विठ्ठलाच्या पायी घातली बेडीइ)शब्दरचनेच्या जुळणीने

प्र. ३. धरिला पंढरीचा चोर या अभंगाचे काव्यसौदर्य.

अ) ‘सोह शब्दांचा मारा केला I विठ्ठल काकुलती आला II ‘ या ओळीतील विचार स्पष्ट करा.

उत्तर- संत जनाबाईनी आपल्या भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या हृदयाचा कैदखाना करून त्यात विठ्ठलाला डांबून ठेवले. श्री विठ्ठल आपल्या हृदयातून जाऊ नये म्हणून त्यांनी त्यावर ‘तू म्हणजेच मीच’ या अहंभावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल व्याकूळ झाला आणि विनवणी करू लागला कि मी तुझ्या हृदयात राहीन पण सोह शब्दाचा मारा बंद कर.

आ) जनी म्हणजे बा विठ्ठला I जीवे न सोडी मी तुला II या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईची भाव स्पष्ट करा.

उत्तर- संत जनाबाईंना श्रीविठ्ठलाने आपल्या मनात कायमचे राहावे म्हणून दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात डांबून ठेवले. शिक्षा म्हणून शब्द जोडून साखली तयार केली व विठ्ठलाच्या पायात बेडी घातली आणि सोह शब्दांचा मारा केला शेवटही विठ्ठल आपल्या हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत ना सोडण्याची प्रेमळ धमकी केली या शेवटच्या उपायाने तरी विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे संत जनाबाईना वाटत होते..

इ) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईच्या मनातील विठ्ठल या विषयाच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.

उत्तर- धरिला पंढरीचा चोर अभंगातून संत जनाबाईंच्या श्री विठ्ठलाप्रती असलेला पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे आणि विठ्ठल आपल्या मनात राहावे असे जनाबाईयांना वाटते. त्यासाठी त्यांना विठ्ठल रुपी चोराच्या गळ्यात भक्तीचा भाव बांधून हृदयाच्या बंदिखान्यात डांबून ठेवले तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दाची जुळणी करून बेडी घातली. त्यावर सोह शब्दांचा मारा केला. इतकेच नव्हे तर त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी ही दिली. अशाप्रकारची विठ्ठला बद्दलची आसक्ती संत जनाबाई मध्ये दिसून येते.

प्र. ४. अभिव्यक्ती.

अ) मानवी जीवनातीन निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर- मानवी आयुष्यात निष्ठा, भक्ती, प्रयत्न या तीनही मूल्यांना खूप महत्व आहे. माणसाची आपल्या कामावर, देवावर,कुटुंबावर अपार निष्ठा आसते. एखादे काम करताना त्यात भक्तीभाव हवा. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही आणि मग निष्ठेने कोणतेही काम करता येते. यश मिळण्याच्या निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची परीकाष्टा हवी. मानवी जीवन सफल आणि यशस्वी करायचं असेल, तर निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न या तीन मूल्याचे आचरण करायला हवे.

कोणत्याही मूल्याच्या कमतरतेमुळे आपण जीवनात यशस्वी होण्यात अडचण येऊ शकते. निष्ठा आणि भक्ती बरोबर प्रयत्नांना हि अनन्य साधारण महत्व आहे.

भाषा विषयक सामान्य ज्ञान

1 thought on “संतवाणी- धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय 9 वी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *