वाक्प्रचार अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग : मराठी एक समृद्ध भाषा आहे. या भाषेला समृद्ध करणारे मराठी मध्ये अनेक अलंकार, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल शब्द, भिन्न अर्थ असणारा एकच शब्द असे अनेक घटक समाविष्ट आहेत. भाषेचे सौंदर्य वाढवणारा वाक्प्रचार हा एक महत्त्वाचा घटक आहे. वाक्प्रचाराच्या माध्यमातून कमी शब्दांमध्ये मोठा अर्थ सांगणारी वाक्यरचना आपणास करता येते.
या लेखामध्ये आपण मराठीमध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या काही वाक्प्रचार अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग यांची माहिती घेणार आहोत. यामध्ये केलेला वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग हा आपणासाठी मार्गदर्शन करणारा ठरेल अशी आशा वाटते. आपण आपल्या पद्धतीने वाक्यांचा उपयोग करू शकता.
वाक्प्रचार अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग
१) दिलासा मिळणे – धीर मिळणे.
मीनाक्षीचे घर भूकंपामुळे उध्वस्त झाले होते. पण पाहुण्यांनी मदत केल्यामुळे तिला दिलासा मिळाला.
२) कणखर बनणे – काटक बनणे.
दररोज व्यायाम केल्यामुळे पियुषचे शरीर कणखर बनले.
३)ओढाताण करणे – कष्टदायक, त्रासदायक धावपळ होणे.
शेतातले काम व शाळा यामध्ये समीरची फार ओढाताण होते.
४) खंत वाटणे – खेद वाटणे, वाईट वाटणे.
गावामध्ये शाळा नसल्यामुळे गावकऱ्यांना खंत वाटते.
५) सांभाळ करणे – पालन पोषण करणे.
आई-वडील मुलांचा सांभाळ करतात.
६) गराडा पडणे – घेराव पडणे.
आमदार गावात येताच त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडला.
७) परिस्थितीशी झगडणे – वाईट स्थितीचा मुकाबला करणे.
मीराने गरीब परिस्थितीशी झगडत उच्च शिक्षण पूर्ण केले.
८) समजूत काढणे – गैरसमज दूर करणे.
पाणीटंचाईमुळे आलेल्या समस्या दूर करण्यासाठी सरपंच गावकऱ्यांची समजूत काढतात.
९) राब राब राबणे – खूप कष्ट करणे.
शेतकरी आपल्या शेतात राब राब राबतो.
१०) खंड पडणे – मध्येच थांबणे.
आजारी असल्यामुळे रोहनच्या शिक्षणात खंड पडला.
११) कमीपणा वाटणे – अपमान वाटणे.
वर्गातील मुले कबड्डीच्या सामन्यात हारले त्यामुळे मुलांना कमीपणा वाटला.
१२) नाव उंच करणे – कीर्ती संपादन करणे, मानाचे स्थान मिळवणे.
अशोक ने खूप अभ्यास करून स्वतःचे व कुटुंबाचे नाव उंच केले.
१३) वणवण सहन करणे – त्रासदायक भटकंती सहन करणे.
आदिवासी लोक अन्नासाठी जंगलामध्ये वणवण सहन करतात.
१४) हिऱ्याला पैलू पाडणे – तरबेज करणे.
विशालने कष्ट करून आपल्या कामाला हिऱ्यासारखे पैलू पाडले.
१५) कसूर न करणे – चूक न करणे, दुर्लक्ष न करणे.
गीता अभ्यासामध्ये कसलीही कसूर न करता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागली.
१६) दबदबा निर्माण करणे – दरारा निर्माण करणे.
कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा दबदबा निर्माण केला.
१७) माग काढणे – वाट काढणे, रस्ता शोधणे.
चोराचा माग काढत काढत पोलीस चोरापर्यंत पोहोचले.
१८) सावध करणे – भान देणे.
चोरांची चाहूल लागताच कुत्र्याने भुंकून आपल्या मालकाला सावध केले.
१९) फवारा सोडणे – पाण्याचे तुषार सोडणे.
चांगली पिके येण्यासाठी शेतकरी पिकांवर कीटकनाशकांचा फवारा करतो.
२०) तत्पर असणे – तयार असणे.
नेहमी दुसऱ्याला मदत करायला तत्पर असावे.
२१) पळ काढणे – पळून जाणे, लगेच निघून जाणे.
पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला.
२२) सुगावा लागणे- मागोवा लागणे,अंदाज लागणे.
सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यामुळे चोरांचा सुगावा लागला.
२३) ताव मारणे – खूप खाणे, खाण्यावर तुटून पडणे.
सम्यकने पाणीपुरीवर ताव मारला.
२४) हाणून पाडणे – बंद करणे, अडवणे.
समुद्रकिनारी सहल काढण्याचा बेत सरांनी हाणून पाडला.
२५) दाह होणे – आग होणे, जळजळणे.
जखमेवर औषध लावताना थोडा दाह होतो.
२६) नाराज होणे – निराश होणे, वाईट वाटणे.
परीक्षेत अपयश आल्यामुळे योगिता नाराज झाली.
२७) सार्थकी लागणे – धन्यता पावणे.
संगीता शिकून मोठी झाली , तिच्या आई वडिलांचे कष्ट सार्थकी लागले.
२८) गणती करणे – मोजणी करणे.
मितालीने वर्गातल्या विद्यार्थ्यांची गणती केली.
२९) प्रफुल्लित होणे – आनंदित होणे.
पहाटे उठल्यानंतर मन प्रफुल्लित असते.
३०) कंबर धरणे – कंबर दुखणे.
शेतातील कामे करून मयुरीची कंबर धरली.
३१) रात्रंदिवस घाम गाळणे – दिवस रात्र खूप कष्ट करणे.
दामू काका शेतात रात्रंदिवस घाम गाळतात.
३२) धाबे दणाणणे – खूप भीती वाटणे.
बिबट्याला बघून गावकऱ्यांचे धाबे दणाणले.
३३) जीवात जीव नसणे – खूप घाबरणे.
राजू बाहेर गावाहून लवकर परत आला नाही त्यामुळे आईचा जीवात जीव नव्हता.
३४) कालवा उडणे – कोलाहल माजणे, गडबड गोंधळ होणे.
लग्नामध्ये पाहुण्यांचा कालवा उडाला.
३५) धाप लागणे – खूप पळल्यामुळे दम लागणे.
माझ्या मागे कुत्रा लागल्याने मी पळत सुटलो याने मला धाप लागली.
३६) दूम नसणे – ठावठिकाणा नसणे, पत्ता नसणे.
माझा भाऊ कोठे आहे याचा कोणालाही दुम नाही .
३७) विसर पडणे – विस्मरण होणे.
जून महिन्यामध्ये केलेल्या अभ्यासाचा परीक्षेपर्यंत विसर पडला .
३८) पोटात खड्डा पडणे – खूप भीती वाटणे.
समोर साप पाहून माधुरीच्या पोटात खड्डा पडला.
३९) व्याकुळ होणे – कासावीस होणे.
दोन वर्षांनी येणाऱ्या मुलाला पाहण्यासाठी आईचा जीव व्याकूळ झाला .
४०) हात जोडणे – नम्रपणे विनंती करणे.
चोरी करून सापडलेल्या राजूने पोलिसांसमोर हात जोडलं.
वाक्प्रचार अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग
४१) प्रसंगावधान राखणे – तत्परतेने निर्णय घेणे.
समोरून जोरात येणारी गाडी पाहून अपघात टाळण्यासाठी राजूने प्रसंगावधान दाखवून गाडी बाजूला घेतली.
४२) नीपचित पडणे – हालचाल न होता पडून राहणे.
समोरून आलेला वाघ पाहून जीव वाचवण्यासाठी हरीण निपचित पडले.
४३) काळजात धस्स होणे – खूप घाबरणे.
माधुरीने साप बघितल्यावर माधुरीच्या काळजात धस्स झाले.
४४) डोळे पाणावणे – डोळ्यांत अश्रू येणे, रडवेले होणे.
पियुषला आई ओरडल्यावर पियुषचे डोळे पाणावले.
४५) मार्गी लावणे – नीट व्यवस्थित करणे.
केशवराव आपल्या दोन्ही मुलांचे संसार मार्गी लाऊन तीर्थयात्रेला निघून गेले.
४६) हायसे वाटणे – समाधान वाटणे.
माझा अभ्यास पूर्ण झाल्यावर मला हायसे वाटले.
४७) ध्यान लावणे – डोळे मिटून एकाग्र होणे.
दिवसभरातील कामाचा ताण कमी करण्यासाठी दीपक ध्यान लावून बसला.
४८) निरुत्तर होणे – उत्तर न सुचणे.
मुलाखतीसाठी गेलेला विशाल साहेबांनी विचारलेला प्रश्न ऐकून निरुत्तर झाला.
४९) गुजराण करणे – पोट भरणे.
गोविंदराव मुंबईत जाऊन मिळेल ते काम करून आपली गुजराण करू लागले.
५०) तल्लीन होणे – गुंग होणे, मग्न होणे.
अजय आपले आवडते संगीत ऐकण्यामध्ये तल्लीन झाला.
५१) आत्मसात करणे – मिळवणे.
रेश्मा आपल्या रिकाम्या वेळेत निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून नवनवीन ज्ञान आत्मसात करू लागली.
५२) सहभागी होणे – सामील होणे.
निशा आपल्या शाळेच्या कबड्डीच्या संघात आपल्या खेळाच्या कौशल्यामुळे सहभागी झाली.
५३) गौरव करणे – सन्मान करणे.
निशांत ने परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचा गौरव करण्यात आला.
५४) तहानभूक हरपणे – तहानभूक विसरून गुंग होणे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची अग्निबाणाचे संशोधन करताना तहानभूक हरपली होती.
५५) एटी मिरवणे – तोरा मिरवणे, रुबाब करणे.
आपला मुलगा जिल्हाधिकारी झाला हे ऐकून गणपतराव एटी मिरवत होते.
५६) फसगत होणे – फसवणूक होणे.
अन्सारची एका ऑनलाईन व्यवहारात फसगत झाली.
५८) तोंडावर हसू फुटणे – पटकन हसू येणे.
चित्रपटातील गमतीदार प्रसंग पाहून सोफियाच्या तोंडावर हसू फुटले.
५९) वाहवा करणे – स्तुती करणे, कौतुक करणे.
आशिषच्या कंपनीतील यशाबद्दल सर्वांनी त्याची वाहवा केली.
६०) हात बसणे – पक्का सराव होणे, कुशलता येणे.
पियुषचा आता सायकल चालवण्यावर हात बसला आहे.
६१) तोंडात बोट घालणे – नवल करणे.
नेहमी मस्ती करणाऱ्या गोपालचे यश पाहून सर्वांनी तोंडात बोट घातले.
६२) उदरनिर्वाह करणे – पोट भरणे.
गणपतराव आपल्या शेतातून येणाऱ्या उत्पन्नावर कसाबसा आपला उदरनिर्वाह करतात .
Good
Vakyprachar
Ffhhjj
Very good sir
Thanks
😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✊👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍