आभाळमाया स्वाध्याय : आभाळमाया ही कविता विलास सिंदगीकर यांनी लिहिलेली आहे. कवितेमध्ये कवी कल्पनेतून पक्षी झाल्यानंतर, ढग झाल्यानंतर काय काय करणार आहे हे सांगत आहे. या ठिकाणी आपण आभाळमाया स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत.
आभाळमाया स्वाध्याय
प्रश्न १) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते?
उत्तर – पावसाचे ढग होऊन दरीत, डोंगरावर व शेतात कोसळावे असे कवीला वाटते.
२) शेतकऱ्याला बरकत केव्हा येते?
उत्तर – जेव्हा शेते चांगली पिकतात तेव्हा शेतकऱ्याला बरकत येते.
३) कवीला उजेड कोठे न्यायचा आहे?
उत्तर – कवीला उजेड गरिबांच्या झोपडीत न्यायचा आहे.
४) पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते?
पक्षाकडे पाहून कवीला वाटते की, आपल्यालाही पक्षासारखी चोच व पंख फुटावेत.
५) आभाळमाया का मिळावी असे कवी म्हणतो?
उत्तर – आनंदाने नाचण्या गाण्यासाठी आभाळमाया मिळावी असे कवी म्हणतो.
प्र २) कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते?
१) पाऊस
कवीला पाऊस होऊन डोंगरावर दरीत आणि शेतात कोसळावे असे वाटते.
२) पणती
पणती होऊन कवीला गोरगरिबांच्या झोपडीत प्रकाश न्यावा असे वाटतो.
३) पक्षी
पक्षी होऊन कवीला आपल्याला चोच आणि पंख फुटावेत, त्याचा वापर करून तोंडात फळे घेऊन जाऊन भुकेल्यांना वाटावे वाटते.
प्र ३) खालील गोष्टींचा वापर कशासाठी होतो ते सांगा.
(१) अंगण – बागडण्यासाठी, खेळण्यासाठी
(२) मैदान – खेळण्यासाठी
(३) शेत – धान्य पिकवण्यासाठी
(४) फुले – सुवास घेण्यासाठी, हार बनवण्यासाठी व देवासाठी
५) दिवा – उजेड/ प्रकाश देण्यासाठी
प्र ४) तुम्ही कोणासाठी काय द्याल?
१) मित्रांसाठी – खाऊ आणि खेळणी देईन.
२) शाळेसाठी – पुस्तके देईन.
३) घरासाठी – प्रेम व आनंद देईन.
४) शेतासाठी – चांगले खत, बी बियाणे देईन.
५) आईसाठी – प्रेम , भेट देईन.
६) बाबांसाठी – आदर देईन.
प्र ५) तुम्ही पक्षी झाला आहात, अशी कल्पना करून पाच सहा ओळी लिहा.
मी पक्षी झालो तर…
मी पक्षी झालो तर मी उडत उडत आभाळात मुक्त संचार करीन. डोंगरावर, दरीत, झाडावर, शेतात जाईन. वेगवेगळ्या झाडांवरील फळांचा आस्वाद घेऊन. उंच झाडावर घरटे बांधीन. झाडावरची मधुर फळे दररोज खाईन. इतर पक्ष्यांशी मैत्री करेन.