Skip to content

5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती फॉर्म भरला का? शेवटची मुदत आली जवळ..

  • by
शिष्यवृत्ती फॉर्म

शिष्यवृत्ती फॉर्म: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवी करीता शिष्यवृत्ती परीक्षेच्या आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

या परीक्षेला बसण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म ऑनलाईन भरणे आवश्यक असते. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा घेतली जाते. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर आणि प्रवेश शुल्क भरल्यानंतरच आपल्याला ही परीक्षा देता येते.

शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची अंतिम तारीख

या परीक्षेची ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत होती. तिच्यामध्ये वाढ करून 7 डिसेंबर 2024 पर्यंत विना विलंब शुल्क हे प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे. त्यानंतर विलंब शुल्क, अति विलंब शुल्क, विशेष विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येतात मात्र त्यासाठी येणाऱ्या फी मध्ये वाढ होते.

विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येथील मात्र त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अर्ज सादर करता येणार नाही.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत अवघ्या तीन दिवसात संपणार असल्याने ज्या शाळांनी अथवाच्या विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन अर्ज भरले नसतील त्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधा व सदरचे अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.

शिष्यवृत्ती परीक्षेशी संबंधीत माहिती जाणून घेण्यासाठी व परीक्षेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे…

www.mscepune.in

शिष्यवृत्ती परीक्षेच्या सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा पुढच्याa.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *