पाणी स्वाध्याय : पाणी हा इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकातील एक घटक आहे. या घटकांमध्ये आपल्याला पाण्याचे प्रदूषण, सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट, पाण्याचे शुद्धीकरण, जलशुद्धीकरण केंद्र, दुष्काळ आणि जल व्यवस्थापन या मुद्द्यांच्या आधारे माहिती पहावयास मिळते.
पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माणसाबरोबर इतर सर्व सजीवांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. या पाण्याचे व्यवस्थापन होणे खूप गरजेचे आहे. पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत करणारा हा पाठ आहे. या ठिकाणी आपण पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपात अभ्यासणार आहोत.
पाणी स्वाध्याय
१. काय करावे बरे ?
१) जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे.
उत्तर:- जमीन उतारावर आडवे चर मारावेत. जमिनीच्या उतारावर लहान लहान झाडांची लागवड करावी; त्यामुळे झाडांची मुळे उतारावरील माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जाणार नाही. नाचणी सारखे पिक या उतारावर घ्यावे.
२) जरा डोके चालवा.
१) पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे ?
उत्तर:- काँक्रीटीकरण करत असताना संपूर्ण रस्त्याचे सलग काँक्रीटीकरण न करता थोड्या थोड्या अंतरावर बारीक भेग ठेवणे गरजेचे आहे. जेणे करून पाणी त्या भेगेतून जमिनीत मुरेल.
तसेच रस्त्याच्या कडेला पादचारी मार्ग करत असताना पादचारी मार्ग बनवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या लाद्यांच्या मध्ये थोडी जागा ठेवावी. म्हणजे त्या जागेतून पावसाचे पाणी जमिनीत मुरेल.
२. प्रश्नांची उत्तरे लिहा. पाणी स्वाध्याय
अ) दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते?
उत्तर- १) दुष्काळात पाऊस कमी प्रमाणात पडतो अथवा पडत नाही त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो.
२) दुष्काळात नद्या, तळी, विहिरी, बंधारे, धरणे यांतील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी होते आणि ते कोरडे पडतात.
3) जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.
4) शेतीसाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न बंद होऊन अन्नधान्याची टंचाई निर्माण होते.
आ) पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात ?
उत्तर:- पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक पुढील कामे करतात.
- पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी ते अडवून ठेवले जाते. त्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी धरणे, बंधारे, तलाव, उतारावर आडवे चर खणने इत्यादी कामे केली जातात.
- घराच्या छतावर पडणारे पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी शोषखड्डा काढला जातो अथवा ते साठवले जाते.
- नदीच्या पात्रात विहिरी खोदून पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते.
पाणी स्वाध्याय इयत्ता पाचवी
इ) पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते ?
उत्तर: सर्वसाधारणपणे आपल्याकडे वर्षातून चार महिने पाऊस पडतो. या पावसाचे पाणी साठवले नाही तर आपल्याला दैनंदिन गरजांसाठी आपल्याला वर्षभर पाणी उपलब्ध होणार नाही. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी, जमिनीतील भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते.
ई) जलव्यवस्थापन कशाला म्हणतात ?
उत्तर: उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे. तसेच पाणी पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे महत्त्वाचे असते. अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच जलव्यवस्थापन म्हणतात.
5th scholarship App
३) चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. पाणी स्वाध्याय
अ) पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते.
उत्तर: चूक. पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून फक्त चार महिनेच मिळते.
आ) शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हालवले जाते.
उत्तर: बरोबर.
पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी अभ्यासलेला असून या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.