संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय : इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास १ विषयाचा संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय अभ्यासणार आहोत.
संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय
प्र.१) काय करावे बरे
अ) खूप भूक लागली आहे ; परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत.
उत्तर:- जर खूप भूक लागली तरी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. कारण उघड्यावरील अन्नपदार्थांवर आरोग्यास हानिकारक रोगजंतू असण्याचे प्रमाण अधिक असते. जर असे उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ले तर आपण आजारी पडू शकतो म्हणून उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. त्याऐवजी चणे, शेगदाणे असे पदार्थ खावेत.
प्र.२) जरा डोके चालवा .
अ) डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे, पाणी साचू न देणे यांपैकी अधिक चांगला उपाय कोणता ? का ?
पाणी साचू न देणे हा अधिक चांगला उपाय आहे. कारण कीटकनाशकांची फवारणी केली तर कीटक नाशकांमध्ये असणारी घातक द्रव्ये पाण्यात मिसळून असे पाणी पाण्याच्या इतर स्त्रोतात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होईल. आरोग्यास अपाय होईल.
३) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) संसर्गजन्य रोग म्हणजे काय?
उत्तर:- ज्या रोगाची लागण एखाद्याच्या संपर्काने दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात.
आ) रोगप्रसाराची माध्यमे कोणती आहेत ?
उत्तर:- हवा, पाणी, अन्नपदार्थ, कीटक व संपर्क इत्यादी रोगप्रसाराची माध्यमे आहेत
इ) रोगाची साथ येते तेव्हा काय होते ?
उत्तर:- जेंव्हा एखाद्या रोगाची साथ येते; तेव्हा परिसरातील अनेक लोकांना एकाच वेळी त्या रोगाची लागण होते.
ई) लसीकरण म्हणजे काय?
उत्तर:- एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी जी लस दिली जाते त्याला लसीकरण असे म्हणतात. लस इंजेक्शन अथवा तोंडावाटे दिली जाते.
उ) नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा.
उत्तर- घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ इत्यादी.
संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय इयत्ता पाचवी
प्र.४) पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा .
अ) आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो .
उत्तर: चूक
आ) काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात .
उत्तर: चूक
प्र. ५) पुढे काही रोग दिले आहेत . त्यांचे अन्नातून प्रसार , पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा .
मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, क्षय, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण, घटसर्प
अन्नातून प्रसार | पाण्यातून प्रसार | हवेतून प्रसार |
गॅस्ट्रो,हगवण | कॉलरा, कावीळ | क्षय, घटसर्प |
प्र.६) कारणे दया.
अ) गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे.
उत्तर:- कॉलरा या रोगाचा प्रसार दुषित पाण्यामुळे होतो. कॉलरा रोगाचे रोगजंतू पाण्यात मिसळल्याने या रोगाचा प्रसार सर्वत्र होतो. या रोगाचे जंतू शरीरात जाऊ नयेत म्हणून पाणी उकळून प्यावे. पाणी उखळल्याने पाण्यातील कॉलरा रोगाचे रोगजंतू नष्ट होतात. म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे.
आ) परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत.
उत्तर:- पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची पैदास होते. हिवतापाचे रोगजंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरतात. डबकी नसतील तर डासांची पैदास होत नाही. त्यामुळे हिवताप व डेंग्यू यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत.
संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय
गणिती क्रिया सराव चाचणी सोडवण्यासाठी इथे क्लिक करा.
नफा तोटा सराव चाचणी सोडवण्यासाठी इथे क्लिक करा.
शेकडा नफा तोटा सराव चाचणी सोडवण्यासाठी इथे क्लिक करा.
सरळ व्याज सराव चाचणी सोडवण्यासाठी इथे क्लिक करा.
शेकडेवारी सराव चाचणी सोडवण्यासाठी इथे क्लिक करा.